शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

कॅन्सर- 0, मी-10

By admin | Updated: June 9, 2016 18:02 IST

पुढच्या आयुष्यात कॅन्सर मला गाठणारच नाही अशी गॅरण्टी काही नाहीये. मला पुन्हा कॅन्सर होऊ शकतो, हे सत्य आहे. मी ते व्यवस्थित समजून स्वीकारलं आहे.

- शची मराठे
 
पुढच्या आयुष्यात कॅन्सर मला गाठणारच नाही 
अशी गॅरण्टी काही नाहीये. 
मला पुन्हा कॅन्सर होऊ शकतो, 
हे सत्य आहे. मी ते व्यवस्थित समजून स्वीकारलं आहे. 
पण मी त्याचा बाऊ करत नाही,  
आणि ताणही घेत नाही. 
मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेते. 
जे मी करू शकते, त्याच्यावर मी फोकस करते. 
बीझी राहते. 
त्यामुळे या टांगत्या तलवारीचा त्नास होत नाही.
 माझ्या शरीरावरच्या सर्जरीच्या खुणा,
 रेडिएशनचं मार्किग 
मला मोठी लढाई जिंकल्याची 
सतत आठवण करून देतात. 
हे घाव म्हणजे माझी मेडल्स आहेत. 
व्हिक्टरी ट्रॉफी. 
 
कॅन्सर डेज्
ऐन विशीत कॅन्सरशी सामना करून
मिळवलेल्या हिमतीची जिगरबाज गोष्ट....
 
