शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘ख्वाडा’वाला भाऊराव

By admin | Updated: April 10, 2015 13:42 IST

श्रीगोंदा तालुक्यातल्या ‘गव्हाणोवाडी’तला पोरगा. त्याच्या डोक्यात सिनेमाचा ‘कीडा’ गेला. त्यातून ‘लोकमत’च्या मैत्र पुरवणीने त्याला हिंमत दिली. सांगितलं की जा पुढे. डरू नकोस. हा टमटम चालवणारा, शेती करणारा पोरगा! ने शेती विकली आणि त्या पुंजीवर सिनेमाच्या जगात घुसला!! - आणि आज तोच पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा बहाद्दर म्हणून देशात गाजतो आहे. त्याची ही गोष्ट.

 श्रीगोंदा तालुक्यातल्या ‘गव्हाणोवाडी’तला पोरगा. त्याच्या डोक्यात सिनेमाचा  ‘कीडा’ गेला. त्यातून  ‘लोकमत’च्या मैत्र पुरवणीने त्याला हिंमत दिली. सांगितलं की जा पुढे. डरू नकोस.

हा टमटम चालवणारा, शेती करणारा पोरगा! - त्याला पुण्याच्या एफटीआयने नाकारलं.
पण तो हिंमत हरला नाही. त्याने शेती विकली आणि त्या पुंजीवर सिनेमाच्या जगात घुसला!!
- आणि आज तोच पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा  बहाद्दर म्हणून देशात गाजतो आहे. त्याची ही गोष्ट, त्याच्याच शब्दात!! 
 
गव्हाणोवाडीतून निघून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला, तरी 
अजून न संपलेल्या स्ट्रगलची हिंमतबाज कहाणी
 
- भाऊराव क:हाडे, 
‘ख्वाडा’ या 
राष्ट्रीय पारितोषिक चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक. 
 
 
 
