कोपेनहेगन : सोमवारपासून सुरू होणाऱ्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी़व्ही. सिंधू, राष्ट्रकुल खेळातील चॅम्पियन पी़ कश्यप यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे़ दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विन पोनप्पा यांच्याकडून अपेक्षा राहील़या प्रतिष्ठित स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरी, तसेच दुहेरी आणि मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडू आपले नशीब अजमावणार आहेत़ कोपेनहेगन येथे चौथ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ विश्व बॅडमिंटनमध्ये सायना, सिंधू आणि कश्यप यांना कठीण ड्रॉ मिळाला आहे़ सायना आणि सिंधू यांना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या आघाडीच्या खेळाडूंशी सामना करावा लागू शकतो, तर कश्यपला दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईशी झुंजावे लागू शकते़ (वृत्तसंस्था)
सायना, सिंधू, कश्यपवर लक्ष
By admin | Updated: August 25, 2014 02:25 IST