शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

टिकटॉकर्स नक्की कोण असतात ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:16 IST

टिकटॉकवर बंदी घालण्यात आली, त्याचं अनेक तरुण मुलामुलींना वाईट वाटलं, ते का?

ठळक मुद्देटिकटॉकर्स

- मुक्ता चैतन्य 

तीन-चार पोरांची गँग. पायऱ्या  चढायचं एक चॅलेंज. रिदममध्ये, परफेक्ट को-ऑर्डिनेशन करत त्या पायऱ्या  चढायच्या. त्या अनोळखी चेह:ऱ्या च्या मुलांचं तुफान को-ऑर्डिनेशन आणि तालावर होणाऱ्या हालचाली बघत राहाव्यात अशाच. असंच एक कामगार जोडपं. अनोळखी चेहऱ्याचं, हिंदी रोमॅण्टिक गाण्यावर नाच करणारं. त्यांच्यातली केमेस्ट्री मेन स्ट्रीम सिनेमातल्या हीरो-हिरोईन्सला लाजवेल अशी.असे बरेच.कुणी आपल्या कुत्र्याबरोबर नाच करतंय, तर कुणी हिंदी सिनेमातल्या प्रसिद्ध डायलॉग्जवर अभिनय करत बघणाऱ्याना तुफान हसवतंय. कुणी ग्रुपने क्लास रूममधला प्रॅन्कचा व्हिडिओ टाकतंय तर कुणी मेकअप आधीचा आणि नंतरचा..कालकालर्पयत हे सगळं सुरू होतं टिकटॉकवर. भारतात टिकटॉकचे 11.9 कोटीहून अधिक ग्राहक आहेत.अमेरिकेत अडीच कोटीच्या आसपास अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. अमेरिकेपेक्षा तिप्पट टिकटॉक यूजर्स भारतात आहेत.  भारतातलं सगळ्यात झपाटय़ाने वाढणारं अॅप किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून टिकटॉकने जम बसवायला सुरुवातही केली होती. टिकटॉकवर बंदी आली आणि आता यासाऱ्याला ब्रेक लागला आहे.मात्र टिकटॉकवर असणारे कोण आहेत हे टिकटॉकर्स?लोकडाऊननंतर शिल्पा शेट्टी आणि इतर  सेलिब्रिटीजने आपला मोर्चा टिकटॉककडे वळवला असला तरी टिकटॉक ख:या अर्थाने प्रसिद्ध केलं ते या देशातल्या ग्रामीण आणि निम्न मध्यमवर्गीय तरुण-तरु णींनी. इंडिया आणि भारतातला भेद सोशल मीडियामध्येही मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतो. त्यातच टिकटॉक हे ‘भारता’चं माध्यम बनलं.  ज्यांना, फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही, ज्यांच्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी हातातल्या स्मार्ट फोनव्यतिरिक्त इतर कुठलंही साधन नाही, ज्यांना त्यांच्या भावना, विचार शब्दात नीटपणो मांडता येत नाहीत. ज्यांना त्यांच्या भाषेचा न्यूनगंड आहे. आपल्या लिखित भाषेवर लोक हसतील असं ज्यांना वाटतं, ज्यांना शब्दांपेक्षा व्हिज्युअल्स अधिक जवळची वाटतात त्यांनी टिकटॉक हे माध्यम चटकन स्वीकारलं. अभिव्यक्तीचं ते सगळ्यात सहज, सोपं आणि आकर्षक माध्यम ठरलं.फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या माध्यमांकडे वळण्याऐवजी हे तरुण-तरुणी टिकटॉककडे गेले ते याच कारणाने. कारण, टिकटॉकवर कुणीही आपल्याला जज करणार नाही, आपल्या व्हिडिओवरून भेदभाव करणार नाही असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच टिकटॉकचा पसारा झपाटय़ाने वाढत गेला. इतका की कालर्पयत इन्स्टावर असण्यात अप मार्केट वाटून घेणारी तरुणाईही झपाटय़ाने टिकटॉककडे आली. त्यांच्यापाठोपाठ सेलिब्रिटिज आणि त्यापाठोपाठ वेगवेगळे ब्रॅण्ड्स. टिकटॉकवर सुरुवातील फक्त मिम्स होते, मग हळूहळू त्यात बास ड्रॉप्स, लीप सिंक्स, ब्यूटि आणि डेटिंग टिप्स या गोष्टी अॅड झाल्या. गेल्या काही वर्षात विनोदी व्हिडिओंपासून सिरिअस विषयांर्पयत टिकटॉकचा वापर यूजर्स करायला लागले.  15 सेकंदात तुमच्यातलं टॅलण्ट दाखवणं, एखादा विषय मांडणं, क्रिएटिव्हली गोष्ट समोरच्यार्पयत अचूकपणो पोहोचवणं ही अर्थातच वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अर्थात टिकटॉकवर सगळंच आलबेल होतं अशातला भाग नाही. वाढण्याच्या प्रचंड वेगात टिकटॉक सॉफ्ट पोर्नकडे झुकलं होतं. त्यावरून काही काळासाठी टिकटॉकवर बंदीही आलेली होती, त्यातून वाचण्यासाठी आणि भारतातला पसारा वाढता राहावा यासाठी टिकटॉकने त्यावेळी 6क् लाख पोस्ट्स डिलीट करून टाकल्या होत्या. इतकंच नाही तर आपली चिनी मुळं व्यवसायाला त्नासदायक ठरतायेत असं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचा सीईओ बदलला होता.टिकटॉकर्स आणि यू-टय़ूबर्स यांच्यात व्हच्र्युअल वॉर झालं आणि प्ले स्टोअरमध्ये भारतीय यूजर्सनी निगेटिव्ह कमेंट्सचा मारा केला तेव्हा गुगलने टिकटॉकची बाजू घेत निगेटिव्ह कमेंट्स डिलीट करून अॅपचं रेटिंग 4च्या खाली उतरणार नाही याची काळजी घेतली होती. हे सगळं इतकं डिटेलमध्ये सांगायचं कारण टिकटॉकसाठी भारतीय बाजारपेठ खूपच महत्त्वाची आहे. कारण चीननंतर जगातली ती सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. मुख्य म्हणजे ती टीनएजर्सची बाजारपेठ आहे. एका अगदी छोटय़ा खेडय़ात भेटलेल्या मुली जेव्हा म्हणतात की, ‘गावाबाहेर मला कुणी ओळखत नाही; पण जग मला ओळखतं’ तेव्हा टिकटॉकने या मुलामुलींना काय दिलंय याची जाणीव होते.ती जे म्हणाली त्याला उल्लूपणा म्हणून आपण खोडूनही काढू शकत नाही. टिकटॉक असं झिरपू  लागलं होतं. आता त्यावर सरकारने बंदी घातली आहे. त्यानं अनेकांना वाईट वाटणं म्हणूनही साहजिकच आहे. 