मित्रंनो, गप्पांची नेमकी सुरुवात कोठून करावी?..सिनेमाचं बीज पेरणा:या दिवसापासून.? दिग्दर्शक होण्याचं स्वप्न जागवणा:या लोकमतच्या ‘मैत्र’ (आताची ऑक्सिजन) पासून.? हाफचड्डीत गावभर पाव विकण्याच्या आनंदापासून.? टमटम हाकताना त्या आवाजात लागलेल्या तंद्रीपासून.? प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या अन् अनुभव देऊन जाणा:या माणसांपासून की ‘ख्वाडा’च्या जन्मकथेपासून.? अनेक प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे.
-एक नक्की, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील ‘स्पेशल ज्युरी अवॉर्ड’ गाठूनही उत्तरं शोधण्याची उर्मी संपलेली नाही. 
गावातले दिवस..
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातलं ‘गव्हाणोवाडी’हे माझं गाव.  चौथीत असताना याच गावात मी पाव विकायचो. शेती जेमतेम. तीही कोरडवाहू गटात मोडणारी. आई-वडिलांचे काबाडकष्टातले दिवस. गावात एका बडय़ा आसामीकडे असलेल्या टीव्हीचं तेव्हा फार आकर्षण. त्याहीपेक्षा सण-उत्सवाला टीव्हीवर लागणा:या सिनेमांचं प्रचंड वेड. साधारण 6-7 वर्षाचा असेल, जेव्हा मी ‘मैने प्यार किया’ हा आयुष्यातील पहिला चित्रपट टीव्हीवर बघितला. शोलेही असाच दिसला टीव्हीवर. चित्रपट पाहिला की आतून काहीतरी व्हायचं. नक्की काय असायचं ते? शब्दात आजही नाही सांगता यायचं. अकरावीला शिरुरच्या सी.टी.बोरा महाविद्यालयात शिकत होतो. खरंतर चौथीच्या पुढे मजल मारणारा घरातील मी एकमेव. मोठा भाऊ विठ्ठलराव चौथी पास. तो टमटम चालवायचा. मीही त्या काळी घराला हातभार लावण्यासाठी टमटम हाकायचो. सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी टमटम नंबरला लावायची. कॉलेज सुटलं की बारा वाजेपासून टमटमवर जिंदगीची लढाई सुरू व्हायची. पण तेव्हाही टमटमच्या ‘घुर्रùù..’च्या आवाजात चित्रपटाची तंद्री लागायची. अशीच बारावी झाली. पुढे काय? मी ठरवलं होतं, सिनेमा करायचा! पण घरी सांगणार कसं? हिंमत जुळवताच आली नव्हती. नातलगांची पोरं सैन्यात दाखल झाली होती, ‘तुही जा’ म्हणून घरातून तगादा. पण माझं वेगळंच ठरलेलं; मात्र सांगता येईना. अशात बारावी नंतरची दोन वर्षे अशीच निघून गेली.  शेती करत होतो. याच काळात वडील गेले.
अन् एफटीआय..
शेतीचे दिवस भराभर पुढे सरकत होते. एकदा कांदा विकण्याच्या निमित्ताने पुण्यात प्रवेश झाला. बाजार समितीतील रात्र कांद्यांच्या गोण्यांवर काढल्यानंतर उगवलेली पहाट नवी ऊर्जा घेऊन आली. कांदे विकले आणि पायपीट करत लॉ कॉलेज रोडवरचं ‘एफटीआय’ शोधून काढलं. अर्थात बाहेरून दिसलेल्या इमारतीच्या आत डोकावणं काही मला जमलं नाही. तिथे जायचं तर पदवी लागते, मी आपला बारावी पास! कसा टिकणार? म्हणजे स्वप्नांचं दार बंद झालं होतं, ते असं! 
खर सांगू, बीए वगैरे ही शिक्षणातील नवी भानगड मला तेव्हाच कळली होती. आम्ही आपले दहावी, बारावी, पंधरावीवाले! मग ठरवलं आधी ग्रॅज्युएट व्हायचं. चित्रपटासाठी काहीही करायची माझी तयारी होती. मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाने पुन्हा एकदा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. 
