शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

कुछ स्वाद है जिंदगी में..

By admin | Updated: October 22, 2015 21:40 IST

शहरातली चॉकलेट ड्रिंक पिणारी जनताच कशाला आता खेडय़ापाडय़ातलं पोरगंही गर्लफ्रेंडला किटकॅट देऊन

 - अनघा पाठक 

(अनघा लोकमत टाईम्स वृत्तपत्रत सहायक उपसंपादक, आहे.)
शहरातली चॉकलेट ड्रिंक पिणारी जनताच कशाला आता
खेडय़ापाडय़ातलं पोरगंही गर्लफ्रेंडला किटकॅट देऊन 
 ‘फ्रेण्डशिप देते का?’  
असं सर्रास विचारतो. 
ऐंशी रुपयावाली ‘शिल्क’ दिली तर 
मग काय डायरेक्ट अमर-प्रेमच!!   
चॉकलेट हे असं आज एक प्रतीक बनलं आहे. 
भावना व्यक्त करण्याचं प्रतीक.
सॉरी म्हणायचं तर चॉकलेट, 
आय लव्ह यू म्हणायचं तर चॉकलेट. 
लो वाटलं तरी चॉकलेट,
हाय वाटावं तरी चॉकलेट.
हे असं चॉकलेटी का बनत चाललंय आपलं जगणं,
याची एक चॉकलेटी सफर.
 
चॉकलेट.
-हा शब्द विचारलं की सगळ्यात आधी  
डोक्यात काय येतं?
आपल्या भारतीय मानसिकतेला वाटू शकतं की, चॉकलेट म्हणजे काय लहान मुलांचा खाऊ फारतर बक्षीस! नाहीतर तर मग आजकालचं गिफ्टचं फॅड, बाकी काय?
पण चॉकलेट एवढंच आणि एवढं टिपिकल असं स्थान आपल्या आयुष्यात उरलेलं नाही.
कारण चॉकलेट हा शब्द उच्चरला की डोक्यात काय येतं, हा प्रश्न तरुणांना प्रत्यक्षात विचारला तेव्हा मिळणारी उत्तरं फार मजेशीर होती. एका अर्थानं चॉकलेटने आपल्या तरुणविश्वात केलेल्या उलाथापालथीची साक्षच देणारी होती. 
कल्पना करा, काय काय येतं आपल्या डोक्यात चॉकलेट असं नुस्तं कुणी म्हटलं तरी!  
कारण चॉकलेट म्हणताच अनेकांना आठवत होतं त्याचं पहिलं प्रेम, प्रेयसी, ङिांग, नशा, साहस, नवी ऊर्मी, डार्क फॅण्टसी आणि सेक्ससुद्धा. जे जे काही म्हणून तरुणाईशी रिलेटेड आहे ते म्हणजे चॉकलेट!
जे जे करायचं नाही असं थोरामोठय़ांनी सांगितलंय ते ते करायला लावणारं, त्या चोरीनंतर, मनाला वाटेल ते केल्यानंतर मिळणारं छुपं समाधान, वाममार्गी उपभोगी आनंद म्हणजे सीनफुल प्लेजर म्हणजे हे चॉकलेट.
 
लहान मुलांनी काही चांगलं काम केलं तर बक्षीस म्हणून किंवा अगदीच रडाय-बोंबलायला लागली तर त्यांना गप्प करण्यासाठी द्यायची गोष्ट म्हणजे चॉकलेट! इतकंच स्थान एकेकाळी या खाद्यपदार्थाचं आपल्या घरात, समाजात होतं. हळूहळू मात्र चॉकलेटला राजमान्यता मिळत गेली तरी  लहान मुलांसाठी असणारी गोष्ट ही चॉकलेटची ओळख ऐंशीचं दशक संपेस्तोवर कायम राहिली. ह्या लहान मुलांच्या खाऊने तरु णांना पहिल्यांदा भुरळ घातली ती नव्वदच दशक उजाडल्यावर. एक प्रख्यात चॉकलेटचा ब्रॅण्ड ‘क्या स्वाद है जिंदगी में.’ म्हणत आला. आणि तरुणांच्या सगळ्या भावनांचं दर्शन ह्या जाहिरातीनं घडवलं. पण सगळ्यात कळस ठरला तो या जाहिरातीचा शेवट. क्रिकेट खेळणा:या आपल्या प्रियकराने विजयी षटकार मारल्यानंतर बेभान नाचत, पोलिसांना चुकवत, चॉकलेट खात त्याला मिठी मारण्यासाठी एक अत्यंत सुंदर तरुणी पळत येते. जगाचं भानच विसरलेली ती एक अत्यंत आनंदी मुक्त मुलगी दिलखुलास जगताना दिसते. त्या एका शॉटने भारतातलं तत्कालीन तारुण्य, त्यांचं स्वातंत्र्य,  प्रेम, त्याचं एक्सप्रेशन अािण ह्या सगळ्याशी थेट नातं सांगणारं चॉकलेट. सा:याचाच संबंध आणि या सा:या गोष्टींची व्याख्याच बदलून टाकणारी एका वेगळ्या, नव्या काळाची ती नांदी होती!
 
