दिवाळीचा पहिला दिवा उद्या आपल्या अंगात उजळेल.
आकाशकंदील चमकू लागेल आणि
रांगोळीचे रंग दारासमोर खुलू लागतील.
अशावेळी दिवाळीच्या या आनंददायी सेलिब्रेशनची तयारी करताना,
आपण नव्याको:या मनानं जगू लागतो.
पुन्हा नव्यानं सारं सुरू करू म्हणतो.
अशावेळी सोबत करायला,
आपल्या पावलापुरता प्रकाश दाखवायला आपल्यासोबत काही गोष्टी असाव्यात,
आनंदाच्या वाटेचा नेमका पत्ता आपल्याला ठाऊक असावा म्हणून
या दोन गोष्टी.
सुप्रसिद्ध लेखक पाऊलो कोएलो यांच्या ब्लॉगवरच्या.
दिवाळीचे दिवे उजळताना या गोष्टीतली आनंदाची पायवाट
आपल्याला बरंच काही सांगून जाते..
हातात चमचा
चमच्यात दोन थेंब तेल.
या जबाबदारीचं करायचं काय?
एका व्यापा:यानं आपल्या मुलाला एका महापंडित माणसाकडे जायला सांगितलं.
आनंदात जगायचं कसं, याचं सिक्रेट ते महापंडित तुला सांगतील असं म्हणत मुलाला रवाना केलं.
चाळीस दिवस वैराण वाळवंटातून प्रवास करत, पायी चालत, घामेघुम होत शेवटी हा तरुण मुलगा एका सुंदर पर्वतापाशी पोहचला. त्या पर्वतावर एक अपरंपार सुंदर महाल होता.
हा तरुण तिथं पोहचला. त्याला वाटलं होतं शांत, प्रसन्न जागा, एखादे विद्वान एकटेच इथं भेटतील. पण आत जाऊन पाहतो तर काय राजप्रासादासारख्या त्या आलिशान खोलीत अनेक लोक होते. मोठमोठे व्यापारी येत-जात होते. अनेक लोक घोळक्यानं बोलत होते. एका बाजूला एक सुंदर ऑर्केस्ट्राही सुरू होता. आणि एका टेबलावर त्या भागातल्या अत्यंत चविष्ट पाककृती छान मांडून ठेवलेल्या होत्या.
ते महापंडित गृहस्थ तिथंच सा:यांशी बोलत होते. हा तरुण एका कोप:यात उभा आपली त्यांची भेट होण्याची वाट पाहत होता. दोन तासानं ते भेटले.
या तरुण मुलानं सांगितलं की, आनंदानं जगण्याचं नेमकं सिक्रेट काय असतं ते जाणून घ्यायचं म्हणून मी आलोय.
ते विद्वान म्हणाले, ‘आता मी खूप कामात आहे आणि विषयही बराच मोठा आहे. तू एक काम कर तासदोन तासात भरात माझा महाल पाहून ये. मग आपण बोलू.’
तरुण निघणार तेवढय़ात त्या विद्वानानं त्याच्या हातात एक चमचा दिला, त्यात दोन थेंब तेल घातलं. म्हणाला हे एवढं सांभाळ, तेल तेवढं सांडू नकोस.’
तरुण हातात चमचा धरून निघाला. नाइलाज होता, आनंदी रहायचं सिक्रेट हवं तर तो बाबा म्हणोल ते करणं भाग होतं.
निघाला. जाऊन दोन तासात परत आला.
ते बाबा म्हणाले, ‘काय पाहिलं?’
तरुण म्हणाला काही नाही.
‘अरे असं कसं? माङया डायनिंग हॉलमध्ये पर्शियन पद्धतीचं अत्यंत सुंदर चित्र लावलेलं आहे. आणि बाग? पाहिलीस का? आणि लायब्ररीतलं चर्मपत्र? तेही नाही पाहिलंस?’
- तरुण जरा ओशाळला. आपण काहीच पाहिलं नाही, आपल्याला काहीच दिसलं नाही म्हणाला, कारण सगळं लक्ष त्या दोन थेंब तेलावर होतं. ते तेल तेवढं जपलं.
‘ते ठीक आहे. पण ज्याचं साधं घर तू नीट पाहिलेलं नाहीस, त्याच्यावर तू काय भरवसा ठेवणार? त्यापेक्षा एक काम कर, आधी माझं घर, हा परिसर नीट पाहून घे. माझं जग किती सुंदर आहे, ते जरा नीट पहा तरी आधी. मग बोलू.’
तरुण पुन्हा निघाला. उत्सुकतेनं सारं जग पाहू लागला. थांबला कुठं. हरवून गेला त्या जगात. ते ऐश्वर्य, ते सौंदर्य, पाहून थबकला. मस्त जेवला. समाधान वाटलं त्याला. आणि मग परत आला.
त्या बाबांनी विचारलं सांग काय काय पाहिलंस?
हा सारं सांगू लागला, तसं त्याला थांबवत ते म्हणाले, ते ठीक आहे. पण तेल कुठाय चमच्यातलं?
