वेस्ट इंडीज सराव सामन्यात धोनी, कोहली खेळणे कठीण
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST
नवीन प्रतिभावान खेळाडू खेळणार
वेस्ट इंडीज सराव सामन्यात धोनी, कोहली खेळणे कठीण
नवीन प्रतिभावान खेळाडू खेळणारकानपूर : उत्तर प्रदेशातील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अध्यक्षीय एकादश आणि वेस्ट इंडीज यांच्यात २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यानच्या सराव सामन्यास बीसीसीआयचा हिरवा कंदिल मिळाला आहे; परंतु या सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीसह अनेक खेळाडू खेळण्याची शक्यता कमीच आहे.ग्रीन पार्कवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात २७ नोव्हेंबर २0१३ मध्ये एकदिवसीय सामना झाला होता. त्यानंतर स्टेडियम उभारणीचे काम सुरू असल्यामुळे जवळपास एका वर्षापासून येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. स्टेडियमचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे येणार्या काही वर्षांत येथे आंतरराष्ट्रीय सामना होण्याची शक्यता कमी आहे.उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना गत दहा वर्षांपासून आपल्या स्टेडियमसाठी जमीन शोधत आहे आणि अजून किती वर्षे त्यासाठी लागतील याविषयी यूपीसीएच्या अधिकार्यांनाही माहीत नाही.यूपीसीएचे सचिव राजीव शुक्ला यांनी वेस्ट इंडीजचा संघ २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान ग्रीन पार्कवर अध्यक्षीय एकादश संघासोबत सराव सामना खेळण्यासाठी कानपूरला येत आहे. हे दोन्ही संघ कानपूरच्या लँडमार्क हॉटेलमध्ये थांबतील. या सराव सामन्यात टीम इंडियाचे काही खेळाडू असतील आणि आपली कामगिरी दाखवण्याची संधी काही नवीन प्रतिभावान खेळाडूंना दिली जाईल. त्यामुळे भविष्यात आम्हाला टीम इंडियासाठी नवीन खेळाडू निवडता येतील. (वृत्तसंस्था)