गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरची गरजच नाही;
कितीही रॅश चालवायचा प्रयत्न करा
ती चालणारच नाही.
ती कार तिच्याच डोक्यानं चालेल
आणि धावेलही!
तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेचा ‘एक गाडी, बाकी अनाडी’ आठवतोय का? एक टिपिकल लक्ष्या स्टाईल कॉमेडी. एकदम भन्नाट. या चित्रपटात लक्ष्याकडे एक गाडी असते. त्या गाडीची खासियत म्हणजे त्या गाडीला स्वत:ची अक्कल असते. जसा काही एका हुशार माणसाचा आत्माच त्या गाडीत असावा.
मला वाटतं 1989-9क्मध्ये कधीतरी हा चित्रपट आला होता. आता त्यानंतर तब्बल 25 वर्षे निघून गेली. प्रत्यक्षात मात्र आपल्या वाहनात फार फरक पडला नाही. नवे डिझाईन्स, माईलेजमधील किंवा वाहनाच्या इतर अंगांमधली पुढचे व्हर्जन, ऑटो-लॉकिंग, ऑटो गिअर्स आणि फार फार म्हणजे पेट्रोल-डिङोलबरोबरच आलेल्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार यापेक्षा फार काही वेगळा फरक इतक्या वर्षात वाहनात पडला नाही. कार म्हणजे कारच राहिली, आहे तशीच!
पण 199क्च्या काळात एका मस्त कल्पनेचा भाग असलेली ती हुशार कार प्रत्यक्षात येणो आता फार काही लांब नाही. आपल्याला माहीत असलेल्या या कारमध्ये क्र ांती घडवून आणण्याचा विडा आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी नाही तर गूगल, टेस्ला आणि अॅपल यांसारख्या डिजिटल क्षेत्रतल्या कंपन्यांनी उचलला आहे. त्यांना याबाबतीत हळूहळू मिळणा:या यशामुळे पारंपरिक कार कंपन्यांनीदेखील यामध्ये रस घ्यायला सुरुवात केली आहे.
रस्ते अपघातांत चूक कुणाची?
भारतातील रस्त्यांना अपघात काही नवीन नाहीत. मागील वर्षी भारतात दोन लाख 38 हजारांहून अधिक जणांचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला. याचा अर्थ सहा एअरबस ए 32क् विमाने कोसळून त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला तर जेवढी हानी होईल त्यापेक्षा थोडी जास्तच हानी रस्त्यांवरील अपघातात दररोज होते. (एअरबस ए 32क् हे भारतांतर्गत प्रवासासाठी वापरले जाणा:या विमानाचे एक आघाडीचे मॉडेल आहे).
या अपघातात चूक कुणाची असते? बहुतेक बातम्या वाचल्या तर अपघाताची कारणं साधारण चालकाच्या चुकीने, चालकाचे नियंत्रण सुटून अशीच असतात. गूगलसारख्या कंपनीने यातील मेख ओळखून अशा कारचं स्वप्न पाहिलंय की ज्यात कार ही पूर्णपणो स्वयंचलित असेल. वाहनातला सर्वात कच्चा दुवा, म्हणजे चालक यात पूर्णपणो वगळला आहे.
स्वयंचलित गाडी, म्हणजे ड्रायव्हरच नाही?
हो. नो चालक.
गूगलने ही स्वयंचलित कार तयार करताना सध्याच्या वाहनांचा, वाहतुकीचा, चालकांना गाडी चालवताना कराव्या लागणा:या कृतीचा बारकाईने अभ्यास केला आहे. चालक गाडी चालवताना नेमके काय काय करतो याचा अभ्यास करून प्रत्येक कामासाठी तंत्रज्ञानाचा खुबीने वापर या कारमध्ये केला आहे.
आता चालक नेमकी काय काय कामे करतो?
