नवी दिल्ली- आॅलिम्पिकपदकवीर साक्षी आणि योगेश्वर यांनी प्रो कुस्ती लीगच्या दुसऱ्या सत्रापूर्वी झालेल्या फॅशन शोमध्ये रॅम्पवर कॅटवॉक करुन धमाल उडवून दिली. प्रो लीगचे दुसरे सत्र १५ डिसेंबर पासून सुरु होत आहे. याच्या प्रसाराचा एक भाग म्हणून पैलवानांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. काळ्या रंगाचा पारंपारिक गाउन परिधान करुन साक्षी मलिक रॅम्पवर उतरली. या गाउनवर सोनेरी रंगाची बॉर्डर शोभून दिसत होती. या पेहरावात साक्षी अतिशय स्टायलिश दिसत होती. योगेश्वर दत्त धोती कुर्ता आणि पगडी अशा पारंपारिक भारतीय पोशाखात रॅम्पवर उतरला. हा आपल्यासाठी वेगळा अनुभव असल्याचे साक्षीने सांगितले.
साक्षी, योगेश्वरचा रॅम्पवर जलवा
By admin | Updated: November 4, 2016 04:17 IST