परभणी : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये सालगडी म्हणून ठेवलेल्यांचे साल देणेही अवघडझाले आहे. आता शेतकर्यांवरच सालगड्यांना टप्प्याटप्याने पैसे देतोम्हणून वेळ मारून नेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाऊस ५0टक्क्यांहून कमी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हातची गेली आहेत. कापसाच्या शेतावर शेतकर्यांनी एकरी १५ ते २0 हजार रुपये खर्च केले आणि एकरी १४ ते १५ किलो कापूस निघत आहे. शेतकर्यांना एकरी चार ते साडेचार रुपयेच मिळत आहेत. अशीच परिस्थिती सोयाबीनच्या एका बॅगला शेतकर्यांनी सात ते दहा हजार रुपये एवढा खर्च केला. परंतु, एका बॅगला उत्पन्न दोन पोते झाल्याने सहा ते सात हजार रुपयांचाच माल झाला. परंतु, ज्या शेतकर्यांकडे दहा ते पंधरा एकर शेती आहे अशा शेतकर्यांनी सालगडी ६0 ते ७0 रुपये देऊन ठेवला होता. शेतकर्यांनी खरीप हंगामात लाखो रुपये पेरणीसाठी खर्च केला. परंतु, उत्पन्न झाले हजारामध्ये अशा परिस्थितीत शेतकर्यांना सालगड्याचे ६0 ते ७0 हजार रुपये कोठून द्यायचे? असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. काही शेतकर्यांनी सालगड्याला उचल म्हणून २0 ते २५ हजार रुपये दिले होते. परंतु, सोयाबीन व कापूस न झाल्याने उर्वरित रक्कम आता शेतकर्यांना घरातून देण्याची वेळ आली आहे. /(प्रतिनिधी)
--------------
■ शेतमालकांना सालगड्याचे उर्वरित पैसे शेतात माल न झाल्यामुळे देता येत नसल्याचे दिसून येत आहे. शेतमालक सालगड्यास बाबा आता तुझे पैसे मला देणे होत नाही उर्वरित रक्कम पुढच्या खरीप हंगामात देऊ, असे म्हणत आहेत. त्यामुळे शेतमालकासह सालगड्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ आली आहे. गड्यांमध्येही नाराजी> परभणी जिल्ह्यातील शेतकरी सालगडी अथवा शेतामध्ये तिसर्या हिश्श्याने गडी ठेवण्याची प्रथा आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतातील मालाच्या उत्पादनात उतारा न आल्याने तिसर्या हिश्श्याने शेत वाहणार्यांच्या हातावर काहीही पडले नाही. त्यामुळे मालकासह गड्यामध्येही नाराजी निर्माण झाली आहे.