शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

3 अ अॅडिक्शनच्या खाईत लोटणारं त्रिकूट

By admin | Updated: October 8, 2015 21:03 IST

व्यसनं अनेक पदार्थांची असतात. तंबाखूसारखी वरकरणी निरुपद्रवी भासणारी व्यसनं असोत किंवा अफू, चरस, गर्द, दारू अशी शरीर-मनाचा विध्वंस करणारी व्यसनं असोत

- आनंद पटवर्धन
व्यसनं अनेक पदार्थांची असतात. तंबाखूसारखी वरकरणी निरुपद्रवी भासणारी व्यसनं असोत किंवा अफू, चरस, गर्द, दारू अशी शरीर-मनाचा विध्वंस करणारी व्यसनं असोत, त्यांच्यामुळे वाताहतच झाली, राज्य बुडाली असा इतिहास आहे. यादवांच्या इतिहासात जी यादवी झाली ती अतिरिक्त मद्य सेवनामुळेच हे विसरता येत नाही. अनेक साधू गांजा पीत असल्याचं कुंभमेळ्यात दिसलंच. म्हणजे या व्यसनांना एक इतिहास आहे. राजस्थानात अफू, महाराष्ट्रात माडी, पंजाबमध्ये कलिंगडाची, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात भांगेच्या गोळ्या आणि दक्षिणोत तोडी-ताडी, ईशान्य भारतात तांदळाची बिअर असा व्यसनांचा भूगोलही आहे.
या नशेच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारनं अमली पदार्थविरोधी कायदे केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष आहे. त्यांनी कुठून किती रुपयांचा माल पकडला याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होतात. काही राज्यांत संपूर्ण दारूबंदीचे प्रयोग झालेत. त्यातील बहुतेक राज्यांनी हळूहळू बंधने सैल केली किंवा अंमलबजावणीतली तीव्रता कमी केली. आंध्र प्रदेश आणि हरयाणात दारूबंदी झाली. त्याचा परिणाम सरकारी उत्पन्नावर झालाच, परंतु अवैध धंदेही वाढले. 
महाराष्ट्रात गडचिरोली हा एकमेव दारू नियंत्रण करण्यात आलेला यशस्वी जिल्हा आहे. आता यवतमाळसाठी प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र शासनाचे दारूविषयक धोरण जाहीर झाले आहे. त्यात शिताफीने सारे लक्ष जाणीव- जागृती आणि व्यसनमुक्ती केंद्रे यांवर दिलेले आहे. 
केंद्र शासनाकडून व्यसनमुक्ती केंद्रांना अनुदान दिले जाते. परंतु पुण्यासारख्या शहरात 75 रुपयांमध्ये दाखल झालेल्या मित्रंना चहा नष्टा, भोजन आणि रात्रीचं जेवण द्यावं आणि  कोणत्याही प्रकारचा निवास, भोजनाचा खर्च रुग्ण-मित्रंकडून घेऊ नये असे बंधन आहे. मात्र व्यसन थांबवल्यानंतर त्यांचा आहार वाढतो, पदार्थांच्या चवी कळू लागतात हे सर्व विचारात घेतले तर माणशी किमान 2क्क् रुपये खर्च होतो. त्यामुळे अनेक संस्थांनी अनुदान नाकारले आहे. आणि खर्च भागण्यासाठी फीचे दरही वाढवावे लागले आहेत.
पुण्यात वीस ते पंचवीस छोटी-मोठी व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. त्यामुळे पुणो शहर हे विद्येचं, खाण्या-पिण्याचं, आयटीचं म्हणून ओळखलं जातं तसं व्यसनमुक्ती केंद्रांचं शहरही झालं आहे.
या केंद्रांसह मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासही भेट दिल्यास व्यसनांसंदर्भातले काही गैरसमज लक्षात येतात. आणि म्हणूनही व्यसनातून मुक्तता अवघड होऊन बसते.
1) व्यसनी माणसं घरात नकोत म्हणून नातेवाईक अनेकांना केंद्रात आणून ठेवतात. सोय म्हणून वर्ष- दीड वर्ष केंद्रात ठेवतात. पण त्यातून व्यसन सुटत नाही, तर घरचेही त्या रुग्णापासून लांब जातात.
2) अनेक घरांत कुणी दारू पितंय, तंबाखू किंवा अन्य कुठलाही नशिल्या पदार्थाची नशा करतोय म्हणजे व्यसन करतोय असं वाटतच नाही. प्रमाण कमी असेल तर ते व्यसन नाही असाच एक समज. त्यामुळे अनेक तरुणांची व्यसनाधीनतेकडे वाटचाल सुरू राहते. 
3) व्यसन वाढतंय असं लक्षात आलं की आधी घरगुती उपाय, मग नवस, मग कर्मकांड, मंत्र-तंत्र करून ते सारं अपयशी झाल्यावर मग व्यसन गांभीर्यानं घेतलं जातं. त्यातही व्यसन करणा:या तरुणांमुळे घरातलं वातावरण बिघडायलं लागलं, नातेसंबंधांवर परिणाम होऊ लागला की मग ते व्यसन जाचक वाटू लागतं. आणि मग शेवटचा उपाय म्हणून पैसे जमवून त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावं लागतं.
 
--------------------
व्यसनवाटेवरचे 
3 टप्पे
 
1) आवड.
 प्रत्येक व्यक्तीला कशाची तरी आवड असतेच. जेवणातही काही विशिष्ट पदार्थ आवडतात. परंतु तो पदार्थ आत्ताच्या आत्ता मला मिळावा असा त्यांचा आग्रह नसतो. तसंच दारूचंही. केवळ मजा, सोशल ड्रिंक्स इतकाच दारूमध्ये रस असतो. आवड म्हणायचं त्याला. पण ती पुढे ढकलली तरी माणसाला विशेष त्रस होत नाही. 
2) संधी
आवड असलेले किमान 2क्} लोक पुढच्या टप्प्यावर कधी जातात हे त्यांनाही समजत नाही. ओढ लागते. तिचे विलक्षण आकर्षण वाटू लागते. दारू पिण्याची संधी कधी मिळेल हे ते शोधू लागतात. ती मिळाली नाही तर मुद्दाम मिळवली जाते.  जणू काही ही संधी पुन्हा मिळेल की नाही. इथून व्यसनाकडे प्रवास वेगानं होतो.
3) अनावर ओढ
शेवटचा टप्पा म्हणजे अनावर ओढ. ही दारूची ओढ अशी असते की मला कोणत्याही परिस्थितीत, आर्थिक किंवा भावनिक किंमत मोजून आत्ताच्या आत्ता दारू मिळालीच पाहिजे. इथे व्यसन हाताबाहेर जातं. या अवस्थेत
दवाखान्यात किंवा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून तातडीनं उपचार करणं गरजेचं ठरतं.