 एकदाची पदवी मिळाली. पुन्हा एफटीआयच्या दारावर. पण आता इंग्रजीमुळे अडलं. सारा अभ्यासक्रम इंग्रजीतून. आणखी एकदा दांडी उडाली. काय करायचं, प्रश्न होताच. उत्तर सापडलं..चला नगरला!
नगर..पाथेरपांचाली...
नगरला लॉ कॉलेजला प्रवेश झाला. इंग्रजी पक्कं होईल, असा या प्रवेशामागील हेतू! काहीतरी आणखी करावं म्हणून ‘जर्नालिझम आणि व्हिडीओ प्रॉडक्शन’ या नव्यानंच सुरू झालेल्या कोर्ससाठी न्यू आर्टस् कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. व्हिडीओ या एका शब्दासाठी हा खटाटोप. या कोर्सचा आणि चित्रपटाचा अर्थाअर्थी संबंध नव्हता. पण कॅमेरा हाताळायला मिळणार म्हटल्यावर तेही केलं. माझं जग बदलणारी घटना येथेच घडली. समर नखाते आयुष्यात आले ते येथेच. ते पुण्याच्या एफटीआयचे माजी डीन होते. नगरला ‘गेस्ट लेरर’ म्हणून यायचे. त्यांच्या बोलण्यातून हॉलीवूड कळलं. 2क्क्8 मध्ये त्यांनी मला सत्यजित रे यांच्या ‘पाथेरपांचाली’ची दिलेली सीडी मी 32 वेळा पाहिली, अधाशासारखी! सेव्हन समुराईचा आकिरा कुरासोवा, डेसिका, मेल गिब्सन अप्रत्यक्ष भेटत राहिले ते नखाते सरांमुळे. चार्ली चॅप्लीनच्या ‘दि किड’ पासून ते जब्बार पटेलांच्या ‘जैत रे जैत’ र्पयत हाती येईल, ते सिनेमे पाहात सुटलो. त्यातूनच माझं शिक्षण सुरू होतं बहुतेक. हीच माझी एफटीआय! 
पण आजही मी एफटीआयच्या प्रवेशाची संधी शोधतोय. आवश्यक पात्रता मिळवण्यासाठी झटतोय.
‘ख्वाडा’चा जन्म..
याच काळात पुणो-मुंबई वा:या सुरू झाल्या होत्या. काही जमतं का म्हणून फे:या सुरू झाल्या होत्या. कधी आकाशवाणी भवन, कधी आमदार निवास..अशा ठिकाणी पथारी पसरवून दिवस काढायचो. पैसे संपले की घरी. पुन्हा दोन दिवसांनी पुणो-मुंबई सुरू. चक्र असंच सुरू होतं. 
एकदा मुंबईहून पुण्यात आलो. रेल्वे स्टेशनवर उतरलो. उन्ह्याळ्याचे दिवस होते. 2क्क्1 चे ते वर्ष. शेकडो उतारू होते, माङयासारखेच! त्यातही काही लक्षवेधी. त्यापैकी एकाकडे सहज विचारपूस केली. तेव्हा कळलं मराठवाडय़ातून आलेली ही मंडळी होती. माङयाशी बोलणारा औरंगाबाद जिल्ह्यातील कुठल्यातरी खेडय़ातला. त्याची स्वत:ची 35 एकर शेती. दुष्काळामुळे पाणी नाही. पण जगणं तर सोडता येत नाही, हा त्याचा तेव्हाचा प्रश्न. चाचपणी केली तर हे लोंढे विदर्भ, मराठवाडय़ातील! दुष्काळाने होरपळलेले!!  35 एकर शेतीचा मालक जगण्याच्या लढाईसाठी पुण्यात पडेल ते काम करायला येतो, याच घटनेने  मला आंतरबाह्य हादरवून टाकलं. ‘ख्वाडा’च्या कथेचं बीज पडलं, ते असं! पुढे अशी असंख्य माणसं भेटत राहिली. लातूरच्या भूकंपात सर्वस्व गमावल्यानंतर 1क्-12 र्वष पुण्यात काढलेले गृहस्थ भेटले, ते अशाच भटकंतीत! त्यांनी जे काही सांगितलं त्याने हादरलो होतो. मग गावाकडे भटकणा:या मेंढपाळाच्या मनाचा ठाव कुठेतरी लागत होता. तेही असेच भटके..कायम स्थलांतरित. त्यांच्याच संवेदना ‘ख्वाडा’च्या केंद्रबिंदू झाल्या. एक सशक्त स्क्रिप्ट तयार झाली होती. अनेकांना दाखवत फिरलो. जवळपास प्रत्येकालाच ती आवडली.  पण त्यावर चित्रपट? कोणीही तयार नाही. ज्यांची तयारी, त्यांना माङया दिग्दर्शीय कौशल्यावर विश्वास नाही. त्यांनी तो तरी का करावा? असं म्हणून स्वत:च स्वत:ला सावरायचो. 
 
