शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

मुलांसाठी झटणारे सर

By admin | Updated: October 15, 2015 17:46 IST

जिल्हा परिषद शाळेतला एक शिक्षक, पुस्तकी घोकंपट्टीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी घडवतो त्याची गोष्ट

 

 
जिल्हा परिषदेचे अनेक शिक्षक तसे ‘अप-डाउन’वालेच.  ‘ते’ मात्र मुक्कामी गुरुजी. जिथं नेमणूक त्या गावातच भाडय़ाच्या खोलीत ते राहतात. कधी साप्ताहिक सुटीची वाट पाहात नाहीत. कधी कधीच सुटी घेतही नाहीत. रविवारीही त्यांची शाळा भरते. तीही सकाळी 7 ते सायंकाळी 7 र्पयत.
शाळेलाच सर्वस्व मानून झटणा:या या शिक्षकाचे नाव आहे ए.एल. बोपीनवार. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथे ते सध्या केंद्रप्रमुख आहेत. 1996 साली ढाणकीजवळील गांजेगावात ते शिक्षक होते. एकही दिवस सुटी न घेता त्यांचे अध्यापन असायचे. ढाणकी हे तालुका म्हणून शोभणारे मोठे गाव. पण तेथील विद्यार्थी बोपीनवार सरांमुळे गांजेगावच्या शाळेत यायचे. विद्याथ्र्यानी भरलेले दोन मोठय़ा ऑटोरिक्षा रोज ढाणकी ते गांजेगाव चालायच्या. 
कारण सरांचा भर विद्याथ्र्याच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासावर!  ते स्वत: उत्तम खो-खोपटू आहेत. पोहण्यात, धावण्यात तरबेज आहेत. दरवर्षी विभागीय स्पर्धेत त्यांची निवड ठरलेलीच. त्यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या शाळेतील मुले-मुली जिल्हा पातळीवरील खो-खोची सर्व पदकं दरवर्षी पटकावतात. त्यांच्या शाळेतून दरवर्षी 15-2क् विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.
शाळेतील मुलांना ठरावीक पोषण आहार मिळतो. त्यात ताजा भाजीपाला  असावाच, हा बोपीनवारांचा आग्रह. त्यासाठी त्यांनी शाळेतच भाजीपाल्याची बाग फुलविली. तिथल्या भाज्या मुलांना मिळतात. बॅण्डसोबत सादर होणारा त्यांचा परिपाठ विद्याथ्र्याना प्रिय आहे. शाळेतील गरीब विद्याथ्र्याना कोणताही गाजावाजा न करता वेळोवेळी ते आर्थिक मदत करीत असतात. विद्याथ्र्यासोबतच आपल्या सहकारी मित्रंनीही व्यायाम करून तंदुरुस्त राहावे, हा त्यांचा आग्रह आहे.
बोपीनवार सरांविषयीचा एक किस्सा सगळ्या परिसरात फेमस आहे. त्याचं स्वत:चं लगA. पण शाळेत कामात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी लग्नही आवजरून रविवारीच केले. जीवनातील हा महत्त्वाचा सोहळाही त्यांनी उनकेश्वरच्या देवळात साधेपणाने उरकला. लग्नाच्या आदल्या दिवसार्पयत ते कामावर होते. सायंकाळी सहकारी भेटायला घरी आले, तर नवरदेव अजून शाळेतून यायचेच आहेत, असं कळले. सायंकाळ उलटून गेल्यावर ब:याच उशिरा ते घरी परतले.
नेमून दिलेलं काम, नोकरीच्या मर्यादा, रुटीनचं वाटणारं ओझं असं रडगाणं गाणारे अनेक असताना हा शिक्षक मात्र शिक्षकी पेशाला नोकरी न समजता, शक्य होईल ते सारं करत इतरांपेक्षा वेगळं काम करतो. इतरांपेक्षाच नाही तर प्रत्येकवेळेस ते स्वत:च्याही क्षमतांच्या पलीकडे जाऊन विद्याथ्र्यासाठी कष्ट उपसताना दिसतात.
 
अविनाश साबापुरे, यवतमाळ