शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

टेनिस संघटनेचा सरकार, आयओएसोबत ‘पंगा’

By admin | Updated: November 2, 2016 07:06 IST

अ. भा. टेनिस संघटना नव्या अध्यक्षाची निवड करण्यास तयार आहे.

नवी दिल्ली : अ. भा. टेनिस संघटना नव्या अध्यक्षाची निवड करण्यास तयार आहे. पण त्याआधी सरकारने आयओएसह सर्वच राष्ट्रीय क्रीडा महासंघांसाठी समान दिशानिर्देश लागू करावेत, यावर टेनिस संघटना ठाम आहे.क्रीडा मंत्रालयाने टेनिस संघटनेला ९० दिवसांच्या आत अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले असून, त्यांची मान्यतादेखील गोठवली आहे. एआयटीएच्या अध्यक्षपदी अनिल खन्ना यांची निवड झाली होती. त्यांनी कार्यभार अद्याप स्वीकारला नसल्याने पद रिक्त आहे. इंदूर येथे झालेल्या विशेष आमसभेत खन्ना यांनी काही काळ कुठल्याही पदावर राहण्यास असमर्थता दर्शवीत अध्यक्षपद सांभाळण्यास नकार दिला होता. याआधी महासचिवपदावर काम केल्यानंतर त्यांना अध्यक्ष निवडण्यात आले होते. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत महासंघाने त्यांना आजीवन अध्यक्ष निवडले. सरकारचे मत असे की खन्ना यांचा अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ क्रीडा संहितेच्या नियमाविरोधात आहे. टेनिस संघटनेने मात्र कुठल्याही नियमाचा भंग झाला नसल्याचे स्पष्ट केले. एआयटीए महासचिव हिरामन चॅटर्जी यांनी सांगितले, की मी एसजीएम बोलावून अध्यक्षपदासाठी निवडणूक घेऊ शकतो, पण आधी सरकारने कुठले संशोधन करायचे आहे. याविषयीचे स्पष्ट दिशानिर्देश पाठवावेत. क्रीडासंहिता, पदाधिकाऱ्यांचे वय आणि कार्यकाळ या अटींचे पालन करीत कारभार चालविणारा आमचा पहिला क्रीडा महासंघ आहे. (वृत्तसंस्था)यासंदर्भात स्पष्टता निश्चित करण्यासाठी आम्ही क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले. ते म्हणाले, की खन्ना अयोग्य असतील, असे सरकारचे मत आहे. पण नियमांत कुठेही ‘कूलिंग आॅफ पिरिएड’बाबत उल्लेख नाही. कोषाध्यक्ष आणि महासचिवांसाठी ही अट आहे. सरकारचे दिशानिर्देश स्पष्ट नाहीत. सर्वांसाठी हे नियम एकसमान असावेत. हे नियम आमच्यावरच लागू होणार असतील, तर अर्थ नाही. आम्ही सरकारसोबत पंगा घेऊ इच्छित नाही. मिळून काम करायचे आहे. खन्ना यांना २०१२ ते २०१६ या कालावधीसाठी एआयटीए अध्यक्ष निवडण्यात आले. त्याआधी ते दोनदा महासचिव होते. क्रीडासंहितेनुसार एखादी व्यक्ती दोनदा एकाच पदावर असेल आणि पुन्हा एखाद्या पदावर राहू इच्छित असेल, तर त्याला चार वर्षे विश्रांती घ्यावी लागते. एआयटीएचे मत असे की खन्ना हे पुन्हा महासचिव बनू शकत नाहीत, पण त्यांना जून २०१२ मध्ये अध्यक्ष निवडण्यात आले होते. महासचिव राहिलेली व्यक्ती :‘कूलिंग आॅफ पिरिएड’ आटोपल्याशिवाय अध्यक्ष बनू शकणार नाही, असा कुठेही नियम नाही. खन्ना हे फार थोड्या फरकाने आयटीएफ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांची विश्व संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आयटीएफ उपाध्यक्ष बनल्यापासून खन्ना यांनी मागच्या वर्षी अ. भा. टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरविले होते. कार्यकारी समितीने मात्र त्यांना असे करण्यापासून रोखले होते.