टिकटॉक डेटा चोरत होतं का?नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर तज्ज्ञ यासंदर्भात काही माहिती देतात.* टिकटॉक आयओएस आणि अॅण्ड्रॉइड सिस्टीम क्लीपबोर्डस अॅक्सेस करत होतं. दर काही सेकंदांनी यूजर्सच्या क्लीपबोर्डला पिंग करत होतं. म्हणजेच दर 1 ते 3 किस्ट्रोक्सनंतर टिकटॉक यूजर्सचा डेटा घेत होतं. * यात फोन हार्डवेअर डेटा, म्हणजे हॅण्डसेट मॉडेल नंबर, स्क्र ीनचा आकार, मेमरी या गोष्टींचा समावेश होता. * फोनमधल्या इतर अॅप्सचा डेटाही टिकटॉक गोळा करत होतं. इतकंच नाही तर फोनमधून डिलीट केलेल्या अॅप्सचा डेटाही टिकटॉक गोळा करत होतं. यात आयपी, लोकल आयपी, जीपीएस डेटा अशा काही गोष्टी होत्या.   * टिकटॉक असे काही कोड्स वापरात होतं ज्यामुळे फोर्स डाउनलोड आणि अनङिापिंग आणि रिमोट ङिाप फाइल्स रन होत होत्या. ज्यामुळे आयओएस 14 मध्ये एक नवीन फिचर अॅड करण्यात आलं आहे. ज्यात थर्ड पार्टी अॅप्सने सिस्टीम क्लीपबोर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला की पॉप अप नोटिफिकेशन येतं. 

(लेखिका मुक्त पत्रकार/समाज माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)