चॉकलेटचा संबंध प्रेमाशी किंवा प्रणयाशी जोडणं हे पाश्चात्त्य जगाला नवीन नव्हतंच. मुळात चॉकलेट हे गरीब, कृष्णवर्णीय देशातून गो:या राजे-राजवाडय़ासाठी मागवलं जाणार उत्तेजक पेय होतं. त्याला कायमच एक्झॉटिक असण्याचं वलय होतंच. ते आजही आहेच. पण आपल्याकडे मात्र या चॉकलेटनं समाजाच्या जगण्याची रीतभात ठरवली हे नवीन, वेगळं आणि ट्रेण्डसेटर होतं!
 
चॉकलेटचा सर्वसमावेशकपणा वादातित आहे. वेगवेगळ्या त:हांनी, वेगवेगळ्या रूपात तरु णांच्या जगण्याचा हिस्सा बनण्याची ही चॉकलेटची ताकद थक्क करणारी आहे. सोनेरी कागदाच्या वेष्टनातून सटी-सहामासी घरी येणारी काळी-चॉकलेटी चौकोनी वडी ते चॉकलेट फ्लेवर डिओडरण्ट, साबण, गोरी करणारी क्रिम्स, सौंदर्य प्रसाधनं, कार फ्रेशनर, हेअर कलर आणि थेट कंडोम इथर्पयत चॉकलेट फ्लेवर येऊन ठेपला आहे. अर्थात अखाद्य वस्तूंची यादी वाढत जात असताना खाद्यपदार्थामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात येऊन चॉकलेट तरुणांना मोहिनी घालतच आहे. कोणत्याही महाविद्यालयाच्या कॅण्टिनमध्ये किंवा आसपासच्या फुड मॉलमध्ये चक्कर टाका. बापजन्मी ऐकली नसतील अशा पदार्थाची यादी मिळते. नेहमीचे पेस्ट्री, मूस, मिल्कशेक असले आयटम्स तर असतातच; पण त्याबरोबरीने, चॉकलेट डोसा, इडली, भेल, पान, कोफ्ता, चॉकलेट बर्गर, पॉपकॉर्न, पराठा ह्या पदार्थानी मेनूकार्ड भरलेलं असतं. उगाच नाही कॅड-बीसारख्या दुकानाच्या बाहेर रांगा लागतं. दुस:या बाजूला खेडय़ातलं पोरगं पण गर्लफ्रेंडला किटकॅट देऊन ‘फ्रेण्डशिप देती का?’ असलं सर्रास विचारतो. ऐंशी रुपयावाली ‘शिल्क’ (म्हणजे सिल्क!)  दिली तर मग काय डायरेक्ट अमर-प्रेमच!!   
चॉकलेट हे असं आज एक प्रतीक बनलं आहे. 
खरं तर भावनांचं प्रतीक. काहीतरी व्यक्त करण्याचं प्रतीक!
एखादी भावना व्यक्त करायची तर चॉकलेट आहे. सॉरी म्हणायचं तर चॉकलेट, आय लव्ह यू म्हणायचं तर चॉकलेट. अगदी वर्गात बरोबर उत्तर दिलं तरी चॉकलेट. आजकाल तर चॉकलेट दिल्याशिवाय पप्पू पास झाला हेसुद्धा सांगत नाही कोणी. आणि कुछ मिठा होत जाए म्हणत, सेण्टी मारत तर कधी बेधुंद नाचत नव्या नात्याची सुरुवात करू असं मार्केटिंग होत आपल्या घरात शिरतंय, आपलं एक्सप्रेशन बदलवतंय तेही चॉकलेटच!
सणावाराला देण्याच्या मिठाईची मक्तेदारी तर या चॉकलेटनं कधीच मोडीत काढली!
एवढं सगळं घडवून आणणं या एका निव्वळ खाद्यपदार्थ असणा:या गोष्टीला जमलं कसं?
ुते जमलं कारण म्हणजे चॉकलेट खाणं म्हणजे नुस्तं  जाणिजे यज्ञकर्म नाहीये. भूक लागली म्हणून क्वचितच कोणी चॉकलेट खात असेल. हातात चॉकलेट असण्याला अनेक अर्थ आहेत.  
सगळ्यात मोठा अर्थ आहे तो तरु ण असण्याचा.
चॉकलेट आवडतं, सगळ्या चांगल्या-वाईट क्षणात ज्याला सोबत करतं ते चॉकलेट, तो तरुण.
चॉकलेटला चकाकी आहे, ग्लॅमर आहे. सोनेरी मुलामा आहे. पाश्चात्त्य जगातून आलंय म्हणून त्याचं अप्रूप आहे. तिथल्या लाइफचं प्रचंड आकर्षण असणा:या तरु णांसाठी तर चॉकलेट म्हणजे उपभोगाचा आनंद आहे. तरु णाईच सेलिब्रेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिशात फारसे पैसे नसणा:या पण अधिकाधिक बंधमुक्त होऊ पाहणा:या तरु णाला आरामात खरेदी करता येण्यासारखं प्रॉडक्ट आहे. 
 
