शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

पेन्सिल खालीच का पडेल?

By admin | Updated: October 16, 2015 12:04 IST

बूट तर काय आपण रोजच घालतो, लेस बांधताना चिडचिडतो. वैतागतो. पण या बुटांच्या लेस सेलफोनला जोडलेल्या मेकॅनिझममुळे एका क्लिकसरशी आपोआप बांधल्या गेल्या आणि सोडता आल्या तर? असले भन्नाट विचार करणा:या माणसांमुळेच तर जग बदलतं. मग त्या माणसांमध्ये आपला समावेश का नसावा?

आउट ऑफ बॉक्स विचार करणं म्हणजे खरं तर, रेडिमेड उत्तरं डोक्यातून पुसून टाकणं!!
 
 - आर्यमन दर्डा
 
आपल्या मनाची अचाट आणि अफाट क्षमता आपल्या लक्षात येते का?
खरंतर आपण माणूस म्हणजे काय असतो, एक इटुकली पेशी; निला आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्तपुरवठा होतो. या निला आणि रक्तवाहिन्यांचं एक विश्वच असतं, त्या विश्वातली टिंबाएवढी पेशी म्हणजे आपण!
विश्वाच्या आणि आकाशगंगेच्या अफाट पसा:यात  पृथ्वीसुद्धा एखाद्या पेशीएवढीच आहे. एकेकाळी आपले अतिपूर्वज मानत असत की ‘आपली’ पृथ्वी चौकोनी आहे. आणि आपण जर चालत चालत प्रवासाला गेलो आणि जमीन संपली तर आपण एका भयाण निर्वात पोकळीत जाऊन पडू! त्यांचा असा समज होता की, आपले पूर्वज पृथ्वीच्या अशाच कडांवर राहत असत आणि त्यामुळे त्यांचं जगणं फार कठीण होतं.
पण तसं काही होतं का? पृथ्वी सपाट-चौकोनी नव्हतीच, आणि माणसंही अशी पृथ्वीवरून निर्वात पोकळीत कधी पडली नाहीत हेच खरंय! गेली काही शतकं अशा किती धारणा, किती समजुतींनी आपण बावरले होतो, चाचपडत होतो. सपाट पृथ्वीवरून आपण पडू ही ठाम समजून करून घेत अनेकांनी ती पृथ्वी नेमकी कशीये हे शोधून न काढता सतत काहीतरी पळवाटाच शोधल्या. तशीच भीती आपल्या मनातही असते, पडलो तर काय, ही धास्ती असते. त्या भीतीतच आपण अडकतो. आपल्या सुपीक आणि महाकल्पक मेंदूचा फक्त 9.5 टक्केच भाग आपण वापरतो तरी त्यातून मानवानं केलेली प्रगती थक्क करत जाते.
माणसानं पृथ्वीवरच्या आपल्या अस्तित्वात काय काय प्रगती केली, काय काय कमावलं, यावर एक नजर घातली तरी थक्कं व्हायला होतं. मेंदूचा जेमतेम एक आकडी वापर करून माणसानं आपल्या जगण्यातच अफाट, मूलगामी बदल केले. नुस्ती कल्पना करून पहा की, माणसानं आपल्या मेंदूचा वीस टक्के वापर करायला सुरुवात केली तर काय होईल, कमालच होईल!
अर्थात ते आज होत नसलं तरी ज्या जेमतेम दहा टक्के मेंदूचा वापर आपण करतोय त्यातूनही आपण रोज धावतोय, काहीतरी नवीन शोधण्यासाठी. आणि पुढचीही काही वर्षे सतत पळूच नवंनवं काहीतरी शोधत! 
विचार करा, कार सारखं एखादं वाहन असावं, असा विचार पहिल्यांदा डोक्यात कसा आला असेल? काय असेल तो विचार?
एखादी बिल्डिंग बांधावी ही कल्पना कशी सुचली असेल? साध्या साध्या विचारांना एकामागून एक उकळ फुटली की असं काहीतरी सुचत राहतं.
विचार करण्याची, कल्पना करण्याची क्षमता हे माणसाला मिळालेलं सर्वोत्तम वरदान आहे. आणि हे वरदानही अक्षय आहे, त्याला कसल्याही मर्यादा नाहीत, कसलंही बंधन नाही.
तरीही माणसं ठरावीक साच्यातलाच विचार करतात. नेहमी एकसारख्याच पद्धतीनं गोष्टींकडे पाहतात.
एक उदाहरण सांगतो, समजा मी तुम्हाला म्हणालो की, मी ही पेन्सिल हातात घेतली आणि खाली टाकली तर काय होईल?
सगळेजण हेच सांगतील की, काय होईल, पेन्सिल खाली जमिनीवर पडेल, दुसरं काय?
शंभरेक लोकांना तरी मी हाच प्रश्न विचारला. पण या प्रश्नाचं वेगळं आणि चमकदार उत्तर दिलं ते एका आठ वर्षाच्या मुलानं!
तो म्हणाला, ‘आपण ठरवलं तर हातातून खाली टाकल्यावर पेन्सिल हवेत तरंगू पण शकेल!’
त्याच्या या उत्तरानं मी विचारातच पडलो. वाटलं, खरंच असूं होऊ शकेल. आपण एखादं ‘डीव्हाईस’ म्हणजे उपकरण बनवलं की ज्यामुळे एखाद्या बंद खोलीतलं गुरुत्वाकर्षणच कमी करेल आणि मग त्या खोलीतल्या वस्तू हवेत नुस्त्या तरंगत राहतील!
