शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

हे पाहिलं का ? डोक्यावरचा भार हलका करणारा  लॉकडाउन लूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:19 IST

टक्कल केलं की दाट केस येतात असं समजून लॉकडाउनची संधी साधून कुणी टक्कल करत आहेत. कुणाला अॅडव्हेंचर करून पहायचं आहे. कुणी तर इतकं टोकाला गेलंय की आता गरजा कमी करू, श्ॉम्पूचा खर्च वाचवू. पाण्याचं प्रदूषण कमी करू म्हणूनही टक्कल करत आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. सगळेच डोक्यावरचा भार हलका करूलागलेत.

ठळक मुद्देतुम्हीही एन्जॉय करा. घरात राहा. क्रिएटिव्ह व्हा. वाटलं तर करा, डोक्यावरचा भार हलका !

सारिका पूरकर-गुजराथी

कोरोनाचा मुक्काम जसा लांबतोय, लॉकडाउनही वाढतंय.घरात कोंडून राहावं लागत असल्यामुळे अनेकांना नको नको झालं. अनेकांनी स्वयंपाकात जीव रमवला. कुणी घरात पत्ते कुटले. घरकाम केलं. आपल्या आवडत्या कलांना वेळ दिला. तासन्तास सिनेमे पाहिले. आणि काही जीव बिचारे वर्क फ्रॉम होम करत सगळ्याच अर्थानं कोंडलेपण अनुभवत राहिले.पण आता मात्र लोकांनी स्वीकारलेलं दिसतंय की हा काळ काही लवकर संपणार नाही. ही कोंडी आपल्याला आता बराच काळ जगायची आहे.त्यामुळेच या लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या कल्पनांना धुमारे फुटताय. त्यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो दिसण्याचा. स्टायलिश राहणं, प्रेङोंटेबल असणं हे एरव्ही महत्त्वाचं असतंच.पण घरात कोण पाहतंय, म्हणून अनेकजण गबाळे राहू लागले.काहींचे पार्लर बंद झाले त्यामुळे चेहरे अनोळखी दिसू लागले.जोक्स फॉरवर्ड होऊ लागले की, आता कपडे विचारू लागले की, आमचा मालक आहे क ी गेला?असं असलं तरी काहींना मात्र कायम स्टायलिश राहण्याची हौस असतेच.लॉकडाउन काळात स्वत:ला फ्रेश ठेवायचं तर कुछ हटके करना पडता है.म्हणून मग एक कॉमन ट्रेण्ड म्हणजे अनेकांनी घरच्या घरी केस कापले, कापून घेतले, आईकडून, वडिलांकडून, बायको किंवा बहिणीकडून.जे तरुणांचं ते तरुणीचं. 

अनेकींनी धाडस करत आपणच आपले केस कात्रीने कराकरा कापले. डोक्यावरचा भार हलका करत स्वत:ला एक नवा लूक दिला.त्याचे फोटो काढले. कहाण्या लिहिल्या. सोशल मीडियावर माय न्यू हेअरकट म्हणत अनेकांनी आपले फोटो टाकले.त्यात ऊन मी म्हणायला लागलेय. आता केसांचं हे ओझं नको, असंही अनेकांना वाटलं मग त्यांनीही आपल्या केसांवर घरीच प्रयोग केले.या सगळ्यात सेलिब्रिटीतरी कसे मागे राहतील?तेही स्वत:च्या केसांवर ट्राय करताहेत हेअर ड्रेसिंगचे नवनवीन फंडे. त्यांचे हे फंडे सोशल मीडियावर व्हायरल झाले रे झाले की चॅलेंज म्हणून ते धडाधड फॉलो केले जाताहेत.