एक म्हणजे गाडीच्या आजूबाजूला लक्ष ठेवणो. म्हणजे वाहतूक किती आहे, रस्ता कसा आहे, मागून दुसरे वाहन येत आहे का, पुढे वळण आहे का, पुढे कुठले दुसरे वाहन किंवा इतर अडथळा आहे का, कुणी रस्ता ओलांडत आहे का वगैरे वगैरे गोष्टींवर गाडी चालवताना चालकाचे लक्ष असते. गूगलने याकामासाठी लेजर्स, रडार, कॅमेरे आणि सेन्सर्स वापरले. या तंत्रज्ञानाचे काम एकच. गाडीच्या आजूबाजूला लक्ष ठेवणं. आपल्याकडच्या लालदिव्यासारखा तंत्रज्ञानाचा हा लवाजमा गाडीच्या टपावर विराजमान असतो.
चालकाचे दुसरे काम म्हणजे या सगळ्या माहितीचा विचार करून पटापट निर्णय घेणं. म्हणजे समोरच्या स्कूटरवरील काकांना नेमके डावीकडे वळायचे आहे की उजवीकडे, समोरच्या कारला ओव्हरटेक करावं की नाही, आता ब्रेक दाबावा की फक्त स्पीड कमी करून भागेल वगैरे वगैरे. अनुभवी चालकाला सगळ्या माहितीचा वापर करून विनासायास निर्णय घेण्याची सवय झालेली असते. हे काम करण्यासाठी गूगलने पूर्णपणो नवीन सॉफ्टवेअर तयार केलं आहे. लेजर्स, रडार्स आणि कॅमे:यांकडून प्रत्येक क्षणी मिळणा:या प्रचंड माहितीचे लगोलग विश्लेषण करून कार योग्यरीतीने धावती ठेवण्याची जबाबदारी या कॉम्प्युटरची असते. यासाठी कार नकाशावर कुठे आहे, कुठला रस्ता, किती ट्राफिक वगैरे बाबी असोत किंवा समोर असलेली वस्तू कार आहे की दुचाकी आहे की माणूस आहे की म्हैस की दगड किंवा खड्डा आहे या सगळ्या गोष्टींचा निर्णय हा कॉम्प्युटर घेऊ शकतो. इतकेच नाही तर समोरच्या कारमधल्या चालकाने वळण्यासाठी इंडिकेटर सुरू केले किंवा दुचाकीस्वाराने हाताने इशारा केला तर अगदी तेसुद्धा ओळखण्याची सोय यात आहे. याशिवाय आजूबाजूला धावणा:या प्रत्येक वाहनाचा वेग आणि धावण्याची पुढील रेषा याचा अंदाजदेखील हा कॉम्प्युटर बांधतो. हे सगळे निर्णय घेऊन कारचा कॉम्प्युटर लगोलग ब्रेक, अॅक्सेलेरेटर, इंडिकेटर किंवा हॉर्न यांना योग्यप्रकारे नियंत्रित करतो.
आपल्याकडे गाडी चालवणा:यांचे प्रकार असतात. जगाला कंटाळल्यासारखे रॅश ड्राइव्हिंग करणारे किंवा दुस:या टोकाला घाबरून क्षणाक्षणाला ब्रेक मारणारे. या कारमध्ये अशांसाठी सेफ्टी लेव्हल सेटिंग बाय डिफॉल्ट काळजीपूर्वक चालावे यावर सेट आहे. म्हणजे सिग्नल सुटल्यावर भरपूर अपघात होतात. हे ओळखून ही कार हिरवा दिवा लागल्यावर लागणा:या शर्यतीत भाग न घेता एक पॉज घेऊन काळजीपूर्वक वेग पकडते.
प्रगत तंत्रज्ञानाची सांगड घातलेली अशी ही स्वयंचलित कार येत्या 5-1क् वर्षांतच सर्वत्र धावेल. आता एवढी भारी कार आपल्याला चालवायला मिळणार नाही म्हणून दु:ख मात्र वाटून घेऊ नका!
काय सांगावं, मिळेलही कदाचित. कधीतरी. भविष्यात!