शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सनरायझर्स विजयाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 30, 2016 05:44 IST

सनरायझर्स हैदराबाद संघ उद्या, शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर मात करीत विजयी वाटेवर परतण्याच्या प्रतीक्षेत आहे.

हैदराबाद : पुणे संघाकडून झालेल्या पराभवातून धडा घेत सनरायझर्स हैदराबाद संघ उद्या, शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर मात करीत विजयी वाटेवर परतण्याच्या प्रतीक्षेत आहे.याआधी उभय संघात झालेला सामना आरसीबीने जिंकला होता. त्यानंतर सनरायझर्सने कामगिरीत सुधारणा करीत सहापैकी तीन सामने जिंकले. या संघाचे सहा गुण आहेत. मागच्या सामन्यात पुण्याकडून डकवर्थ-लुईस नियमानुसार पराभूत झाल्याने सनरायझर्सची विजयी घोडदौड थांबली होती. शिखर धवन वगळता अन्य कुणीही फलंदाज धावा काढू न शकल्याने ११८ धावात संघ बाद झाला. डेव्हिड वॉर्नर खाते उघडू शकला नव्हता. अन्य फलंदाज देखील अपयशी ठरले. या चुकांपासून बोध घेत संघाला विजय मिळविण्याचे आव्हान असेल. सनरायझर्सकडे केन विलियम्सन व ट्रेंट बोल्ट हे दिग्गज फलंदाज आहेत; पण त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. संघाला बळकटी प्रदान करण्यासाठी या दोघांना संधी मिळू शकते. यजमानांकडे आशिष नेहरा, भूवनेश्वरकुमार, मुस्तफिझूर रहमान, बिपुल शर्मा आणि मोझेस हेन्रिक्स हे गोलंदाज आहेत. दुसरीकडे लय मिळविण्यासाठी झुंज देत असलेल्या आरसीबीचे पाच सामन्यांत चारच गुण आहेत. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत फलंदाजी कमकुवत बनली; पण विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे शानदार फॉर्ममध्ये आहेत. शेन वॉटसनने फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखविली. युवा सर्फराज खान यानेही योगदान दिले; पण या संघाची चिंता गोलंदाजी आहे. दिल्ली आणि मुंबई विरुद्ध गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. (वृत्तसंस्था)>उभय संघ यातून निवडणारसनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आशिष रेड्डी, रिकी भुई, विपुल शर्मा, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, दीपक हुडा, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथुन, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आशिष नेहरा, नमन ओझा, विजय शंकर, कर्ण शर्मा, बरिंदर सरन, टी. सुमन, आदित्य तारे, केन विल्यम्सन आणि युवराज सिंग.रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर : विराट कोहली (कर्णधार), वरुण अ‍ॅरॉन, अबू नेचीम, एस. अरविंद, सॅम्युअल बद्री, स्टुअर्ट बिन्नी, यजुवेंद्र चहल, एबी डीव्हिलियर्स, प्रवीण दुबे, ख्रिस गेल, ट्रॅव्हिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सर्फराज खान, विक्रमजित मलिक, मनदीपसिंग, अ‍ॅडम मिल्ने, हर्षल पटेल, लोकेश राहुल, परवेझ रसूल, केन रिचर्डसन, सचिन बेबी, मिशेल स्टार्क, विकास टोकस, शेन वॉटसन, डेव्हिड वीस, तबरेज शम्सी.