शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

१०० मीटरमध्येही विक्रम नोंदविण्यास नचिकेत सज्ज

By admin | Updated: May 30, 2014 00:20 IST

नरेश हाळणोर / नाशिक : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या ५० मीटर बटरफ्लायमध्ये गेल्या पाच वर्षांपासूनचा अबाधित असलेला विक्रम नाशिकच्या नचिकेत बुझरुकने अवघ्या दोन सेकंदाने मोडीत काढत आपल्या नावे केला, तर उद्या होणार्‍या १०० मीटर बटरफ्लायमध्येही अशी नोंद करण्यासाठी तो सज्ज आहे.

नरेश हाळणोर / नाशिक : राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या ५० मीटर बटरफ्लायमध्ये गेल्या पाच वर्षांपासूनचा अबाधित असलेला विक्रम नाशिकच्या नचिकेत बुझरुकने अवघ्या दोन सेकंदाने मोडीत काढत आपल्या नावे केला, तर उद्या होणार्‍या १०० मीटर बटरफ्लायमध्येही अशी नोंद करण्यासाठी तो सज्ज आहे. नचिकेत बुझरुक. नाशिकच्या निवेकचा जलतरणपटू. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्याची पाण्याशी दोस्ती झाली आणि गेल्या दहा वर्षांत त्याने लहान गटापासून ते शालेय गटापर्यंतच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारत आत्तापर्यंत ३०० पेक्षाही अधिक पदके पटकावली आहेत. नचिकेतने आजपासून नाशिकरोड येथे सुरू झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेच्या १४ वर्षांआतील ५० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये सुवर्णपदक तर पटकावलेच; पण गेल्या पाच वर्षांपासूनचा विक्रमही मोडीत काढला. त्याने आदित्य सांगवेकर याच्या नावे असलेला विक्रम अवघ्या २ सेकंदांनी आपल्या नावे केला. ५० मीटर बटरफ्लायमध्ये नचिकेतने ०.२७.८७ अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवित आदित्यचा ०.२९.५१ सेकंदाचा विक्रम मोडला. बटरफ्लाय आणि फ्री स्टाईलमध्ये पटाईत असलेला नचिकेत पुण्याचे विनय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आहे. गेल्या दहा वर्षांत त्याने चार आंतरराष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेतून सहभागी होत १०० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक पटकावले आहे, तर राष्ट्रीय-राज्यस्तरीय स्पर्धांतून आत्तापर्यंत ३०० पेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. विक्रमासाठीच उतरणारउद्या (दि. ३०) होणार्‍या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारातही विक्रमी वेळेची नोंद करण्याचा ध्यास उराशी बाळगला असून, त्यादृष्टीनेच प्रयत्न करणार आहे. यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. त्यामुळेच अशी कामगिरी नोंदविता आली.- नचिकेत बुझरुक, जलतरणपटू