सामना बातमी
By admin | Updated: September 5, 2014 23:28 IST
इंग्लंडने केला गोड शेवट
सामना बातमी
इंग्लंडने केला गोड शेवट पाचवा वन-डे सामना : ज्यो रूटची शानदार शतकी खेळी लीड्स : ज्यो रुटची (११३) शतकी खेळी आणि त्यानंतर गोलंदाजांची शानदार कामगिरी या बळावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात ४१ धावांनी विजय मिळवून स्पर्धेचा गोड शेवट केला़ प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत ७ बाद २९४ धावा केल्या होत्या़ प्रत्युत्तरात भारतीय संघ ४८़४ षटकांत २५३ धावांपर्यंत मजल मारू शकला़ भारताकडून अम्बाती रायडू (५३) आणि रवींद्र जडेजा (८७) यांनी अर्धशतकी खेळी केली, तर शिखर धवन (३१), विराट कोहली (१३), सुरेश रैना (१८), महेंद्रसिंह धोनी (२९) यांना मोठी खेळी करता आली नाही़