|
नांदेड : मुलीच होत असल्याच्या कारणावरुन सासरच्या मंडळीकडून नेहमी होणार्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वंदना यांचा विवाह पाच वषार्ंपूर्वी शहरातील सावित्रीबाई फुले नगर येथील संभाजी पाडुरंग गायकवाड यांच्याशी झाला., परंतु लग्नानंतर वंदना यांना मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ करण्यात येत होता. त्याचबरोबर टीव्ही घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणीही करण्यात येत होती. नेहमी होणार्या या त्रासाला कंटाळून ४ नोव्हेंबर रोजी वंदना गायकवाड या विवाहितेने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी पंडित दशरथ सिंगारपुतळे रा.बामणी ता.कंधार यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी संभाजी गायकवाड, पांडुरंग गायकवाड, कांताबाई गायकवाड, सुवर्णमाला राहुल ढवळे, निर्मला केशवराव हानमंते, पंचशीला शरद, जयशीला गायकवाड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि पवार हे करीत आहेत. महिलेस मारहाण भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वामनराव कर्डकनगरमध्ये गुन्हा परत घेण्याच्या कारणावरुन दोन महिलांना मारहाण केल्याची घटना घडली.याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शोभाबाई दशरथ धोंगडे ही महिला मुलीसह घरी होती. दुपारच्या वेळी गंगाधर चिमणाजी जाधव व इतर सहा जण तेथे आले. त्यांनी गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरुन त्यांच्याशी वाद झाला. त्यानंतर सात जणांनी काठीने शोभाबाई व त्यांच्या मुलीला मारहाण केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली याप्रकरणी शोभाबाई धोंगडे यांनी ठाण्यात तक्रार दिली. / (प्रतिनिधी) |
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By admin | Updated: November 5, 2014 13:39 IST