शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बोलणा-याच्या कुळथाला भाव

By admin | Updated: July 2, 2015 15:13 IST

न बोलणा-याचे गहूही विकले जात नाही, हे व्यवहारज्ञान सांगणारं हे जुनंच स्किल, ज्याला आता प्रेझेण्टेशन म्हणतात. नुस्त्या ढोर मेहनतीला काही अर्थ नाही, तुमचं काम इतरांना ‘दिसलं’ पाहिजे!

समिंदरा हर्डिकर-सावंत
 
न बोलणा-याचे गहूही विकले जात नाही, हे व्यवहारज्ञान सांगणारं हे जुनंच स्किल, ज्याला आता प्रेझेण्टेशन म्हणतात. नुस्त्या ढोर मेहनतीला काही अर्थ नाही, तुमचं काम इतरांना ‘दिसलं’ पाहिजे!
----------
‘त्याला ना येत जात काही नाही, पण प्रेङोण्ट असं करतो स्वत:ला की, जसं काही हाच सगळं करतो! आणि आम्ही मात्र काम करकरून मरतो, पण कुणाला आमचं काम दिसतंही नाही!’
असा कलकलाट अनेकजण करतात. तुम्हीही करत असाल, पुढे पुढे करणारे, स्वत:चं काम दाखवून देणारे पुढे जातात आणि नुस्तं काम करणारे कुणाला दिसतही नाही ही आजकालच्या जगातली एक कॉमन तक्रार आहे!
पण या तक्रारीकडे निगेटिव्हलीच कशाला पहायला हवं? 
नव्या काळात प्रेङोण्टेशन स्किल हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. त्याला मराठीत आपण सादरीकरण कौशल्य म्हणू! आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या व्यावसायिक युगामध्ये तुम्ही स्वत:ला आणि तुमच्याजवळ असलेल्या कौशल्याला कशा प्रकारे प्रेङोण्ट करता, हे फार महत्त्वाचं बनत चाललं आहे.  गुणवत्ता असणं तर महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर गुणवत्तेला योग्य प्रकारे सादर करणं, आपलं काम लोकांना दिसू देणं, त्या कामाची चर्चा होऊ देणं आणि आपल्याला स्वत:लाही उत्तम प्रेङोण्ट करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.  
त्यामुळे उगीच या स्किलला कमी न लेखता, त्याकडे निगेटिव्हली आणि आकसापोटी न पाहता  प्रभावी सादरीकरण नावाची ही कला शिकून घ्यायला हवी. 
हल्ली ना प्रेङोण्टेशन म्हटलं की, एकच गोष्ट आठवते, पॉवर पॉईण्ट प्रेङोण्टेशन!
ते तर महत्त्वाचं आहेच. कम्प्युटरवर काम करून उत्तम पीपीटी करणं, ते उत्तम सादर करणं, आपला प्रोजेक्ट काय आहे, हे समोरच्याला प्रभावी पद्धतीनं सांगता येणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ते तंत्र शिकून त्यापद्धतीनं प्रेङोण्टेशन करणं ही नव्या काळात आवश्यक गोष्ट आहे. ती शिकून घ्यायलाच हवी. पण प्रेङोण्टेशन ही गोष्ट इथं संपत नाही, तर सुरू होते. 
पीपटी हा त्यातला एक अत्यंत छोटा, सुरुवातीचा पण महत्त्वाचा टप्पा! ते झालं एक टेक्निकल स्किल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे विचार कशा प्रकारे मांडता, तुम्ही लोकांबरोबर कशा प्रकारे कम्युनिकेट करता, तुमची संवाद कला कशी आहे अशा अनेक गोष्टींवर तुम्ही काम करणं गरजेचं असतं. 
तुमचं दिसणं, तुमचं वागणं, बोलणं, पीपीटी करणं, स्वत:ला इतरांसमोर सादर करणं, आणि त्यातून संवाद साधणं या सा:याचा या प्रेङोण्टेशन स्किल्समध्ये समावेश होतो.
ते शिकण्यासाठीची ही काही सूत्रं.
 
 
प्रेङोण्टेशन स्किल शिकण्यासाठी लागतं काय?
 
 * तुम्ही किती आत्मविश्वासाने तुमच्या विषयासंदर्भात बोलता याने पहिलं इम्प्रेशन उत्तम तयार होतं. तयारी उत्तम करा, घाबरू नका. नुस्तं पीपीटी करतानाच नाही तर एरव्हीही आपल्या विषयासंदर्भात बोलताना स्वत:वर विश्वास ठेवा की, जमेल आपल्याला.
हा आत्मविश्वास असेल आणि तुम्ही स्वत:वर भरवसा ठेवणार असाल तर तुम्हाला अनेक गोष्टी सहज जमतील!
 
* तुमचा आवाज स्पष्ट व खणखणीत ठेवा, घाबरू नका. त-त-अ-अ करणं ही अत्यंत वाईट गोष्ट दिसते. त्यातून कळतं की, तुमची तयारी झालेली नाही. त्यामुळे स्पष्ट, खणखणीत बोला.
*  तुमची बॉडीलॅँग्वेज तुमच्याविषयी बरेच काही सांगून जाते. तुमचे हावभाव, हातवारे, चेह:यावरचं हसू सर्व काही तुमच्या बोलण्याशी सुसंगत आहे का याकडे लक्ष द्या.
* तुमचा पोशाख, तुमची केशरचना हेसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या राहणीमानाकडे लक्ष द्या. 
*  नेहमीच मुद्याला धरून बोला. विषयांतर टाळा. उगीच गॉसीप, हवेत बाता मारणं, बडे दावे करणं टाळा!
* नेहमी वेळेची मर्यादा पाळा. वेळेवर पोहचणं, आपल्याला दिलेल्या वेळेत बोलणं, आणि इतरांच्या वेळेचा आदर करणं हे सारंही या कौशल्याचा भाग आहे.
* सगळ्यात महत्त्वाचं, इतरांचं ऐकून घ्यायला तयार रहा. अनेकदा तर बोला कमीच, जास्त ऐकून घ्या!