मेहता, सिद्धेश्वर हायस्कूल विजयी
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST
सोलापूर: आमदार दिलीप माने चषक 14 वर्षांखालील टी-20 क्रिकेट स्पर्धेत क़ेव्ही़ मेहता आणि सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करीत विजयाची नोंद केली़
मेहता, सिद्धेश्वर हायस्कूल विजयी
सोलापूर: आमदार दिलीप माने चषक 14 वर्षांखालील टी-20 क्रिकेट स्पर्धेत क़ेव्ही़ मेहता आणि सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करीत विजयाची नोंद केली़पहिल्या सामन्यात क़े व्ही़ मेहता प्रशालेच्या संघाने सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलवर सात गड्यांनी मात केली़दुसर्या सामन्यात सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलने सिद्धेश्वर मराठी माध्यम हायस्कूलवर 35 धावांनी विजय मिळवला़पहिल्या लढतीत सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलने 20 षटकात 107 धावा केल्या़ यात अभिषेक यादव 40, मुतरुज पटेलने 20 धावा केल्या़ क़ेव्ही़ मेहताकडून ओंकार माळी दोन तर सर्मथ कोळीने तीन बळी घेतल़े प्रत्युत्तरात के.व्ही़ मेहता हायस्कूलने 18 षटकात 108 धावा काढून विजय मिळवला़ यात ओंकार माळी 32, वैभव राठोडने नाबाद 25 धावा केल्या़ हा सामना क़ेव्ही़ मेहता प्रशालेने सात गडी राखून जिंकला़दुसर्या सामन्यात सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलने 20 षटकात 125 धावा केल्या़ यात निखिल शिंदे 48, अजिंक्य साळुंकेने 25 धावा केल्या़ सिद्धेश्वर मराठी मीडियम हायस्कूलकडून सूरज नष्टेने तीन तर मनोज चव्हाण याने दोन बळी घेतल़े प्रत्युत्तरात सिद्धेश्वर मराठी माध्यम हायस्कूलने 18 षटकात 90 धावा केल्या़ यात मनोज चव्हाण व सूरज नष्टे यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या़ सिद्धेश्वर इंग्लिश मीडियमकडून अजिंक्य साळुंके दोन तर निखिल शिंदे याने तीन बळी घेतल़े हा सामना सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलने 35 धावांनी जिंकला़