शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड असेल तर टिकाल, नाहीतर गाडी लावा सायडिंगला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:22 IST

आपण जे ठरवतो ते होतं, पेपर अवघडच जाणार म्हटलं की तो अवघडच जातो. सतत रडत राहिलं, तर हाती काहीच लागत नाही. म्हणून जरा सकारात्मक विचार करायला शिका.

ठळक मुद्देनन्नाचा पाढा कितीही म्हंटला, तरी मिळणार काहीच नाही!

-भूषण केळकर 

‘ए, उगाच अ‍ॅटिटय़ूड दाखवू नकोस!’‘अगं तिला फारच अ‍ॅटिटय़ूड आहे. स्वतर्‍ला फारच काही तरी समजते. शिष्ट आहे खूपच!’ वरील दोन्ही वाक्यात जो ‘अ‍ॅटिटय़ूड’ हा शब्द आहे तो नकारात्मक आहे. आणि त्यात अहंगंड दिसतो, इतरांना कमी लेखण्याची वृत्ती दिसते. अर्थातच असा नकारात्मक अ‍ॅटिटय़ूड असणं काही बरं नाही; पण अ‍ॅटिटय़ूडच नको असंही नाही.तो असावा पण ‘पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड. म्हणजेच ‘सकारात्मक दृष्टिकोन’. आता आजवर तुम्ही या सकारात्मक विचार आणि दृष्टी यासंदर्भात बरंच काही वाचलं असेल, तसे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डही फिरवले असतील. पण पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड हे सॉफ्ट स्किल्समधील एक महत्त्वाचं स्किल आहे असा विचार केला आहे का? मागील आठवडय़ात आपण ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’विषयी बोललो, त्याचीच ही पुढची पायरी. बार्बरा फेडरिक्सन नावाच्या संशोधिकेने अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामध्ये एक प्रयोग केला आणि त्यात तरुण-तरुणींना एकत्र करीत त्यांना खालील 5 प्रकारचे भावना उद्दिपित करणारे व्हिडीओ दाखविले 1) आनंदाचे 2) समाधानाचे 3) सर्वसाधारण तटस्थ 4) भीतिदायक आणि 5) चीड आणणारे.त्यानंतर या सर्व लोकांना काम दिलं होतं की एका ठरावीक प्रश्नाच्या उक्तीसाठी कृती आराखडा तयार करायचा होता. या प्रयोगातून असं सिद्ध झालं की चौथे व पाचवे क्रमांकाचे व्हिडीओ ज्यांनी पाहिले त्या लोकांना कृती आराखडा करताच आला नाही. ज्यांना तिसरा प्रकारचा म्हणजे साधारण तटस्थ व्हिडीओ दाखवला होता त्यांनी कृती आराखडा तयार केला. पण तो फारच सामान्य होता.पहिले दोन म्हणजे आनंद व समाधानाचे व्हिडीओ ज्यांनी पाहिले त्यांनी नुसता कृती आराखडा बनवला असे नाही तर त्यात अत्यंत वेगळ्या आणि खूप कल्पक सूचना केलेल्या होत्या.आपणा सर्वानाच कमी-अधिक प्रमाणात हा अनुभव येतो, खरं ना? मनाची अवस्था उल्हासित असेल तर आपण नुसतेच कार्यप्रवण होतो असे नाही तर त्यात आपण उत्तम क्षमतासुद्धा दाखवतो, कल्पकता आणतो. आणि म्हणूनच हा सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचे ‘सॉफ्ट स्किल’ आहे यात शंकाच नाही.हा सकारात्मक दृष्टिकोन प्रयत्नपूर्वक आणता येतो आणि वाढवताही येतो. त्यासाठी मानवसंसाधन विकास या मधील काही तज्ज्ञ व संस्थांनी संशोधन करून खालील पाच मार्ग सांगितले आहेत की जे आपण सगळेच म्हटलं तर प्रत्यक्षात आणू शकू. 1) नकारात्मक विचार कमी करणं र्‍  यासाठी योग, प्राणायाम, उपासना, ध्यान याच बरोबर सकारात्मक विचारांचं वाचन/मनन हे उपयुक्त ठरतं. विद्यार्थी परीक्षेत बरेचदा असा विचार करतात की, पेपर प्रचंड अवघड आहे आणि आता काही खरं नाही! नंतर त्यांच्या लक्षात येतं की पेपर सगळ्यांनाच अवघड गेलाय!2) सकारात्मक विचार करणारे मित्र जोडा र्‍ तुम्हाला आश्चर्य वाटेल पण केवळ एखाद्या सकारात्मक विचाराच्या माणसामुळे बाकीच्या माणसांचाही दृष्टिकोन बदलतो! माझं तुम्हाला खरंच सांगणं आहे की सगळी सिस्टीम वाईट आहे, सगळं जग तुम्हाला फसवणारंच आहे हा दृष्टिकोन ठेवणार्‍यांपासून चार हात दूर राहा आणि आनंदी-उत्साही-कल्पक मित्र जोडा!3) आपल्यात काय कमी आहे याची जाणीव जरूर असावी, पण आपल्याला काय मिळालं नाही याचबरोबर आपल्याला बर्‍यास चांगल्या गोष्टी मिळाल्यात त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवा.4) स्वतर्‍साठी आवजरून वेळ द्या र्‍ आपली बॅटरी चार्ज करण्यासाठी, थोडा हलकाफुलका वेळ आणि मनोरंजन असावं. खेळ, संगीत, नाटय़, नृत्य इत्यादी तुम्हाला रिचार्ज करतील.5) स्वतर्‍ला बक्षीस द्या र्‍ छोटे आनंदाचे क्षण लहान असले तरी यशाचे प्रसंग भरभरून एन्जॉय करा! 100 पैकी 95 मार्क्‍स मिळाले तर 5 कुठे गेले याचे विश्लेषण जरूर करा; पण दुर्‍ख उगाळत न बसता 95 मिळाल्याचे मनर्‍पूर्वक ‘सेलिब्रेट करा!