शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

शिरोलीच्या राजनच्या अफाट जिद्दीची गोष्ट

By admin | Updated: July 16, 2015 18:50 IST

खेळाडू घडवून ‘खेळ जगवण्याचा’ प्रयत्न करणा-या एका खेडय़ातल्या तरुणाची अनोखी गोष्ट..

सुरेंद्र राऊत

खेळाडू घडवून ‘खेळ जगवण्याचा’ प्रयत्न करणा-या एका खेडय़ातल्या तरुणाची अनोखी गोष्ट..
-----------
त्यांच्याकडे काहीही नाही. जीवनाच्या स्पर्धेत ङोपावण्यासाठी लागणा:या कोणत्याही भौतिक सुविधा, पैसा नाही. कुणाचे मानसिक पाठबळही नाही. तरीही यवतमाळ जिल्ह्यातल्या शिरोलीसारख्या दुर्लक्षित खेडय़ातला एक तरुण जिद्दीनं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतो आहे.  
राजन भुरे त्याचं नाव. 
समोर आलेल्या प्रत्येक अडचणीला पायरी बनवायचं अशीच त्याची जिद्द.  अत्याधुनिक सोयीसुविधा, खेळाडूसाठी लागणारा सकस आहार, मार्गदर्शन आणि घरातून मिळणारं पाठबळ यापैकी काहीच राजनच्या वाटय़ाला आलं नाही. अशाही स्थितीत उभं राहत या पठ्ठय़ाने राष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन स्पर्धा गाजविल्या. 81 स्पर्धापैकी 62 स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले. 2क्क्1 मध्ये पायाला झालेल्या दुखापतीने राजनचं धावणं बंद झालं होतं. पण, त्याची जिद्दच एवढी होती की तो कायमचा थांबणं शक्यच नव्हतं. 
म्हणून त्यानं ग्रामीण खेळाडूंना खेळण्यासाठी मार्गदर्शन करणं सुरू केलं. शेतात राबणा:या, गुरंढोरं राखणा:या महिला, शेती करणारे पुरुष यांच्यातले गुण हेरून त्यांना राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयार केलं. अर्थात साधनं तेव्हाही नव्हतीच. पण गोळ्याऐवजी गोल दगड, थाळीऐवजी चापट दगड हातात देऊन तयारी करून घेतली. धावण्यासाठी ट्रॅक बूट नव्हते, तर महिलांनी टायरी चप्पल दोरीने बांधून उघडय़ा माळरानावर सराव केला. या महिलांनीही चक्क लुगडे घालून अनवाणी पायाने मुंबईचे मैदान गाजवले. तेव्हा त्यांचा कोच कोण, असा प्रश्न अनेकांना पडला.
राजन भुरेने आज स्वत:ची क्रिकेट अकादमी उभारली आहे. त्यातले काही क्रिकेटपटू इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटसाठी सिलेक्ट झाले आहेत. अनेकजण राष्ट्रीय स्तरावरही खेळत आहेत. मुख्य म्हणजे साधनं नाहीत म्हणून रडत न बसता जे आहे ते वापरून खेळाडूंचा उत्तम सराव करून घेण्याचं काम राजन करतो आहे. स्नायू बळकट करण्यासाठी दुचाकीच्या खराब टायरचा तो वापर  करतो. सराव करताना गोलंदाजाला एका स्टम्पवर खेळणा:या बॅट्समनची विकेट घ्यायला लावतो, तर बॅट्समनला तीनऐवजी सहा स्टम्प ताशी 13क् ते 14क् वेगाचा बॉल खेळण्याचा सराव करवतो. खरंतर घरची गरिबीची परिस्थिती असल्यानं राजनचं प्राथमिक शिक्षण मामाकडे झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याला नऊ किलोमीटर पायी  जावं लागत असे. थायलंड, चीन, श्रीलंका येथील अॅथलेटिक्स स्पर्धा त्यानं गाजवल्या. दुर्दैव म्हणजे त्याची पत्नी 2क्क्6 मध्ये कन्सरने दगावली. ते दु:ख मनात साठवून त्यानं चार गरीब मुलं दत्तक घेतली. 
आज यवतमाळातील धामणगाव मार्गावर असलेल्या त्याच्या अकादमीलगतच्या पारधी बेडय़ावरची मुलंही क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. प्रचंड क्षमता आणि शारीरिक चपळता या मुलांमधे आहे. आपण प्रयत्न केले तर ही मुलं खेळात खूप प्रगती करतील, असं राजन मोठय़ा विश्वासानं सांगतो.