शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST
मोडनिंब: शांतिनिकेतन विद्यामंदिरच्या दोन विद्यार्थ्यांची झारखंड येथे होणार्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आह़े रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेमध्ये शांतिनिकेतनच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल़े या स्पर्धेमध्ये किशोरकुमार सुर्वे याने सिंगल स्पॉट प्रकारात 234 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावल़े फाईव्ह स्पॉट प्रकारात 288 गुण मिळवून रौप्यपदकाची कमाई केली़ मिक्स स्पॉट प्रकारात 222 गुण प्राप्त करीत रौप्यपदक मिळवल़े ओव्हरऑल मिळवून त्याने रौप्यपदकाची कमाई केली़ त्यामुळे त्याची 14 वर्षांखालील इंडियन प्रकारात महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघात निवड झाली आह़े
शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड
मोडनिंब: शांतिनिकेतन विद्यामंदिरच्या दोन विद्यार्थ्यांची झारखंड येथे होणार्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आह़े रायगड येथे झालेल्या राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेमध्ये शांतिनिकेतनच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल़े या स्पर्धेमध्ये किशोरकुमार सुर्वे याने सिंगल स्पॉट प्रकारात 234 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावल़े फाईव्ह स्पॉट प्रकारात 288 गुण मिळवून रौप्यपदकाची कमाई केली़ मिक्स स्पॉट प्रकारात 222 गुण प्राप्त करीत रौप्यपदक मिळवल़े ओव्हरऑल मिळवून त्याने रौप्यपदकाची कमाई केली़ त्यामुळे त्याची 14 वर्षांखालील इंडियन प्रकारात महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघात निवड झाली आह़ेविकास मोरे याने सिंगल स्पॉट प्रकारात 228 गुण प्राप्त करून रौप्यपदक मिळवल़े फाईव्ह स्पॉट प्रकारात 199 गुण प्राप्त करीत कांस्यपदक मिळवल़े मिक्स स्पॉट प्रकारात 201 गुण प्राप्त करीत कांस्यपदक मिळवल़े त्यामुळे त्याची 14 वर्षांखालील इंडियन प्रकारात महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आह़े त्यांना क्रीडाशिक्षक विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थाध्यक्ष उदयकुमार माने, सचिव सतीश सुर्वे, मुख्याध्यापक नितीन डोंगरे, प्रशांत कदम, अरुणा कदम, मिनाज तांबोळी, विद्या गाजरे, महेश वागज यांनी कौतुक केल़ेफोटो ओळी-राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या शांतिनिकेतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांसोबत उदयकुमार माने, सतीश सुर्वे आदी़