शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मुंबईकरांची स्थिती भक्कम

By admin | Updated: January 4, 2017 03:26 IST

कर्णधार आदित्य तरेच्या (८३) शानदार अर्धशतकी खेळीनंतर अभिषेक नायर (५८) व शार्दुल ठाकूर (५२) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेच्या

राजकोट : कर्णधार आदित्य तरेच्या (८३) शानदार अर्धशतकी खेळीनंतर अभिषेक नायर (५८) व शार्दुल ठाकूर (५२) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूविरुध्द पहिल्या डावात १०१ धावांची आघाडी घेतली. तामिळनाडूच्या ३०५ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा पहिला डाव ४०६ धावांत आटोपला.चांगल्या सुरुवातीनंतर झटपट तीन बळी गमावल्याने मुंबईकरांचा डाव घसरला होता. यावेळी मुंबईला आघाडी मिळवता येईल की नाही अशी शंका नाही. मात्र तरे, नायर व शार्दुल यांनी संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. ४ बाद १७१ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात करताना तरे आणि श्रेयश अय्यर (३६) यांच्यावर मुंबईची मदार होती.अय्यर वैयक्तिक धावसंख्येत १२ धावांची भर घालून परतला. परंतु, तरे - नायर यांनी सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बाबा अपराजितने नायरला बाद करून ही जोडी फोडली. नायरने १४३ चेंडूत ९ चौकारांसह ५८ धावा काढल्या. नायरनंतर तरे देखील १८१ चेंडूत ९ चौकारांसह ८३ धावा काढून परतला. यानंतर बलविंदर संधू (३२) आणि अक्षय गिरप (५) देखील बाद झाल्याने मुंबईचा डाव पुन्हा घसरला. परंतु, शार्दुलने चिवट फलंदाजी करताना १२६ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५२ धावा काढून संघाला आघाडी मिळवून दिली.शार्दुल मुंबईचा बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. तर विजय गोहिलने ३६ चेंडंूत केवळ एका धावांवर नाबाद राहात त्याला उपयुक्त साथ दिली. तामिळनाडूकडून विजय शंकरने ५९ धावांत ४ बळी घेतले. तर बाबा अपराजितने २ बळी घेतले. धावफलकतामिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकात सर्वबाद ३०५ धावा.मुंबई (पहिला डाव) : पृथ्वी शॉ झे. कार्तिक गो. अश्विन क्रिस्ट ४, प्रफुल्ल वाघेला धावबाद (मुकुंद/कार्तिक) ४८, सूर्यकुमार यादव झे. कार्तिक गो. शंकर ७३, आदित्य तरे झे. गंगा राजू गो. नटराजन ८३, सिध्देश लाड झे. मुकुंद गो. औशिक श्रीनिवास ०, श्रेयश अय्यर झे. कार्तिक गो. शंकर ३६, अभिषेक नायर पायचीत गो. अपराजित ५८, बलविंदर संधू झे. कार्तिक गो. शंकर ३२, शार्दुल ठाकूर त्रि. गो. अपराजित ५२, अक्षय गिरप झे. कार्तिक गो. शंकर ५, विजय गोहिल नाबाद १. अवांतर - १४. एकूण : १५०.३ षटकात सर्वबाद ४०६ धावा.गोलंदाजी : अश्विन क्रिस्ट १८-१-७५-१; टी. नटराजन २९-७-१०५-१; के. विग्नेश १७-१-५७-०; औशिक श्रीनिवास ३९-१३-६२-१; बाबा अपराजित १८.३-३-३५-२; विजय शंकर २०-३-५९-४; गंगा श्रीधर राजू ८-३-५-०; अभिनव मुकुंद १-०-३-०.