शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मोबाइलच बनेल क्रेडिट कार्ड

By admin | Updated: July 16, 2015 18:43 IST

नव्या तंत्रज्ञानानुसार आता तुमचा मोबाइल स्वॅप केला की झाले आर्थिक व्यवहार. गरजच नाही कार्डाची चळत सांभाळण्याची!

अनिल भापकर

नव्या तंत्रज्ञानानुसार आता तुमचा मोबाइल स्वॅप केला की झाले आर्थिक व्यवहार. गरजच नाही कार्डाची चळत सांभाळण्याची!
----------
तुम्ही सहकुटुंब एखाद्या प्रवासाला गेला आहात, मस्त एन्जॉय करता आहात, फिरणं-हॉटेलिंग आदि अगदी व्यवस्थित चालू असतं आणि अचानक तुमच्या खिशातील पाकीट चोरीला जातं. तुमचे पैसे, तिकीट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असं सारं चोरील  गेलेलं असतं. तुमच्याकडे तुमचा स्मार्टफोन फक्त शिल्लक असतो. तो तुम्हाला काही मदत करू शकेल असा विचार तरी त्याक्षणी तुमच्या मनात येतो का?
नाही ना?
पण आता ते शक्य आहे. आपला मोबाइलच डिजिटल वॉलेट म्हणून काम करू शकेल असे आता दिवस येऊ घातलेत! 
स्मार्टफोनमध्ये एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे तंत्रज्ञान आलं आहे. त्याच्या मदतीनं स्मार्टफोनचं रूपांतरच वॉलेटमधे होऊ शकतं!
 
एनएफसी हे तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे?
बॅँकिंग क्षेत्रत सर्वप्रथम पैशाने व्यवहार सुरूझाला. त्यानंतर मात्र चेक , डीडी, मनी ऑर्डर असे अनेक प्रकार मनीट्रान्सफरसाठी बॅँकांनी सुरू केले. त्यानंतर काळाप्रमाणो मनीट्रान्सफर किंवा बॅँकिंगची व्यवहार करण्याची पद्धत बदलत गेली. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक मनीट्रान्सफर असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान बॅँकिंग क्षेत्रत दाखलझाले. आता मात्र ई-कॉमर्स आणि बॅँकिंग क्षेत्रत ज्यांचा उल्लेख बॅँकिंगचे भविष्य म्हणून केला जातो आहे त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट. यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये एनएफसी हे फीचर असणं मात्र जरूरीचं आहे. आजघडीला जवळपास अनेक आघाडीच्या स्मार्टफोनमध्ये एनएफसी हे फीचर उपलब्ध आहे.
एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे असं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट अंतरावरून तुमचा एनएफसी असलेला मोबाइल फिरवला की क्रेडिट/डेबिट कार्डप्रमाणो पेमेंट करता येऊशकतं. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात काही खरेदी करता किंवा एखाद्या हॉटेलमध्ये बिल पेड करता त्यावेळी तुमचं क्रेडिट/डेबिट कार्ड त्या मशीनमध्ये स्व्ॉप करता आणि नंतर पिन टाकून पेमेंट करता. अगदी तसंच काहीसं मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट या तंत्रज्ञानात एनएफसीचा वापर करून केलं जातं. यामध्ये मोबाइल स्व्ॉप करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं मशीन वापरलं जातं. ज्यामध्ये एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे तंत्रज्ञान असलेला मोबाइल रीड होतो. मोबाईल स्व्ॉप करताना मशीनवरून एका विशिष्ट अंतरावरून फक्त फिरवला आणि तुमचा सिक्युरिटी पासवर्ड टाकला की हे मशीन तुमच्या मोबाइलमधील क्रेडिट/डेबिट कार्ड वाचून त्यातून पैसे कापून व्यवहार पूर्ण करेल. म्हणजे तुमचा मोबाइल यापुढे एक क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणून काम करेल. एका मोबाइलमध्ये अनेक कंपन्यांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरता येतं. सध्या काही बॅँकांनी एनएफसीचा वापर करून मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेटची सुविधा सुरू केली आहे.
एनएफसी तंत्रज्ञानाचे फायदे कुठले?
* एनएफसीचा वापर मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट म्हणून करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सिक्युरिटी. कारण आपण अनेक वेळा वाचतो की,अमुक एका क्रेडिट/डेबिट कार्डधारकाचे क्रेडिट/डेबिट कार्ड हॅक करून रक्कम परस्पर पळवली. 
* मात्र सिक्युरिटीच्या बाबतीत मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट अधिक सिक्युअर असल्याचे या क्षेत्रतील तज्ज्ञांचे मत आहे.
* एनएफसी तंत्रज्ञानाचा दुसरा फायदा म्हणजे तुमचा मोबाइल जेवढा तुम्ही सांभाळून ठेवता तेवढे तुमचे खिशातील वॉलेट ठेवत नाही. पर्यायाने तुमचा वॉलेट चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक असू शकते. 
* मोबाइल चोरीला जाण्याचे प्रमाण कमी आहे. कारण मोबाइल शक्यतो तुम्ही हातातच ठेवता. शिवाय वॉलेट चोरीला गेल्यामुळे त्यातील क्रेडिट/डेबिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. जर एनएफसीचा मोबाइल चोरीला गेला तरी अधिक कडक सिक्युरिटी फीचर्समुळे त्यातील क्रेडिट/डेबिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता नसते.
 
anil.bhapkar@lokmat.com