पण हे त्या मुलाला, ङोनला सुचलं तसं सगळ्यांनाच सुचत नाही. ङोनसारखी अशी फार थोडी माणसं जगात असतात जे असा भन्नाट, साच्यातल्या, ठरलेल्या विचारांपलीकडे जाऊन एकदम वेगळाच विचार ते करतात. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची क्षमताच त्यांच्याकडे असते. 
ङोनच्या एका वाक्यानं माझ्या डोक्यात अनेक कल्पनांचं वारुळ फुटलं. वेगळा विचार करण्याचं वाणच त्यानं मला दिलं आणि मीही त्या एका पेन्सिलीभोवती वेगळा विचार करू लागलो.
वेगळा, अपारंपरिक विचार करण्याच्या या ताकदीनं मळलेल्या वाटा, ठरलेले निष्कर्ष आणि परिणाम बाद होतात आणि त्यातून तुमच्या समाजात, आर्थिक ऐपतीत आणि रोजच्या जगण्यातही खूप मोठा बदल होऊ शकतो.
हा असा वेगळा विचार करण्याची ताकद आपल्या सगळ्यांकडे असते. कुणीतरी विचारी माणसानंच विचार करावा, तो त्याचाच मक्ता, असं काही नसतं. फक्त आपल्या प्रश्नाचा त्याच्यापलीकडे जाऊन विचार करावा लागतो. ते करणं सोपं नाही, पण करता आलंच तर प्रश्नाचं उत्तरच बदलून जातं आणि काहीतरी अत्यंत कल्पक आणि वेगळं उत्तर हाती येतं. 
अशाच एक माणसाचं उदाहरण सांगतो. आजच्या घडीला त्यानं पैसा-प्रसिद्धी-यश सारं कमावलंय. 
मार्क झुकेरबर्ग त्याचं नाव.
एक कॉलेज ड्रॉपआउट घरी बसलेला मुलगा. त्याच्याकडे ना मार्केटिंगचा अनुभव होता, ना कसल्या व्यवसायाचा, ना कसल्या कामाचा. पण आजच्या घडीला तो एका मोठय़ा सोशल कार्पोरेशनचा सीईओ आहे. फेसबुकचा कर्ता-धर्ता आहे. एखादा कॉलेज ड्रॉपआउट एवढा यशस्वी कसा झाला, अमेरिकेतही शाळा-कॉलेज सोडून देणारे अनेक तरुण मुलं फार मॅकडोनाल्डमध्ये काम करतात, पण मार्कचं तसं झालं नाही. 
कारण मार्क ठरलेल्या वाटेनं गेला नाही, कॉम्प्युटर क्लासमध्ये शिकविले जाणारे कोड्स ठरलेल्या पद्धतीनं लिहिणंच त्यानं नाकारलं. त्याऐवजी घराच्या गॅरेजमध्ये त्यानं आणि त्याच्या मित्रंनी एकमेकांशी बोलण्याचा एक वेगळाच मार्ग शोधला आणि त्यातून त्यांना फेसबुकची आयडिया सापडली. वेगळा विचारच केला नसता तर आजचं अत्यंत लोकप्रिय फेसबुक जगभर असं पसरलंच नसतं.  
मार्क झुकेरबर्ग म्हणतोच, ‘ इन फेसबुक, इव्हन द मोस्ट सिम्पल लाइन ऑफ कोड इज कंडक्टेड इन द मोस्ट अनकन्व्हेंन्शनल वे’
नेहमीच्या पद्धतीनं रेषा आखणं सोडून नव्या त:हेनं रेष काढून पाहण्याचा हा आग्रहच वेगळ्या विचारांना जन्म देतो. जगात असा वेगळाच विचार करणारे ‘विचारी’ बरेच आहेत. त्यांच्या प्रश्नांना उपलब्ध असणारी तोडकी, बिच्चरी उत्तरं त्यांनी नाकारली, त्या उत्तरांच्या ठेचा लागल्या म्हणून त्यांनी नवीन उत्तरं शोधली.
मार्क झुकेरबर्गला मित्रंशी ‘शेअर’ करायचं होतं, बोलायचं होतं, सतत संपर्कात रहायचं होतं आणि तेही सहज, अगदी सोप्या पद्धतीनं म्हणून मग त्यानं ‘शेअरिंग’ची एक नवीनच रीत शोधून काढली. आपल्या रोजच्याच छोटय़ा-मोठय़ा गरजांतून अत्यंत कल्पक, भन्नाट आयडिया निर्माण होतात हीच एक मोठी अकल्पनीय गोष्ट आहे. सगळ्यांकडेच असते अशी भन्नाट विचारांची क्षमता पण त्यातले फार थोडे ती वापरतात आणि ती प्रत्यक्षात उतरवतातही.
आपल्या अवती-भोवतीही अशी भन्नाट, वेगळाच विचार करणारी माणसं असतात; पण ते जगताना ते असा वेगळा विचार करताना फारसे दिसत नाही. पण खरं सांगतो, वेगळा विचार जरी असा नुस्ता केला, वेगळ्या दृष्टीनं जग पाहिलं तरी अत्यंत वेगळा आनंद मिळतो, वेगळंच समाधान वाटय़ाला येतं. आपल्याला जे सुचलंय, जे दिसतंय, जे सापडलंय ते लोकांना सुचत नाही, दिसतही नाही त्यांच्या लक्षातही येत नाही, यातली गंमत आणि आनंदच सुखावून जातो.
मला असं मनापासून वाटतं की, सरधोपट पद्धतीनं विचार केला तर सरसकट ठरल्या वाटेनं हळूहळू प्रगती करत पुढे सरकता येईलही पण जर अपारंपरिक, वेगळा आणि नवा विचार केला, नव्या पद्धतीनं केला तर जगण्यात नावीन्य येईल आणि क्रांतिकारी बदलही होतील!
एकदा जरा असाच, जरा काळजीनं, उदास बसलो होतो आणि बसल्या बसल्या डोक्यात एक एकदम वेगळाच विचार चमकला. त्या कल्पनेवर नीट विचार केला, डिटेल काम केलं तर आपल्या रोजच्या जगण्यात त्यानं खूप मोठी सोय होईल, वाटून गेलं. 