1. सध्या सोशल मीडियावर यामुळे सर्वात जास्त चर्चेत कोण असेल तर  ते आहेत भारताचा एकेकाळचा जवां दिलोंकी धडकन कपिल देव. एरव्हीही कपिल देव दा जवाब नहीं असं म्हटलं जात होतंच; पण आता  कपिल पाजींनी तरुणांना चांगलाच कॉम्प्लेक्स दिला आहे.त्यांनी लॉकडाउनमध्ये आपल्या डोक्यावरचे सर्व केस काढून टाकून गोल गरगरीत चमन गोटा करून टाकला. जोडीला बिअर्ड लूक, डोक्यावर गॉगल.असा त्यांचा त्यांचा झकास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लॉकडाउन हेअरकट म्हणून तो जाम फेमसही होऊ लागला. कपिल पाजींचा हा लूक कोणाला सय्यद किरमाणींसारखा भासला तर कोणाला सर व्हिवियन रिचर्डस यांच्यासारखा. 2. मास्टर ब्लास्टरनेही हे चॅलेंज स्वीकारत स्वत:चे केस ट्रिम करून कट केले आणि मैदानावर स्क्वेअर कट नेहमीच मारले आहेत; पण हा केसांचा कट कसा वाटतोय? अप्पर कट, स्क्वेअर कट अॅण्ड नाऊ हेअरकट असं सुंदर कॅप्शन देत त्याचा लॉकडाउन हेअरकट इन्टावर टाकलाय. नेहमीप्रमाणोच सचिनला त्याच्या कुरळ्या केसांवर हा त्याचा स्वत: डिझाइन केलेला लूक भारीच वाटतोय. 3. तिकडे कॅप्टन कोहलीने पत्नी अनुष्का शर्माकडून हेअरकट करून घेतलाय. त्याच्या दाढीत काही पिकलेले केस दिसू लागलेत, तेही त्यानं इन्स्टा चॅटमध्ये लपवले नाहीत हे विशेष. त्याची दाढी हा सध्या तरुण मुलांसाठी स्टाइल आयकॉन हा विषय आहेच.4. सध्या जगभरात लॉकडाउनमध्ये क्लीन शेव्हड हेड हा ट्रेंड तुफान हिट झालाय. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी असो, किंवा सलून बंद आहेत म्हणून स्वावलंबनाचे धडे गिरवायचे म्हणून असो हा ट्रेंड मोठय़ा प्रमाणात फॉलो केला जातोय. काहींनी तर या चॅलेंजच्या माध्यमातून निधी उभारत कोरोना युद्धात मदतीचा हात म्हणून देऊ केलाय. फक्त क्लीन शेव्हड हेड अर्थात टक्कलच नाही तर केसं बारीक कापणं, त्यांना वेगळे आकार देणं यातूनही बरीच गंमत जंमत चालू आहे सध्या सर्वत्न. बरं या चॅलेंजमध्ये फक्त पुरुषच सहभागी झालेत असं नाहीये. तर महिलांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. कोणी इंटरनेटर वाचून केस कापताहेत, कोणी घरातीलच कात्नी व अन्य सामान घेऊन केसं  कापताहेत. पण काहीतरी नवं करू पाहताय केसांवर. तुम्हालाही  असं काही करावंसं वाटतंय का? बिनधास्त करा. आकार-बिकाराच्या भानगडीत बिलकूलच पडू नका. कल्ल्यांचा आकार वेगळा कापून बघा. दाढी-मिशा जरा वेगळ्या ठेवून बघा. जसं जमलं तसं करा. पण ही फन मिस करू नका.5. बाकी करण जोहरही डाय न करता, पांढ:या केसात फिरतो आणि त्याचा एरव्हीचा मेट्रोसेक्शुअल लूक बाद करत म्हणतो की, आता जे वय आहे ते दिसणारच ना!लॉकडाउनमध्ये कुणाचे खरे चेहरे समोर आलेत, तर कुणाच्या डोक्यावरचे केस गेलेत.आहे खरा अजब प्रकार !

घरच्या घरी ‘बाल’ प्रयोग

केस पातळ आहे, मग आता सगळेच करतात, म्हणून आपण करून पाहू, टक्कल केलं की दाट केस येतात असं समजून लॉकडाउनची संधी साधून कुणी टक्कल करत आहेत. कुणाला अॅडव्हेंचर करून पहायचं आहे की, करून तर पाहू. नाहीतरी घरातच आहोत.कुणी तर इतकं टोकाला गेलंय की आता गरजा कमी करू, श्ॉम्पूचा खर्च वाचवू. पाण्याचं प्रदूषण कमी करू म्हणूनही टक्कल करत आहेत. विशेष म्हणजे असं सगळं करून त्याच्या स्टोरीही सोशल मीडियावर पोस्ट होत आहेत.

व्हाय शूड बॉइज हॅव ऑल द फन?

लॉकडाउन लूक काय फक्त मुलं-पुरु षांनाच करता येतो काय? मध्यंतरी मराठी चित्नपटसृष्टीतील आघाडीची, अष्टपैलू नायिका सोनाली कुलकर्णी (सिनिअर) हिने एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तिने म्हटलं होतं, चला पुन्हा रेट्रो स्टाइल करूया. या फोटोत तिने संपूर्ण केसं एका बाजूला घेत पोनी टेल बांधली होती. आठवताहेत ना रिना रॉय, हेमामालिनी? या नेहमीच या स्टाइलमध्ये दिसल्या होत्या. पण जर मुलींना, बायकांना काही आणखी काही वेगळं करायचं असेल तर मिडल पार्टिशन करून दोन वेण्या घालून दोन्ही बाजूस दोन अंबाडे (आता त्याला बन म्हणतात) घाला, वेण्या न घालताही दोन अंबाडे घालू शकतात. फक्त हे लो बन असायला हवेत. हीसुद्धा रेट्रोच स्टाइल. सागर वेणी ट्राय करा. खजूर वेणी (पाच पुडांची) ट्राय करा. उंदराच्या शेपटय़ासुद्धा ट्राय करा. होय, हीदेखील स्टाइल आहे. सर्व केसांची उंच पोनी बांधून छोटय़ा छोटय़ा वेण्या घालून त्या एकत्न बांधा. खुबसुरतमध्ये रेखाने घातल्या होत्या तशा दोन वेण्या ट्राय करा. हवं तर त्या तुम्ही मागे क्रॉसमध्ये (उजवी डावीकडे व डावी उजवीकडे) बांधू शकता (करिश्माने बांधल्या होत्या अनाडीमध्ये).  थोडक्यात काय तर लॉकडाउनमुळे लर्न विथ फन असं सुरू आहे. तुम्हीही एन्जॉय करा. घरात राहा. क्रिएटिव्ह व्हा. वाटलं तर करा, डोक्यावरचा भार हलका !

(सारिका मुक्त पत्रकार आहे.)