आपल्या हातात मोबाइल, त्यावर मारलेलं नेट आणि भरपूर वेळ आहे, त्या वेळात काय काय करता येईल याची ही यादी.
coronavirus : एकदम भारी काही पाहायचं आहे ? दीड जीबी ‘इथं’ जाळा!
ठळक मुद्देआपण अक्षरश: हवं ते शिकू शकतो.
-ऑक्सिजन टीम
तसे पडीकच असतो आपण ऑनलाइन. दीड जीबी जाळणं हेच आपलं कर्तव्य. त्यात आता या काळात आली माहिती की ढकल असं सुरूआहे. सगळ्यांनाच घरबसल्या सगळं माहिती. पण यापलीकडे हा दीड जीबी डेटा जाळून आपल्याला काय काय करता येईल. याची ही एक यादी असू द्या हाताशी. त्यातल्या काही गोष्टी जरी केल्या तरी आपले स्किल अपडेट होती. तुम्हाला माहिती असेल, नसेल पण दक्षिण कोरियात अनेक लोक या सुटीचा वापर करत आपली स्किल्स अपडेट करत, नवीन गोष्टी शिकून घेत आहेत. कारण त्यांना भय वाटतं आहे की, येत्या काळात जर आर्थिक मंदीमुळे जॉब लॉस झाले (ते जगभर होणार, आपल्याकडेही होणार) तर आपण कंपनीला आउटडेटेड वाटायला नको. आपल्या हाती कंपनीच्या उपयोगाचं असं एखादं स्किल असणं आवश्यक आहे. असा विचार आपण का करू नये? हातात साधनं आहेत तुमच्या, लोक मोफत ऑनलाइन शिकवत आहेत. अगदी क्राफ्टपासून उत्तम इंग्रजी, उर्दू, चायनिज शिकण्यार्पयत ते अन्य कोर्स घेण्यार्पयत अनेक गोष्टी करता येतील. हे दिवस कधी जातील म्हणत चिडून, गप्प बसू नका. वेळ अति मौल्यवान आहे. तो परत यायचा नाही, तेव्हा जे जे मिळेल ते ते शिकून घ्या.अक्षरश: कुबेराचा खजिना उघडला आहे, हात धुवून घ्या.जाळायचा ना दीड जीबी असा जाळा की, लॉकडाउनमधून बाहेर याल तेव्हा एकदम नवे कोरे झालेले असाल!
ही घ्या यादी.1. सगळ्यात आधी तो कंटाळा घालवा. बोअर होतंय म्हणणं बंद करा. मित्रंना भेटा. गप्पा मारा, हसा. कसं?त्यावर सोपा उपाय म्हणजे, हाउसपार्टी नावाचं अॅप डाउनलोड करा. जगभरात 2क् लाखांहून अधिक तरुणांनी ते डाउनलोड केलं आहे. त्यावर भल्यामोठय़ा ग्रुपला इझी कनेक्ट होता येतं. व्हिडीओ कॉल उत्तम होतात. भरपूर वेळ खिदळलं तर मूड एकदम फ्रेश होऊन जातो.2. गूगल बाबाच्या कृपेनं आज काय शक्य नाही. तर आता गूगलनेच जगभरातल्या लॉकडाउनच्या काळात गूगल आर्ट्स अॅण्ड कल्चरल प्रोजेक्ट आणला आहे. तुम्हाला ऑपरा पाहायचा आहे? पेंटिंग्ज पहायची आहेत उत्तम उत्तम. किंवा कलास्वाद घ्यायचा आहे. या प्रोजेक्टची गूगलवर माहिती आहे, ती घ्या. गूगलने जगभरातले 12क्क् मोठे म्युङिायम आणि 6क्क्क् मोठय़ा कलाकारांचं काम एकत्र करत, त्यांना जोडलं आहे. ते काम आता या प्रोजेक्टअंतर्गत घरबसल्या पाहता येईल. मोठय़ा कलाकारांची चित्रं पाहता येतील. त्याचा 36क् अंशातील व्ह्यू पाहता येईल. जे एरव्ही कधीही घरबसल्या पाहता आलंच नसतं ते आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. ते पहाच.3. ऑर्केस्ट्रा किंवा सिम्फनी हे एरव्ही कुठं पहायला मिळतं आपल्याला? तेही मोफत? सिएटल सिम्फनी यांनी आपले ऑर्केस्ट्राचे शो बंद केले असले तरी त्यांनी त्यांचं यू-टय़ूब आणि फेसबुकवर स्ट्रिमिंग सुरूकेलं आहे. तेही मोफत. ते नक्की पहा.4. आता थोडं अभ्यासाचं. क्लास सेण्ट्रल असं गूगल करून पहा. जगभरातल्या नामवंत विद्यापीठांचे 4क्क् मोफत कोर्सेस तिथं तुम्हाला शिकायला मिळतील. डाटा सायन्स ते सोशल सायन्स, मशीन लर्निग ते इमोशनल लर्निग वाट्टेल ते शिका. कोलंबिया, प्रिन्स्टन यासारख्या विद्यापीठाचे हे कोर्सेस आहेत. ते शिकून घ्यायची संधी सोडू नका.5. आता महत्त्वाचा मुद्दा, आपलं फिटनेस. घराबाहेर जाता येत नाही, म्हणून जॉगिंग, जिम नाही असं अनेकांना वाटतं. त्यासाठीच पेलोट 90 दिवसांत कमवा बॉडी.6. खान अकॅडमी, आउटस्कूल. व्हर्सिटी टुअर्स यांचेही अनेक मोफत क्लासेस ऑनलाइन आता उपलब्ध आहे. 7. (mooc( massive open online courses)) बद्दल तुम्हाला माहिती असेलच. जगभरातील उत्तम ज्ञान वेगवेगळ्या ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला देतात. कॉर्सेरा, इडीएक्स, यूडय़ासिटी असे वेगवेगळे जागतिक दर्जाचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचे मोबाइल अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत अथवा आपण यांच्या वेबसाइटवर अक्षरश: हवं ते शिकू शकतो.
8. पहायचंच असेल तर टेड सारखा उत्तम आणि भरवशाचा प्लॅटफॉर्म आहे. जगातील कितीही मोठी व्यक्ती असली, कितीही कॉम्प्लिकेटेड संशोधन असलं तरी तिला तिचे विचार अवघ्या 18 मिनिटांमध्येच मांडावे लागतात. परिणामी एखादी सिरीज पाहण्याचा कंटाळा आला असेल तर पटकन टेडचा व्हिडीओ आपण पाहू शकतो. या डेडच्या अॅप्लिकेशनमध्ये सरप्राइझ मी नावाचं फीचर आहे. याचा अर्थ असा, यावर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला तुमचा मूड कसा आहे आणि तुमच्याकडे वेळ किती आहे असे दोन प्रश्न तुम्हाला विचारतं. ते आपण सांगितल्यावर टेड एखादं चांगलं भाषण आपणाला सुचवतं. प्रेरणादायी हवं की माहितीपर, भावनिक की आणखी काही असं सारं तुम्हाला मिळतं. त्यामुळे जगातील लयभारी काय तर बघायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. फक्त 18 मिनिटांचा. थोडक्यात काय तर बाइट साइझ नॉलेज. म्हणजे चहा पिता पिता, घरबसल्या काही नॉलेज मिळवायचं असेल तर बघा टेड टॉक.