ट्रीटमेंट संपली आणि डायरी लिहिणंही थांबलं..
रुटीन बदललं.
नवे कोर्स, नवं कॉलेज, नवे मित्न-मैत्रिणी. 
जुना बॉयफ्रेंड (हाहा..) 
आयुष्यानं वेग धरला.
पण गोष्ट संपली नाही. 
मी कॅन्सरला विसरले नव्हते.
वर्षातून दोनदा टाटाच्या वा:या कराव्या लागतात. ब्रेस्ट मेमोग्राफी, सोनोग्राफी, एमआरआय करून खात्नी करून घ्यावी लागते. एकदा कॅन्सरला भोज्जा करून परत आलेय. त्यामुळे पुन्हा तिकडे पलीकडे जाण्यासारखी परिस्थिती निर्माण तर झाली नाहीये ना? 
सतत दक्ष राहावं लागतं. 
गेल्या दहा वर्षात एकदा तशी परिस्थिती झालीही होती निर्माण. उजव्या स्तनामधे पुन्हा एक गाठ निर्माण झाली. पण ती जोर्पयत कॅन्सरची नव्हती तोर्पयत काही धोका नव्हता. म्हणजे सगळ्या मुलींच्या स्तनांमधे लहानमोठय़ा गाठी असू शकतात; पण त्या सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात. पण माङया बाबतीत स्तनांमधे निर्माण होणा:या प्रत्येक गाठीचा संबंध हा कॅन्सरशी असू शकतो. त्यामुळे त्या गाठीचा आकार, स्वभाव, वागणं संशयास्पद तर नाही ना, याची तपासणी करावी लागते. जर त्या गाठीची हालचाल कॅन्सरच्या लक्षणांसारखी असेल तर सावध होण्याची गरज असते. एकदा अशीच एक गाठ काढून टाकावी लागली, एक छोटंसं ऑपरेशन करून. पुन्हा एकदा हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर सगळं अनुभवलं. 
पण ही सर्जरी छोटीसी होती. अध्र्या तासाची. लोकल अॅनॅस्थेशिया देऊन. एका तासातच मी ऑपरेशन टेबलवरून खाली उतरले आणि कपडे बदलून चालतच बाहेर आले, मग घरी आले. पुढे काही नाही. सगळं नॉर्मल. 
पुन्हा एकदा मी आउट होता होता राहिले.
 या गोष्टीलाही आता तीन र्वष झाली. 
सगळं छान सुरू असतं. तुमचं करिअर, संसार, घर, व्यायाम, दोस्त मंडळी, वीक एण्डचा सिनेमा, डिनर-गेट टूगेदर-नाइट आउट, ट्रेकिंग, खरेदी, तुमचं मन्थली सेव्हिंग्ज या सगळ्या गोष्टींनी तुमचा मेंदू व्यापला असतो आणि मधेच वर्षातले ते दोन दिवस उगवतात.
 ‘फॉलोअप’चे. 
तेव्हा हे सगळे विषय मागे सारून कॅन्सर अलगद माङया मनाचा, मेंदूचा ताबा घेतो. मी आहे ना लक्षात तुङया? असं म्हणत डोळे बारीक करून कुत्सित हसतो. 
फॉलोअपआधीचे चार-पाच दिवस डोक्याला नुसता भुंगा लागून राहतो. मग अखेर फॉलोअपचा दिवस उजाडतो. सकाळी सकाळी मी चांगलीच तयार होते. चांगले कपडे, शूज, हलका मेकअप, पाणी आणि थोडं खाणं आणि पेपर किंवा पुस्तक अशी सगळी आयुधं घेऊन मी आणि मुकेश किंवा मी आणि बहीण असं आमचं कॉम्बिनेशन पॅकेज टाटामधे दाखल होतं. 
मी सतत स्वत:ला सांगत राहते, ‘तू पेशण्ट नाहीयेस, आज काही तासांपुरती तू इथे आलीयेस.’ टाटामध्ये एक पद्धत आहे, तिथल्या खुच्र्यावर बसण्यासाठी कायम पेशण्टला प्रायॉरिटी दिली जाते. ओपीडीमध्ये जर कोणी पेशण्ट उभा असेल तर इतर नातेवाईक स्वत: उठून पेशण्टला बसायला जागा देतात. नाहीतर पेशण्ट स्वत:च लोकांना उठवतात. 
मी कधीही तिथल्या खुर्चीवर बसत नाही आणि जर बसलेच तर कोणी पेशण्ट दिसला तर लगेच उठून त्याला जागा देते.  
‘‘मी पेशण्ट नाहीये’’ - मी पुन्हा स्वत:ला सांगते. 
टाटामध्ये गेलं की मला फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं वाटतं. 
मला मी हटकून भेटतेच.
पण मी तिला ओळखच नाही दाखवत. टेचात पुढे जाते. वाटेत खूप पेशण्ट्स दिसतात. त्यांच्याबद्दल डोळ्यात-वागण्यात अजिबात सहानुभूती येऊ न देता मी मनात म्हणते, ‘‘हे सगळे बरे होऊन घरी जाणारेत. त्यांचं नॉर्मल आयुष्य जगणारेत. माङयासारखचं. किंवा माङयाहूनही अधिक चांगलं.’’
पण काही वेळासाठी तो पुन्हा माझा ताबा घेतो. आज काय होईल फॉलोअपमध्ये? मेमोग्राफी, सोनोग्राफी, एमआरआयचे निकाल काय असतील? अलीकडे की पलीकडे..? नुसता विचारांचा उलट सुलट प्रवास, गुंता.. निष्कर्ष काही नाही. 
 मग टेस्टचा निकाल येतो, पास. 
(येयेयेयेयेयेये!!!,  8ी2!!!! )
 मी त्याच्याकडे पाहून हसते. विजयी हास्य. त्या दिवशी तरंगतच घरी येते. मस्त जेवते. काहीतरी खरेदी करते. छान सेलिब्रेट करते.
 गेली दहा र्वष..
कॅन्सरविरु द्धची मॅच मी 0-10 अशी जिंकतेय. पुन्हा तो दिसेनासा होतो. त्याच्या आठवणी हळूहळू पुसल्या जातात. पुन्हा माझं करिअर, संसार, घर, व्यायाम, दोस्त मंडळी, वीक एण्डचा सिनेमा असं रुटीन सुरू होतं. आता पुढच्या आयुष्यात तो मला गाठणारच नाही अशी गॅरण्टी काही नाहीये. म्हणजे मला पुन्हा कॅन्सर होऊ शकतो, हे सत्य आहे. मी ते व्यवस्थित समजून स्वीकारलं आहे. पण मी त्याचा बाऊ करत नाही आणि ताणही घेत नाही. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेते. व्यसनांपासून दूर राहते. चांगलं अन्न पोटात जाईल यासाठी प्रयत्नशील राहते. जे मी करू शकते, त्याच्यावर मी फोकस करते. बीझी राहते. त्यामुळे या टांगत्या तलवारीचा त्नास होत नाही. माङया शरीरावरच्या सर्जरीच्या खुणा, रेडिएशनचं मार्किग मला मोठी लढाई जिंकल्याची सतत आठवण करून देतात. हे घाव म्हणजे माझी मेडल्स आहेत. व्हिक्टरी ट्रॉफी. 
आता पुढची मॅच म्हणजे पुढचं फॉलोअप आहे ऑगस्टमध्ये. 
बघुयात. या मॅचचा निकाल काय लागतो ते..
 
(उमेदीची गोष्ट सांगणारी ही लेखमाला याच टप्प्यावर थांबवत आहोत. समाप्त)
shachimarathe23@gmail.com
 
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)