नवी दिल्ली : आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयला न्यायालयात ओढणारे बिहार क्रिकेट संघटनेचे आदित्य वर्मा यांनी शुक्रवारी चेन्नई येथील नोंदणी अधिका:यांना विनंती केली.
बीसीसीआय आपली आमसभा 3क् सप्टेंबर रोजी न घेता पुढे ढकलू इच्छित आहे. याला पायबंद घालावा, असे वर्मा यांनी लिहिलेल्या पत्रत म्हटले आहे. वर्मा म्हणाले, ‘86 वर्षापासून बीसीसीआयने आमसभेचे आयोजन 3क् सप्टेंबर किंवा त्याआधी केले. पण यावेळी श्रीनिवासन यांची बीसीसीआय अध्यक्षपदाची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी आमसभा लांबणीवर टाकण्याचे बीसीसीआयचे मनसुबे आहेत. ते हाणून पाडा अशी विनंती करणारा अर्ज माङो कायदेशीर सल्लागार चंद्रशेखर वर्मा यांनी नोंदणी अधिका:यांकडे केला. याची एक प्रत न्या. मुकुल मुदगल समितीला देखील पाठविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)