हम्बनटोटा : श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान याने आज एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत १० हजार धावा पूर्ण केल्या, अशी कामगिरी करणारा तो जगातील ११ वा फलंदाज बनला आहे.दिलशानने पाकिस्तानविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही कामगिरी केली. या सामन्याआधी दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ५५ धावांची गरज होती. आज तो ६३ धावांवर बाद झाला. आता त्याच्या नावावर १० हजार ८ धावा नोंदवल्या गेल्या आहेत. त्यात २२ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी ३९.७१ अशी आहे. त्याने सर्वाधिक धावा या भारताविरुद्ध २२५५ केल्या आहेत.झिम्बाब्वेविरुद्ध १९९९ मध्ये बुलावायो येथे आपल्या एकदिवसीय कारकीर्दीस सुरुवात करणारा दिलशान हा १० हजार धावा पूर्ण करणारा श्रीलंकेचा चौथा फलंदाज आहे. याआधी सनथ जयसूर्या, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा यांनी ही कामगिरी केली आहे.तथापि, दिलशानने श्रीलंकेकडून सर्वात कमी डावात ही कामगिरी करण्याचा नवा विक्रम केला आहे. आपला ३१९ वा वनडे सामना खेळणाऱ्या या ३८ वर्षीय फलंदाजाने २९३ डावात ही उपलब्धी प्राप्त केली आहे. त्याने संगकाराचा विक्रम मोडीत काढला. संगकाराने २९६ डावात १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या. जयसूर्याने ३२८ आणि ३३३ डावात ही कामगिरी केली होती.सर्वात कमी डावात १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्याने १० हजार धावा फक्त २५९ डावात केला होता.दिलशानने वनडेत आणखी एक अनोखा विक्रम केला आहे. तो वनडेत १० हजार धावा आणि १00 विकेटस् घेणारा पाचवा खेळाडू बनला आहे. त्याआधी तेंडुलकर, जयसूर्या, गांगुली, कॅलिस यांनी ही कामगिरी केली आहे. आॅफस्पिनर दिलशानच्या नावावर १०४ विकेटस् आहेत.दिलशानने श्रीलंकेकडून २६ सामन्यांत कर्णधारपदही भूषवले आहे. तसेच तीन सामन्यांत त्याने यष्टिरक्षकाची भूमिका बजावली आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने २७ सामन्यांत ११९६ धावा केल्या आहेत. आपल्या कारकीर्दीत मधल्या फळीत खेळणाऱ्या दिलशानने नंतर डावाची सुरुवातही केली. त्याने वनडेत सलामीवीराच्या भूमिकेत ७ हजार ९८६ धावा केल्या आहेत.वनडेत १० हजार धावांपेक्षा जास्त धावा करणारे फलंदाजसचिन तेंडुलकर१८,४२६कुमार संगकारा१४,२३४रिकी पाँटिंग १३,७०४ सनथ जयसूर्या १३,४३०महेला जयवर्धने १२,६५० इंजमाम उल हक ११,७३९जॅक कॅलिस ११,५७९सौरव गांगुली ११,३६३राहुल द्रविड १०,८८९ब्रायन लारा १०,४०५दिलशान १०,००८(वृत्तसंस्था)
दहा हजारी मनसबदार!
By admin | Updated: July 27, 2015 00:07 IST