शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

लॉलिपॉप आणि नाईट्स कीपर

By admin | Updated: October 29, 2015 16:26 IST

मोबाइल सायलेण्ट मोडवर तर टाकायचा नाही, पण नकोसे कॉलच काय पण एसएमएसही आल्याचं कळायला नको, अशी दुहेरी जादू.

मानवी जीवनात झोपेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण झोप ही माणसाची शारीरिक आणि मानसिक गरज आहे. झोपेमुळे शरीराला आणि मनाला विश्रंती मिळते, माणूस ताजातवाना होऊन नव्या दमाने कामाला लागतो. मात्र ‘स्टे कनेक्टेड’च्या या जमान्यात माणूस दिवसेंदिवस झोपेला पारखा होत चालला आहे. याला कारण आहे तुमचा मोबाइल. 
मोबाइलने सर्वसामान्यांचे आयुष्य एवढे व्यापून टाक ले आहे की, सुखाची झोपसुद्धा या मोबाइलने हिरावून घेतली आहे. सतत तो स्क्रीन डोळ्यासमोर. सतत टुकटुक सुरूच. सतत दुनियाभरच्या नकोशा चौकश्या नी माहित्या आपण वाचतच राहतो. त्यात कधी दिवसभर थकूनभागून घरी गेल्यानंतर रात्री जरा कु ठे डोळा लागायची वेळ झाली की, मोबाइल वाजलाच म्हणून समजा. बरं काही कामासाठी कॉला असेल तर ठीक  आहे, आपण समजू शक तो; मात्र अनेक वेळा येणारे कॉल बिनकामाचे असतात. त्यामुळे के वळ आपली झोपमोड होते. बाकी काहीच फादा होत नाही. अशावेळी आपल्याला कॉल करणा:यांचा प्रचंड राग येतो. त्याचप्रमाणो मोबाइलचादेखील वैताग येतो. शिफ्टमध्ये काम करणा:यांसाठी तर मोबाइलमुळे झोपमोड झाली की पूर्ण दिवस खराब जातो. बरं मोबाइल ही आपली जीवनावश्यक  गरज झाल्यामुळे बंदसुद्धा क रू न ठेवता येत नाही. मोबाइल म्हणजे सांगता येत नाही आणि सहन क रताही येत नाही असं दुखणं होऊ न बसलं आहे. मात्र आता या सर्व त्रसापासून ब:यापैकी सुटका होणार आहे. कारण आता लेटेस्ट अॅण्ड्रॉईड अर्थात लॉलिपॉप या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये असे एक फीचर दिलेले आहे ज्यामुळे   झोपसुद्धा शांतपणो होईल आणि मोबाइल बंद क रू न ठेवायची वेळदेखील तुमच्यावर येणार नाही. यामध्ये तुम्ही तुमचा मोबाइल काही विशिष्ट वेळेपुरता सायलेंट करू शकता.                                                      
 
लॉलिपॉपमधील इंटरप्शन                                         
लॉलिपॉप या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममधे सेटिंगमधे गेल्यावर साउंड अॅण्ड नोटिफिकेशन्स या भागात तुम्हाला इंटरप्शन हे ऑप्शन दिसेल किंवा व्हॉल्यूम बटण दाबून प्रायोरिटी नोटिफिकेशन्सच्या सेटिंगमधून इंटरप्शनमधे जाता येतं. त्याचा वापर करून मोबाइल किती वेळ सायलेण्ट ठेवायचा हे ठरवता येतं. उदाहरणार्थ रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेर्पयत  कॉल्स आणि मेसेजसुद्धा नको आहेत, तर तसे तुम्ही स्टार्ट टाइम आणि एंड टाइम सेट करूशकता. फक्त कॉल्स सायलेंट करायचे क ीमेसेजसुद्धा सायलेंट करायचे हेसुद्धा ठरवू शकता. तसेच आठवडाभरात किती दिवस हे शेडय़ुल ठेवायचं हे नक्की करता येतं. त्यासोबत ऑल क ॉण्टॅक्टसाठी डू नॉट डिस्टर्ब सेट करायचे क ीफक्त स्टार क ॉण्टॅक्टसाठी सेट करायचे हेदेखील ठरवता येईल. म्हणजे महत्त्वाचे नंबर तुम्ही स्टार क ॉण्टॅक्ट म्हणून सेव्ह केले असतील तर अशा नंबरवरून कॉल आल्यास रिंग टोन वाजेल आणि इतर नंबर्सवरून कॉल आल्यास रिंग टोन वाजणार नाही. यामुळे तुमचे महत्त्वाचे कॉल मिस होणार नाहीत. 
                                                                     