चॉकलेट म्हणजे फक्त वयानं तरु ण असणारं नव्हे तर मनानं तरुण असणंही आहे. सध्याच्या जाहिरातीही हेच दाखवतात. एक आजी म्हणते की माङो किती दिवस शिल्लक आहेत, हे मला माहीत नाही त्यामुळे चॉकलेटचा शेवटचा घास मी खाणार आणि मग ती खोडकर हसते. म्हणजे फक्त तरु ण चॉकलेट खातो असं नाही तर चॉकलेट खाणारा तरु ण असतो असं एक नवं समीकरणं बाजारपेठ तयार करतीये. आणि ते लोकांना पटतंही आहे कारण घरोघर चॉकलेट आवडणारे असे अनेक तरुण आहेतच. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वय वाढूनही तरुण दिसण्यात लपलेली आहेत असं आजच्या जगात जिथे अनेक लोकांना वाटतंय तिथं चॉकलेटची लोकप्रियता वाढते आहेच.
आणखी एक महत्त्वाचा आणि तितकाच गांभिर्यानं विचार करण्याचा मुद्दा म्हणजे आजच्या स्वकेंद्री होत जाणा:या  तरु णाईच्या जगण्याची चॉकलेट ही गरज बनत चालली आहे. स्वत:ला खूश ठेवण्यासाठी, स्वत:ला प्रोत्साहन देत चीअरअप करण्यासाठी, गेलेला मूड परत आणण्यासाठी, लो वाटत असेल तर फील गूड करण्यासाठी त्यांना चॉकलेट लागतं. त्यांच्यासाठी चॉकलेट म्हणजे स्वत:च स्वत:ला भेट द्यायची गोष्ट बनते आहे. एरव्ही खरं तर कुठलीही भेटवस्तू दुस:यानं आपल्याला द्यायची असते. पण ह्यात आपण दुस:याच्या नजरेत भेटवस्तू देण्यालायक आहोत का? तसं आपण काही केल आहे का? किंवा दुस:याला तशी इच्छा आहे का? आणि इच्छा असून त्यापायी खर्चायचे पैसे त्याकडे आहेत का? अशा अनेक शक्यता असतात, प्रश्न असतात.
मग काय आपण खूशच व्हायचं नाही का?
कुणी आपल्याला काही भेट देत नाही तर ना सही, आपणच आपल्याला गिफ्ट द्यायचं. चॉकलेट हेच तर सांगतं. खुदपसंद रहो, दुनिया गेली खड्डय़ात. तुम्ही स्वत:च्या नजरेत परफेक्ट आहात ना, मग स्वत:लाच चॉकलेट भेट द्या. खा. विसरून जा, स्वत:लाही, दुनियेलाही!
चॉकलेट ही काही फक्त विकत घेऊन खाण्याची गोष्ट राहिलेली नाही. निदान आज तरी नक्कीच नाही. कारण चॉकलेट विकणारे आज फक्त एक पदार्थ विकत नाहीयेत तर एक व्यवस्था विकत आहेत, जिच्यात आपल्याला आपलचं प्रतिबिंब दिसतं.
तुम्ही स्वत:च त्या त्या तुम्हाला आवडणा:या चॉकलेटसारखे असू शकता, बनू शकता.
 तुम्ही सिल्क असू शकता, क्रंची किटकॅट किंवा कडवट बोर्निवले असू शकतात. काहीही होवो, खूश राहू शकतात. असं चॉकलेट म्हणतंय..
आणि ते म्हणणं स्वीकारत चॉकलेट तरुण जगण्याचा भाग होत मस्त गुलाबी तारुण्याला चॉकलेटी टिण्ट बसतोय! थोडा गोड, कडवट, डार्क, कधी क्रंची आणि कधी फॅण्टसी होऊन जगण्याचा भाग होतोय.
अर्थात नेमकं आपलं चॉकलेट कुठलं आणि आपलं एक्सप्रेशन कुठलं हे ज्याचं त्यानं ठरवायचं, नाही का?
>>>
चॉकलेट है क्या?
 