2क्13..
आता आपल्याला करायचाय तो चित्रपट आपणच  केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे पुरतं समजून चुकलं होतं. तोवर 2क्13 उजाडलेलं.  माङो उपद्व्याप घरापासून लपून होते. घरी कसं सांगावं, हा जुनाच प्रश्न आ वासून उभा होता. पण यावेळी केली हिंमत! भाऊ आणि आईला सांगितलं, मला सिनेमा करायचाय.  त्यांना तो धक्काच होता. त्यासाठी हाती असलेली थोडीफार जमीन विकावी, ही कल्पना त्यांना पचणं अवघडच! पण जगाला पटवण्यात अपयशी झालेलो मी, घरात समजावण्यात पुढे यशस्वी झालो. दोघांनाही मी दाखवलेल्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाने माझी दखल घेण्यास भाग पाडलं असावं. दोन एकर ठेऊन बाकी शेती विकली. त्यातून आलेल्या 45 लाखातून ‘ख्वाडा’च्या चित्रीकरणाचा प्रवास सुरू झाला. 
 
अडचणींचा डोंगर
तरीही अडचणी पाठ सोडीनात!  मे 2क्13 मध्ये सुरू झालेल्या चित्रीकरणावर जूनच्या पहिल्या आठवडय़ात आलेल्या पावसाने पाणी फेरलं. दोन दिवसात पाऊस थांबेल, असा आमचा अंदाज. वीस दिवस झाले तरी तो थांबेना. तोवर कोरडय़ा रुक्ष वातावरणाने अंगावर हिरवाईची चादर पांघरली. यामुळे चित्रीकरणाचा अख्खा पोत बिघडला. एव्हाना पंचेचाळीस लाख संपले होते. हा काळ झालेलं  चित्रीकरण संपादित करून घेण्यासाठी वापरला. पैशासाठी निर्मात्याचा शोध सुरू केला होता. पण सारं व्यर्थ! पुन्हा गाडं येऊन थांबलं  ते उरलेल्या दोन एकर जमिनीवर. तोवर सर्व सुरळीत सुरू असल्याचा समज आई आणि भावाने करून घेतला होता. अडचणी त्यांना कळूच दिल्या नव्हत्या. पुन्हा भाऊ मदतीला धावून आला. उरलेली दोन एकरही विक्रीस काढली. पण आता नवीनच अडचण उभी राहिली. घेण्याची तयारी दाखविणा:यांनी भाव पाडले. म्हणजे जमीन विकूनही मेळ बसेना! तोवर इकडे कलाकार अस्वस्थ. नव्यांचा तर विश्वास उडाला. चित्रपटात एका पहिलवानाची भूमिका आहे, त्याचं वजन घटलं.
सर्व बाजूंनी अडचणींचा डोंगर असताना काही ‘माणसं’ मला याच काळात भेटली. कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे त्यातील एक. अर्धवट पडलेला ‘ख्वाडा’ मी त्यांच्यासमोर मांडला. मदत करा, म्हणून आजर्वं केली. त्यांनी पाच लाखाचा चेक लिहून दिला. बाहेर पडताना दहा लाख मागितले असते तर बरं झालं असतं, असा विचार उगाच मनात चमकून गेला. पण त्या पाच लाखांनी पुन्हा उभारी दिली होती. चित्रपटात पहेलवान रंगवणा:या भाऊ शिंदेने आपला ट्रक विकून साडेपाच लाख दिले. चंद्रकांत राऊत मदतीला धावून आले. त्यांनी साडेअकरा लाख लावले. शेवटी अनेक अडथळे पार करत ‘ख्वाडा’चं चित्रीकरण संपलं!
आणि राष्ट्रीय पुरस्कार..
‘ख्वाडा’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी पाठविला. मार्चमध्ये पुरस्कार जाहीर झाले अन् स्पेशल ज्युरी अवॉर्डने धक्का दिला. ध्वनिमुद्रणाचा पुरस्कार महावीर सब्बनवार यांना जाहीर झाला. म्हणजे दुधात साखर! 
आजचा मी..
आताचा अनुभव? कसा मांडावा? मी तुम्हाला माहीत झालोय. माङयातही काहीतरी डिफरंट मटेरियल आहे, हे जगाला जाणवलं आहे. माझी उठाठेव व्यर्थ नव्हती, हे खुद्द मला पटलंय. आणि हो, जबाबदारीची जाणीव अधिकच वाढलीय!  गेल्या काही दिवसांपासून माझं जग बदललं आहे. पण ‘ख्वाडा’ येथेच थांबतो का? माङया दृष्टीने नाही. त्याला प्रेक्षकांर्पयत पोहचविण्याचं एक मोठंआव्हान अद्याप शिल्लक आहे. रवी जाधव मदतीला धावून आले आहेत. तरीही अडचणी संपलेल्या नाहीत. 
मित्रंनो, आपल्या मतांवर  आणि मनावर ठाम राहिलो तर एके दिवशी जग तुमची दखल घेतंच! हा माझा जगण्याचा मंत्र आता अनुभवसिद्ध झाला आहे. वा:याची दिशा बदलवण्याची क्षमता आपल्यात आहे..फक्त हिंमत दाखविण्याचा अवकाश आहे. आपण सर्व सोबत आहोत म्हटल्यावर डरायचं कारण तरी काय? 
शब्दांकन- अनंत पाटील
 
 
 
‘मैत्र’नं दिला
जगण्याचा ‘ऑक्सिजन’!!
आज   ‘लोकमत’च्या ऑक्सिजनमध्ये मला आणि माङया लेखनाला स्थान मिळणं हे माङयासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नाही. त्याचं कारणही तसं खास.! माङयातला दिग्दर्शक जन्मला, तो याच ‘मैत्र’ (ऑक्सिजन) मुळे!  
साधारण माङया दहावी-अकरावीचा काळ होता. तेव्हा माङया चित्रपटाविषयीच्या कल्पना म्हणजे अगाध! अजय देवगण, सलमान वगैरे मंडळींचं मनावर गारुड! आणि हो नाना स्पॉटही आठवतो. तुमच्यातील अनेकांसारखंच माझंही तेव्हाचं सिनेमाचं  जग. 
त्या काळात ‘लोकमत’ची मैत्र पुरवणी माङया मेंदूत इंधन भरायची. अनेक व्यक्तिमत्त्वं या पुरवणीतून भेटायची. याच वाचनात मला एकदा एक दिग्दर्शक भेटला. मैत्रच्या पानात उतरलेला त्यांचा संघर्ष वाचून मी हरखलो. त्या मुलाखतीतून पुण्यातील एफटीआय नावाचं प्रकरण आयुष्यात आलं, तेही तेव्हाच! 
काय असते ही, एफटीआय नावाची भानगड?- या  प्रश्नाचा हा भुंगाही तेव्हाच भुणभूणला. एक लख्खपणो कळलं, सिनेमा पडद्यावर दिसतो त्याचा नाही, तो पडद्यामागील दिग्दर्शकाचा असतो!  होणार तर दिग्दर्शकच..स्वप्नाची ही खूणगाठ बांधली गेली. 
. म्हणूनच स्वप्न पेरणारी ‘मैत्र’ आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत राहते. कधी धीर देते, कधी प्रेरणा देते, तर कधी स्वत:वरील विश्वास वाढविते.