जग पाहण्याच्या नादात हा मुलगा विसरूनच गेला हातातला चमचा नी चमच्यातलं तेल.
हा पुन्हा ओशाळला.
मग ते पंडित हसले आणि म्हणाले, ‘आनंदी राहण्याचा मंत्र हवाय ना तुला? सिक्रेट हवंय. हेच ते सिक्रेट. जग तर पहायचं, भरपूर जगायचं, पण जबाबदारीचे दोन तेलाचे थेंब हरवायचे नाहीत, सांडायचे नाहीत. आणि हातात जबाबदारीचा चमचा आहे म्हणून जगच पहायचं नाही, आनंदच घ्यायचा नाही असं नाही.
हे दोन्ही ज्याला जमलं तो खरा आनंदी!’
स्वत:ची ओळख
देणा:या 4 पाय:या
बडे बडे नामों मे अपना भी कोई नाम तो हो, पहचान तो हो.
असं वाटतंच!
वाटायलाच हवं.
पण गर्दीत आपण वेगळं दिसायचं कसं?
स्वत:चं वेगळं अस्तित्व कसं शोधायचं?
स्वत:ला शोधण्याच्या चार अवस्था असतात असं मानलं जातं.
त्या चार अवस्थांमधून प्रवास करत स्वत:ची ओळख बनवता, टिकवता येऊ शकतं.
त्या चार स्टेप्समधला हा प्रवास.
त्यांचा हात धरून स्वत:ला शोधता येतं का, बघूयात.
स्टेप-1
हा असा टप्पा असतो आयुष्याचा, जेव्हा आपली ‘स्वत:ची’ अशी काही ओळख नसते. जी ओळख आपल्या जन्मानं मिळते ती आपण स्वीकारतो. त्यामुळे ही ओळख आपल्याला चिकटलीये, ती आपली नाही हे लक्षात ठेवलं की मग आपला ख:या ओळखीचा शोध सुरू होतो.
स्टेप-2
दुसरा टप्पाही असाच. सोशल ओळखीचा. म्हणजे आपण मुलगा/मुलगी आहोत किंवा हिंदू-मुस्लीम-ािश्चच धर्माचे आहोत किंवा अमुक जातीचे, तमुक पंथाचे, तमुक गावचे, ढमुक देशाचे आहोत.
तमक्याचा मुलगा, अमक्याची मुलगी या सा:या ओळखी आपल्याला जन्मानं चिकटतात.
त्यामुळे ती ओळख तसं पाहता आपली नसतेच. त्यामुळे या ओळखीविषयी गर्व, अभिमान जसा वरवरचा तसाच न्युनगंडही. आपल्या अवतीभोवतीच्या समाजानं आपल्याला स्वीकारावं, त्या वतरुळाचा भाग व्हावं म्हणून आपण जे जे करतो, ज्या पद्धतीची ओळख स्वीकारतो. ती ही ओळख. जन्मानं मिळालेल्या ओळखीइतकीच ही ओळखही खरी; पण वरवरची. आपली असूनही आपली असतेच असं नाही.
या एवढय़ा ओळखीवरच आपलं भागलं तर पुढची खरी ओळख आपल्याला सापडतच नाही.
स्टेप-3
या टप्प्यावर खरा आयडिण्टटी क्रायसिस सुरू होतो. मी नक्की कोण असा सगळा झगडा सुरू होतो. तुम्ही तुमच्या धर्माविषयी, जातीविषयी, समाजाविषयी, स्वत:च्या जगण्याविषयी, आर्थिक स्थितीविषयी प्रश्न विचारू लागता. आणि मग त्यातून तुम्ही स्वत:ची लाईफस्टाईल, मूल्यं, जगण्याच्या चॉईसेस, मित्र, संस्कृती हे सारं बदलत जातं किंवा ते स्वत:साठी बदलावं म्हणून प्रय} सुरू होतात. आणि त्यातून स्वत:ची खरी ओळख, स्वत:चा विचार सापडू शकतो.
पण सगळ्यांनाच सापडतो असं नाही, काहीजण याच टप्प्यावर अडकतात. आणि नवीन ओळख सापडण्याऐवजी जुनी ओळखही हरवून बसतात.
स्टेप -4
या चौथ्या टप्प्यात जी माणसं भेटतात ती खरी यशस्वी होण्याच्या, स्वत:च्या मर्जीप्रमाणं जगण्याच्या टप्प्यावर पोहचतात. ते संघर्ष करतात. प्रश्न विचारतात. स्वत:चा व्यवसाय स्वत: निवडतात. स्वत:ची विचारसरणी घडवतात. नातेसंबंध निवडतात. तत्त्वं जगतात. त्यातून नवीन जग घडवतात. आणि जगण्याचं सुकाणू आपल्या हाती घेतात. आणि स्वत:ची ओळख, स्वत:चं जगणं घडवत स्वत:चं अस्तित्व जगासमोर ठेवतात. जग त्यांना या ओळखीनंच ओळखतं!
आणि म्हणून ते यशस्वी असतात.