नाईट्स कीपर
ज्यांच्या मोबाइलमधे लॉलिपॉप ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम नाही त्यांच्यासाठी गुगल प्लेवर नाईट्स कीपर हे अॅप उपलब्ध आहे ज्याचा वापर करून तुम्ही डू नॉट डिस्टर्ब या सुविधेचा लाभ घेऊ शकता. नाईट्स क ीपर हे अॅण्ड्रॉईड अॅप्लिके शन मोबाइलवर इन्स्टॉल केलं क ी जगणं सुसह्य होऊ शकतं. नाईट्स क ीपरमधे तुम्ही तुमची झोपायची वेळ सेट क रू  शक ता. म्हणजे समजा तुम्ही रात्री अक रा वाजता झोपत असाल आणि सक ाळी सहा वाजता उठत असाल, तर नाईट्स क ीपर प्रोफ ाईलमधे ही वेळ फि ड क रा. म्हणजे या वेळेत तुमच्या मोबाइलवर जे क ाही क ॉल येतील, त्यावेळी तुमच्या मोबाईलची रिंग वाजणारच नाही. म्हणजे अक रा ते सहा या वेळेत तुमचा मोबाइल सायलेंट मोडवर असेल. 
मात्र या वेळेत जर क ाही महत्त्वाचे क ॉल आले तर? त्यासाठी नाईट्स क ीपर या मोबाइल अॅपमध्ये व्हाइट लिस्ट हा एक  प्रक ार असतो. व्हाइट लिस्टमधे तुम्ही तुमचे मोजके च काही महत्त्वाचे मोबाइल क ॉन्टॅक्ट अॅड क रू  शक ता. म्हणजे जेव्हा या व्हाइट लिस्टमधील क ॉण्टॅक्ट नंबरवरू न क ॉल येईल तेव्हाच तुमची मोबाइलची रिंग टोन वाजेल. अन्य नंबरसाठी मात्र तो सायलेंट मोडवर राहील. म्हणजे आपोआपच बिनक ामाचे क ॉल आल्यामुळे तुमची झोपमोड होणार नाही. त्याचबरोबर समजा व्हाइट लिस्टव्यतिरिक्त एखादा इमजर्न्सी क ॉल आला तर त्यासाठीसुद्धा नाईट्स क ीपरमधे अशी सुविधा आहे क ी, जेव्हा एखाद्या नंबरवरू न रिपिट क ॉल येत असेल तर तो इमजर्न्सी क ॉल आहे असे समजून नाईट्स क ीपर त्या रिपिट क ॉलसाठी रिंगटोन वाजेल. मात्र कि ती वेळा कॉल रिपिट झाला म्हणजे रिंगटोन वाजला पाहिजे हे तुम्ही ठरवू शक ता. म्हणजे इमजर्न्सी  क ॉलसुद्धा मिस होणार नाही.
या अॅपचा वापर तुम्ही इतरही ठिक ाणी क रू  शक ता. जसे क ी, समजा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये आहात त्यावेळी वन्स या प्रोफाईलमधे जाऊ न तुमची मीटिंग कि ती वाजेपासून कि ती वाजेर्पयत आहे हे फि ड करू  शक ता. म्हणजे तेवढा वेळ तुमचा मोबाइल सायलेंट मोडवर राहील आणि त्यानंतर आपोआप नॉर्मल मोडवर येईल. 
अत्यंत उपयुक्त आणि तेही मोफ त उपलब्ध असणारं हे अॅप.  मोबाइल डोके दुखी ठरू नये म्हणून हा सोपा मार्ग.
अधिक माहितसाठी - - https://play.google.com/store/apps/details?id=com.nightskeeper&hl=en
 
- अनिल भापकर