चॉकलेट नॅशनल वीकला चॉकलेटवेडी तरुण मुलं काय काय करतात याची नुस्ती यादी जरी पाहिली तरी या वेडाची कल्पना यावी.
1) चॉकलेट फॅशन शो
म्हणजे काय तर चक्क चॉकलेटचे कपडे बनवतात आणि त्यांचा फॅशन शो असतो. त्या चॉकलेट शोला जाण्यासाठी अनेकजण जीवाचं रान करतात.
2) चॉकलेट मसाज
अनेक स्पावाले याकाळात चॉकलेट मसाजच्या स्कीम काढतात आणि चॉकलेट मसाज करून घेणारे तिकडे रांगा लावतात.
3) चॉकलेटचे क्लासेस
अनेक हौशी याकाळात चॉकलेट बनवायला शिकतात. आणि थेट क्लास गाठतात.
4) टेस्टिंग अॅडव्हेंचर
आपण नेहमी ठरलेल्या साच्यातले चॉकलेट खातो. या धाडसात कडसर, नव्याच चवीचे, डार्क चॉकलेट खायचे धाडस अनेकजण करतात.
5) चॉकलेट कॉकटेल पार्टी
अनेकांच्या घरी चॉकलेट कॉकटेल पार्टीही आयोजित केली जाते आणि त्यात चॉकलेट कॉकटेल बनवत मस्त मैफल जमते.