IN PICS: प्रियांका चोप्रा-निक जोनासपासून शाहरुख आणि आमिरपर्यंत हे सेलिब्रिटी सरोगसीद्वारे झाले आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:39 PM2022-01-22T13:39:00+5:302022-01-22T13:39:00+5:30

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आई झाली आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. बाळाचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. सोशल मीडियावर माहिती देताना प्रियांका चोप्रा म्हणाली, "आम्ही सरोगसीद्वारे आमच्या घरात बाळाचे स्वागत केले आहे. ही बातमी साऱ्यांना सांगताना मला खूपच आनंद होतोय. या आनंदाच्या आणि खास क्षणांमध्ये आम्ही आमच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहोत. साऱ्यांचे धन्यवाद!" (Photo Instagram)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तीन मुलांचा वडील आहे. शाहरुख आणि गौरीने दोन मुलांनंतर अबराम खानसाठी सरोगसीचा अवलंब केला होता. 2013 मध्ये शाहरुख सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा वडील झाला होता. (Photo Instagram)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी सेरेगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला. आमिरने त्याचा धाकट्या मुलाचे नाव आझाद राव खानला ठेवले आहे. (Photo Instagram)

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सिंगल पॅरेंट आहे. करण सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचा पिता आहे. करणच्या मुलाचे नाव यश आहे, तर मुलीचे नाव रुही आहे. (Photo Instagram)

2020 मध्ये शिल्पा शेट्टी सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. याआधी तिला एक मुलगा आहे ज्याचा जन्म 2012 मध्ये झाला होता. शिल्पाने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला तिच्या गरोदरपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून आई होण्याचा निर्णय घेतला. (Photo Instagram)

बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि डान्स कोरिओग्राफर फराह खान वयाच्या ४३ व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून तीन मुलांची आई झाली. (Photo Instagram)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा- मुलगी तुषार कपूर आणि एकता कपूर यांनीही सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील होणाचा निर्णय घेतला. दोघेही सिंगल पॅरेंट आहेत. (Photo Instagram)

अभिनेत्री सनी लिओनीने पहिल्यांदा 2017 मध्ये एका मुलीला दत्तक घेतले आणि त्यानंतर 2018 मध्ये ती सरोगसीद्वारे अशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर या जुळ्या मुलांची आई झाली. (Photo Instagram)