नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीच्या विजेतेपदासह सलग तिसरे ग्रँडस्लॅमचे अजिंक्यपद पटकावणारी भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या रँकिंगमध्ये एकसमान १२९२५ गुणांसह संयुक्तरूपाने ‘नंबर वन’वर कब्जा केला आहे.सानिया आणि हिंगीसने आपले अव्वल स्थान कायम ठेवले. या दोन्ही खेळाडू आणि तिसऱ्या स्थानावरील कॅसी डेलाकुआ यांच्यात मोठ्या अंतराचा फरक आहे. डेलाकुआचे ५८१0 गुण आहेत. महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विलियम्स ९२४५ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर नवीन चॅम्पियन जर्मनीची एंजेलिक केर्बरने ५७00 गुणांसह महिला रँकिंगमध्ये दुसरे स्थान प्राप्त केले आहे. केर्बरने सहाव्या स्थानावरून ही झेप घेतली आहे. भारताचा दुहेरी तज्ज्ञ रोहन बोपण्णाने आपल्या दुहेरीच्या रँकिंगमध्ये एका स्थानाने प्रगती केली आहे आणि आता तो आठव्या स्थानी पोहोचला आहे. (वृत्तसंस्था)
सानिया-हिंगीस अव्वल स्थानी
By admin | Updated: February 2, 2016 03:21 IST