शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

ढासळलेल्या मानसिकतेचा पाहुण्यांना फटका

By admin | Updated: November 17, 2015 03:12 IST

दक्षिण आफ्रिका संघाला खेळपट्टीपेक्षा ढासळलेल्या मानसिकतेचा फटका बसला आहे. अन्यथा बंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिला डाव २१४ धावांत संपुष्टात येण्यासाठी दुसरे

 - वसीम अक्रम लिहितो़

दक्षिण आफ्रिका संघाला खेळपट्टीपेक्षा ढासळलेल्या मानसिकतेचा फटका बसला आहे. अन्यथा बंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिला डाव २१४ धावांत संपुष्टात येण्यासाठी दुसरे कुठले कारण दिसत नाही. या खेळपट्टीवर चेंडूला काही ‘स्क्वेअर टर्न’ मिळत नव्हता, पण दक्षिण आफ्रिका संघाची मानसिकता काही प्रमाणात नकारात्मक होती. तिसऱ्या दिवसाची खेळपट्टी असती तर कारण समजण्यासारखे होते, पण पहिल्याच दिवशी जर झटपट डाव संपुष्टात येत असेल तर तुम्ही दुसऱ्यावर दोषारोप करू शकत नाही. पाटा खेळपट्टीवर पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय धाडसी होता. पहिल्या दिवशी फलंदाजी स्वीकारत प्रतिस्पर्धी संघापुढे आव्हान निर्माण करणे अपेक्षित होते. भारतीय कर्णधाराला दक्षिण आफ्रिका संघाच्या मानसिकतेची कल्पना आली असावी, त्यामुळे त्याने कदाचित असा धाडसी निर्णय घेतला असेल. दक्षिण आफ्रिका संघाने फटकावलेल्या एकूण धावांपैकी ८० टक्के धावा एकट्या एबी डीव्हीलियर्सने फटकावल्या. जडेजाने शानदार पुनरागमन केले. त्याने रणजी स्पर्धेत खेळताना आपल्यातील उणिवा दूर करताना ३० बळी घेतले. आश्विन सध्याच्या काळात जगातील सर्वोत्तम आॅफस्पिनर आहे. वन-डे, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. भारत मालिकेत वर्चस्व गाजवेल, असे मत आताच व्यक्त करणे घाईचे ठरेल. दक्षिण आफ्रिकेला मात्र सकारात्मक मानसिकतेने खेळावे लागेल. त्यांनी भारतातील खेळपट्ट्यांबाबत तक्रार करायला नको. भारतीय उपखंडात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या असतात, हे सांगण्यासाठी कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही. फिरकीपटूंना खेळण्याचे तंत्र वेगळे असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तंत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे. फिरकीपटूंविरुद्ध यशस्वी ठरण्यासाठी स्ट्राईक रोटेट करणे, संयम बाळगणे आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा स्वीकारणे आवश्यक ठरते. दक्षिण आफ्रिका संघ संघर्ष करीत आहे, असे आताच बोलणे घाईचे ठरेल. विदेशात दक्षिण आफ्रिका संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दक्षिण आफ्रिका संघ वेगळ्या कारणांमुळे संघर्ष करीत आहे. एजी बॉलवर रिव्हर्स स्विंग मिळवण्यात त्यांना अपयश आले आहे. चेंडूकडे लक्ष देण्याची पद्धत आता कालबाह्य ठरली आहे. १९९० मध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना आम्ही चेंडूवर अधिक लक्ष देत असल्याची मला आठवण आहे. आम्ही ८० षटकांनंतर नवा चेंडू घेण्याचे टाळत होतो आणि १०० व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करीत होतो. जुना चेंडू रिव्हर्स होत होता. दोन दिवस पावसामुळे खेळ शक्य न झाल्यामुळे बंगळुरू कसोटी निकाली ठरण्याची शक्यता धूसर होत आहे. पण, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघावर वर्चस्व गाजवण्याचे सर्व प्रयत्न करायला हवेत. मोठी खेळी न करता आल्यामुळे हाशिम आमलाचे नेतृत्व प्रभावित झाले आहे. त्याच्यावर दडपण जाणवत आहे. तो शैलीदार फलंदाज असून यातून लवकरच मार्ग काढण्यात तो यशस्वी ठरेल. धावा फटकावण्यासाठी फलंदाजाने खेळपट्टीवर वेळ घालवणे आवश्यक आहे, असा सल्ला मी आमलाला देईल. आक्रमक पवित्रा स्वीकारण्यापेक्षा खेळपट्टीवर वेळ घालविला म्हणजे धावा आपोआप होतील. फिरकीपटूंविरुद्ध फाफ डू प्लेसिसचे तंत्र सदोष आहे. वन-डे व टी-२० क्रिकेटचा त्याच्यावर प्रभाव आहे. फिरकीपटूंविरुद्ध पुढे सरसावत फटके मारण्याची पद्धत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी ठरते, पण कसोटी क्रिकेटमध्ये नाही. तो कामगिरीत सातत्य राखणारा खेळाडू आहे, याची मला कल्पना आहे, पण त्याला तंत्रामध्ये सुधारणा करावी लागेल. (टीसीएम)