रोजचीच गोष्ट, आपण रोज बूट घालतो. त्या बुटांना लेस असतात. रोज त्या बुटांच्या लेस बांधणं, हे ब:याच जणांना कटकटीचं वाटतं, नीट बांधता येत नाही, उलटय़ा-सुलटय़ा बांधल्या की पुन्हा सोडून पुन्हा नीट बांधाव्या लागतात. रोज सकाळी या लेस अनेकांना वैताग आणतात.
सोफ्यावर बसल्या बसल्या माङया मनात एक भन्नाट विचार आला की समजा, बुटातून या लेस काढूनच टाकल्या आणि बुटांना मेकॅनिकल लेस लावल्या तर? बुट पायात घातले की त्या त्यांच्या त्यांच्या घट्ट होत बांधल्या जातील. बूट पायातून काढायचं ठरवलं की त्या स्वत:हूनच लूज होतील. आणि फक्त एक बटन दाबलं की हे काम चटकन होईल. हे शूज आपल्या फोनशी ब्लूटूथने जोडलेले असतील. म्हणजे आपल्या फोनवरून सुद्धा आपण पायातले बूट काढू, घालू शकू, लेस सैल-घट्ट करू शकू. रोज उठून लेस बांधायच्या कटकटीतून कायमची सुटका. खेळाडू, व्यायाम करायला जाणारे, रोज कॉलेजात-ऑफिसला जाणारे यांना सकाळच्या गडबडीत तर ही सुविधा म्हणजे केवढी मोठी सोय!
या शूजला दोन बटनं असतील, एक पॉङिाटिव्ह, एक निगेटिव्ह. पॉङिाटिव्ह बटन दाबलं की मेकॅनिकल लेस  आपोआप टाइट होतील आणि निगेटिव्ह बटन दाबलं की सैल होतील! आपण शूजचा मागचा भागही नेहमीपेक्षा जरा जास्त मोठा बनवू शकू म्हणजे चालताना तो मागून उचकणार नाही. हे शूज स्टायलिश तर दिसतीलच पण वापरायलाही जास्त सोपे होतील. हे कम्फर्टसाठी रीडिझाईन केलेले शूज नेक्स्ट जनरेशन फुटवेअर ठरतील! बुटातली ब्लूटूथ चीपही सोलच्या खाली घातलेली असेल, म्हणजे ती बाहेरून दिसणार नाही. 
असे रनिंग शूज अजून तरी मिळत नाहीत; पण भविष्यात मिळतीलही! हा असा भन्नाट विचार स्वत:च्याच मनात केल्यावर मलाच आनंद झाला. रोजची एक साधी अडचण, त्यावरचा एक साधा तोडगा अनेकांची रोजची चिडचिड कमी करून त्यांना एक भन्नाट पर्याय देऊ शकेल! ज्यांना असे वेगळे तांत्रिक डिव्हाईस आवडतात, असे अनेक लोक हे बूट आनंदानं खरेदी करतील. आणि ज्याला ही आयडिया सुचली त्याच्या भन्नाट डोक्याचं कौतुकही करतील! आपलं डोकं वापरून एकदम ‘न्यूफॅँगल’ म्हणजेच नव्या फॅशनचा, कल्पक विचार असा जर काही केला आणि तो लोकांना आवडला तर लोक आपल्याला जन्मभर लक्षात ठेवतील, आपलं नाव काढतील!
अशा विचारांना काही मर्यादाच नाही, अथांग, अमर्याद आहेत या विचारातल्या शक्यता. आपल्यावर आणि आपल्या अवती-भोवतीच्या सगळ्यांच्या जगण्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. असा वेगळा विचार करणं म्हणजे खरं तर नव्या आयडियांना ओपन असणं, आपल्या मनाची कवाडं खुली ठेवणं. आपण कल्पक आहोत, हे जगाला सांगणं. आणि मेंदूतल्या निष्क्रिय मसल्सना जरा व्यायाम देत त्यातल्या असामान्य शक्तीला कामाला लावणं. 
हे सारं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा माझीच नजर बदलली, माङया अवती-भोवतीचं जग मला वेगळं दिसायला लागलं. माङयाच क्षमता माङया लक्षात आल्या. उत्साह वाढला. आणि माझा मीच मला वेगळा, नवा नवा दिसायला लागलो. या पॉङिाटिव्ह पॉवरचा माङयावर एक दूरगामी परिणाम होईल हे नक्की! 
प्रख्यात अमेरिकन कवी, निबंधकार राल्फ इमर्सन यांचं  एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ‘जगात स्वत:सारखंच जगायचं असेल तर तर स्वत:ला वेगळं, अधिक वेगळं बनवत राहणं हीच एक मोठी कामयाबी आहे. आपण सगळ्यांनी आपापल्या सावल्यांपासून स्वत:ला सोडवत ऑउट ऑफ द बॉक्स म्हणजे स्वतंत्र विचार करायला हवा. तो विचार हीच अनंतकाळाच्या अस्तित्वाची किल्ली आहे.’
आपल्या विचारातून ती किल्ली आपल्याला सापडायला हवी.!
- आर्यमन दर्डा
आर्यमन मुंबईतल्या एनएसएस हिल स्प्रिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. यलो टॉक या संस्थेच्या वतीनं शालेय विद्याथ्र्यासाठी राष्टीय ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘पॉवर ऑफ अनकन्व्हेंन्शनल थिंकिंग- द माईंण्ड दॅट ब्रॅन्चेस आऊट’ या विषयावर आठवी ते दहावी गटात आर्यमनचा निबंध देशात सर्वोत्तम ठरला. तोच हा निबंध वेगळ्या विचारांची वाट सांगणारा.
 
