रेशमा कचरे
मनोबल या हेल्पलाइनविषयी तुम्ही गेल्या आठवडय़ात ‘ऑक्सिजन’मध्ये वाचलं.‘परिवर्तन’ संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अन्य काही समविचारी लोकांनी एकत्न येऊन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मनोबल’ नावाची हेल्पलाइन सुरू केलेली आहे.कोरोना कोंडीच्या काळात आपलं मन मोकळं करायला लोकांना विशेषत: तरुणांना जागा हवी, समुपदेशक म्हणून काम करत असतील किंवा करायचं असेल तर त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण मिळावं म्हणून ही हेल्पलाइन काम करते.समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक त्यासाठी जाहीर करण्यात आले. याकाळात किमान भावनिक प्रथोमोपचार मिळावा म्हणून ही हेल्पलाइन काम करूलागली.राज्यभरातून आमच्याकडे रोज फोन येतात. अनेकांच्या बोलण्यात काळजी आहे. त्यांना मन मोकळं करायचं आहे.साधारण काय दिसतं या बोलण्यात?त्यातले हे काही सर्वसाधारण प्रश्न. जे कॉमनली विचारले जातात.
3. हे तिसरे फोन म्हणजे व्यवसाय नुकताच सुरूकेला असे तरुण. काहीजण संतापानं नुसते उडत असतात. ‘वो कापड का दुकान निकाला था अभीच. और अभीच लॉकडाउन होने को मंगताय क्या? अब कैसा जाये आगे ! मुङो तो कुछ सुधर नही रहा. क्या करे अभी इस पुरे दिन क्या ? मुङो लगा था अभी दुकान खोलने के बाद सब ठीक हो जायेगा. घर का भी सब देख पाऊंगा. लेकीन कुछ अच्छा होही नही सकता मेरे लाइफ में. ये कोरोना को भी अभी आनेका था! जैसे मेरे दुकान खोलने के ही इंतजार कर था! दो दिन भी नही हुए थे. क्या करे सर इस सिच्युएशन का? अब कुछ है नही करने को! लगता है ऐसेच मर जाऊंगा. कुछ फ्युचर नही दिख रहा. ***साधारण या तीन कॅटेगरीसह प्रेम प्रकरण, घरच्यांशी न पटणं, यासारख्या नेहमीच्या गोष्टी आहेतच. मात्र या तीन गोष्टी ठळक आहेत.आपल्याला किंवा आपल्या जिवलगांना काही आजार झाला असेल, तर कोरोना असेल का?आपण आपल्या नोकरी-व्यवसायाचं काय? आत्ताच्या रिकामपणानंतर पुढे काय?आम्ही त्यांना रेडिमेड उत्तरं देऊ शकत नाही, मात्र त्यांचं ऐकून घेतो. ते ऐकून घेणंही याकाळात महत्त्वाचं आहे, त्यातून प्रश्न कळतात आणि उत्तरं एकत्र शोधू, तुम्ही एकटे नाही असा आशावाद तरी मनांना देता येतो.आम्ही हेल्पलाइन म्हणून स्वयंसेवक म्हणून सोबत राहू, सोबत आहोत असं सांगतो, धीर देतो!
( लेखिका मनोबल हेल्पलाइनमध्ये समुपदेशक म्हणून काम करतात.)