लंडन : लिएंडर पेसच्या आज येथे पुरुष दुहेरीतील उपांत्य फेरीच्या पराभवाबरोबरच भारताचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.पेस आणि झेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपनेक या पाचव्या मानांकित जोडीला दोन तास २१ मिनिटे चाललेल्या लढतीत कॅनडाच्या वासेक पोसपिसिल आणिअमेरिकेच्या जॅक सॉक या अमानांकित जोडीकडून ६-७, ३-६, ४-६ असा पराभवाचा सामना करावा लागला.पेस आणि स्टेपनेक यांना पूर्ण सामन्यात दहा वेळेस ब्रेक पॉइंट घेण्याची संधी मिळाली; परंतु ते फक्त दोनदाच आपल्या प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस भेदू शकले. दुसरीकडे पोसपिसिल आणि सॉक यांनी आठपैकी ४ वेळेस ब्रेक पॉइंट प्राप्त केले. दोन्ही जोडींनी पहिल्या सेटमध्ये प्रत्येकी एक वेळेस एकमेकांची सर्व्हिस भेदताना गुण वसूल केले. त्यामुळे हा सेट टायब्रेकरपर्यंत खेचला गेला. त्यात पोसपिसिल आणि सॉक यांनी ७-५ ने विजय मिळवला.दुसर्या फेरीत रोहन बोपन्ना आणि ऐसाम उल हक कुरैशी या आठव्या मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवणार्या पोसपिसिल आणि सॉक यांनी त्यांची चांगली कामगिरी कायम ठेवताना दुसर्या सेटमध्ये दोन आणि तिसर्या सेटमध्ये एक ब्रेक पॉइंट मिळवताना फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला. आता त्यांची लढत अमेरिकेच्या ब्रायन बंधू बॉब आणि माइक यांच्याशी होईल. ब्रायन बंधूंनी दुसर्या उपांत्य फेरीत मायकल लोड्रा आणि निकोलस माहूट या फ्रान्सच्या जोडीचा ७-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. पेसच्या या पराभवाबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
पेसच्या पराभवाबरोबरच विम्बल्डनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात
By admin | Updated: July 5, 2014 04:17 IST