 
भन्नाट सुचलंय काही?
 
आर्यमन म्हणतो ते खरंच आहे. हातातून निसटलेली पेन्सिल खालीच पडेल, हे कशावरून? ती हवेत तरंगत पण ठेवता येऊ शकेलच की! आणि बुटाच्या लेस बांधायला वाकायलाच कशाला हवं?
लेसचे क्रॉसओव्हर घातले तर आपला सेलफोनपण हे काम करील की! हे असलं काहीकाही सुचत असतं, पण मग आपण म्हणतो, असं कधी होईल का? हे शक्य तरी आहे का? समजा, तुम्हाला दिला एक चान्स, की कितीही वेडगळ वाटू दे तुमची कल्पना, तुमचा विचार, पण तो ‘ऑक्सिजन’बरोबर शेअर करा.. तर?
-तेच तर सांगतोय आम्ही!!
आयडिया जितकी जास्त हटके, जितकी जास्त ‘स्टुपिड’, तितकं तुमचं जास्त कौतुक करू आम्ही!!
-फक्त त्या ‘मॅडनेस’मध्ये एक ‘मेथड’ असली पाहिजे. ही आयडिया कधीपासून तुमच्या डोक्यात आहे? कशी सुचली? 
त्याचं पुढे काय होऊ शकेल, असं तुम्हाला वाटतं?
हे सारं लिहून आम्हाला पाठवा किंवा मेल करा.
आमचा पत्ता - संयोजक, 'ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३, एम.आय.डी.सी, अंबड, नाशिक- ४२२०१०
email : oxygen@lokmat.com
अंतिम मुदत- 25 ऑक्टोबर
पाकिटावर- ‘भन्नाट’ असं लिहायला विसरू नका.