कोरोनाबधितांसाठी २२१ खाटा उपलब्ध
परभणी : जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाधितांसाठी मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले असले तरी रुग्णांचे प्रमाणही तेवढेच वाढत असल्याने गुरुवारी केवळ २२१ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जिल्हा रुग्णालयात ३, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ६५, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ६९, अक्षदा मंगल कार्यालयात २२ खाटा रिक्त आहेत. उर्वरित सर्व खाटा खासगी रुग्णालयांतील आहेत.
गुरुवारी दिवसभरात ७७ जणांची तपासणी
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. गुरुवारी दिवसभरात केवळ ९७७ नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या. त्यात जिल्हा रुग्णालयात २५६, पालम तालुक्यात ८५, पूर्णा तालुक्यात २६८, सोनपेठ १५१, सेलू ४०, मानवत ६६ आणि जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात १११ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.