शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
3
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
4
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
5
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
6
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
7
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
8
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
9
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
10
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
11
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
12
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
13
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
14
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
15
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
16
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
17
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
18
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
19
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
20
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )

१७ शिक्षक निलंबित

By admin | Updated: November 11, 2014 15:35 IST

जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बोगस बदली आदेश प्रकरणात दोन मुख्याध्यापकांसह १७ शिक्षकांना शिक्षणाधिकारी एकनाथ मडवी यांनी निलंबित केले.

नांदेड : जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बोगस बदली आदेश प्रकरणात दोन मुख्याध्यापकांसह १७ शिक्षकांना शिक्षणाधिकारी एकनाथ मडवी यांनी निलंबित केले. जिल्हा परिषदेत बदल्यांमध्ये लाखो रूपयांची उलाढाल होते हे सर्वo्रुतच आहे. मात्र कोणतीही प्रशासकीय कार्यवाही पूर्ण न करता, संचिका न करता जिल्हा परिषदेतील काही मंडळींनी बदलींचे आदेश काढले. हे आदेश नुसते निघालेच नाही तर या आदेशाची अंमलबजावणीही झाली. ही बाब जेव्हा उघडकीस आली तेव्हा जिल्ह्यातील सर्व बदली आदेश, आपसी बदली, जिल्हा बदली याबाबतची कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांकडून मागवून घेतली. या आदेशाची चौकशी केल्यानंतर यातील बोगस आदेश पुढे आले. उपशिक्षणाधिकारी एम. डी. पाटील यांच्या समितीने या आदेशांची छाननी करताना संबंधित शिक्षकांचे जबाब नोंदवून घेतले. त्यात बदली आदेश कसे मिळाले याचा उलगडा झाला आहे. जिल्हा परिषदेत काम करणार्‍या शिक्षकांकडून हे आदेश मिळाले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने उशिरा का होईना केली आहे.त्यात लोहा तालुक्यातील दापशेड येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही. जोशी, मुखेड तालुक्यातील सावरगाव पी. येथील एस. एस. मुजावर, लोहा तालुक्यातील कलंबर जि. प. शाळेतील रवींद्र बळीराम घोलप, माळाकोळी येथील ए. व्ही. जायभाये, देगलूर तालुक्यातील करडखेड येथील गणेश शंकरराव पांचाळ, बन्नाळी येथील वीणा भगवानराव पांडे, गोगोतांडा येथील एस. बी. जान्ते, नायगाव तालुक्यातील रातोळी येथील व्ही. के. जमजाळ, बिलोली तालुक्यातील हिप्परगामाळ येथील शेख मन्सूर खमरूसाब, टाकळी बु. येथील अरूण संभाजी डाकोरे, डोणगाव येथील व्ही. यु. भोगाजे, भोकर येथील छाया नारायण जोशी, मुदखेड तालुक्यातील नागेली येथील अनिता दामोदर बंडेवार, अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील डी. एल. कदम आणि हिमायतनगर तालुक्यातील टेंभी जि. प. शाळेतील शिक्षक एस. एन. भिसे यांना बदली प्रकरणात कार्यालयीन पद्धतीचा अवलंब न करता परस्पर आदेश घेतल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. बोगस बदली प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी राजकीय हस्तक्षेप झुगारत कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई शेवटपर्यंत नेण्यासाठी काळे यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. /(प्रतिनिधी) ■ जिल्हा परिषदेच्या अर्धापूर येथील पिंपळगाव येथील शाळेत कार्यरत असलेल्या डब्ल्यू. आर. गिते आणि रूस्तुम बी. पवार यांची जोडी जि. प. त या प्रकरणानंतर चांगलीच चर्चेत आली होती. गिते हे एका वरिष्ठ अधिकार्‍याचे वर्गमित्र तर पवार हे एका पदाधिकार्‍याचे स्वीय सहायक. या दोघांनाही या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. त्यात पवार यांनी तब्बल ११ शिक्षकांचे बदली आदेश कार्यालयीन पद्धतीचा अवलंब न करता काढले. त्यात गणेश पांचाळ, वीणा पांडे, एस. बी. जान्ते, डी. एल. कदम, व्ही. यु. भोगाजे, शेख मन्सूर, खमरूसाब, के. व्ही. जोश्ी, एस. एस. भिसे, छाया जोशी, अनिता बंडेवार आणि अरूण डाकोरे यांचा समावेश आहे. तर गिते यांनी रवींद्र घोलप, ए. व्ही. जायभाये आणि के. व्ही. जोशी यांच्या बदलीचा समावेश आहे.