चॉकलेट हा शब्द उच्चारला की कुठल्या गोष्टी लोकांसमोर येतात ह्याचा अभ्यास काही पाश्चात्त्य अभ्यासकांनी केला असता बरीच मजेशीर निरीक्षणो समोर आली. चाळिशीच्या पुढच्या लोकांना चॉकलेट म्हटल्यावर गोड चव,  रंग, खाऊ, अन्न स्वत:चं लहानपण किंवा अगदी डायबेटिस असं काही बाही आठवलं. मुलांच्या रगाडय़ात गुरफटलेल्या आयांना चॉकलेट म्हटलं की हट्टी मुलं, कॅविटी, चॉकलेट खाता खाता मुलांनी खराब केलेले कपडे आणि चॉकलेटच्या हट्टापायी मुलांना घातलेले धपाटे डोळ्यांसमोर दिसले. मात्र सगळ्यात इंटरेस्ंिटग उत्तरं दिली ती 16 ते 35 ह्या वयोगटातल्या तरुणांनी त्यांच्या दृष्टीने चॉकलेट म्हणजे लक्झरी, सौंदर्य, राजबिंडा थाट, प्रेम, दोस्ती, सेक्स आणि कंडोमर्पयत बरंच काही होतं!
.
.काय खायचं म्हणून सांगू? 
 
चॉकलेटच्या काही डेझर्टसची नावं तर चारचौघांत सभ्य माणसानं उच्चारू नयेत अशी आहेत; पण हीच नावं हॉटेल्स, बिस्त्रोस, कॅफेज आणि रेस्टॉरंटच्या मेनूकार्डवर दिमाखानी मिरवतात. सिनफुल प्लेजर, डीप डीप अॅण्ड ब्राऊन, डार्क फॅण्टसी, डेव्हिल्स किस असली नाव बापजाद्यांनी ऐकली असती तर त्यांना ङिाणङिाण्या आल्या असत्या. आता मात्र हीच नावं घेऊन शाळकरी पोरी-टोरीसुद्धा ठणाणा करत ऑर्डर सोडतात. 
 
 
 
चॉकलेट खाणा:या मुली
 
चॉकलेटसंदर्भात सर्वाधिक चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे त्याच्या जाहिरातींमध्ये होणारं स्त्रियांचं चित्रण. ह्या जाहिरातींमधल्या बहुतांश स्त्रिया ह्या व्हलनरेबल, मोहाला चटकन बळी पडणा:या आणि चॉकलेट पाहताच स्थळाकाळाची, चांगल्या-वाईटाची समज विसरणा:या अशा दाखवल्या जातात. चॉकलेटच्या  सिनफुल प्लेजर ह्या तत्त्वाशी मिळतंजुळतं हे चित्रण आहे हे. इतर जाहिरातींमध्ये क्वचितच एखादी स्त्री अस्ताव्यस्त अवस्थेत दिसते पण स्त्रीचं हे रूप चॉकलेटच्या जाहिरातींमध्ये आवर्जून पाहायला मिळतं. सेक्स केल्यानंतर दिसणारी स्त्री आणि चॉकलेट खाल्ल्यानंतर दिसणारी स्त्री ह्या दोन प्रतिमांमध्ये कमालीचं साम्य अनेक जाहिरातींत दिसतं. घुसमट सोडून मुक्त जगण्याची स्त्रियांची आस याचं चॉकलेट प्रतीक बनतं का. कदाचित!!