लिटिल फ्लॉवर, मौलाना आझाद विजयी
By admin | Updated: August 26, 2014 22:08 IST
औरंगाबाद : आंतरशालेय गादिया चषक फुटबॉल स्पर्धेत लिटिल फ्लॉवर, मौलाना आजाद, स्टेपिंग स्टोन, शिशुविकास मंदिर, केम्ब्रिज या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत आगेकूच केली़
लिटिल फ्लॉवर, मौलाना आझाद विजयी
औरंगाबाद : आंतरशालेय गादिया चषक फुटबॉल स्पर्धेत लिटिल फ्लॉवर, मौलाना आजाद, स्टेपिंग स्टोन, शिशुविकास मंदिर, केम्ब्रिज या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत आगेकूच केली़ १४ वर्षांखालील गटात लिटिल फ्लॉवर संघाने मौलाना आझाद संघावर १-० अशी मात केली़ विजयी संघाकडून आदिलने गोल नोंदविला़ १७ वर्षांखालील गटात तलत हायस्कूल आणि बुर्हाणी नॅशनल यांच्यात झालेला सामना १-१ असा बरोबरीत सुटला़ स्पर्धेतील तिसर्या लढतीत १७ वर्षांखालील गटात मौलाना आझादने स्टेपिंग स्टोनवर २-० ने सरशी साधत आगेकूच केली़ मौलाना आझादकडून अदनान खान आणि सलमान खान यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला़ १७ वर्षांखालील गटात स्टेपिंग स्टोनने प्रतिस्पर्धी संघावर ३-० ने मात केली़ १४ वर्षांखालील गटात शिशुविकास मंदिर प्रशाला संघाने स्टेपिंग स्टोनवर ४-० असा एकतर्फी विजय मिळविला़ विजयी संघाकडून शोराब काझी आणि सय्यद समीर यांनी प्रत्येकी २ गोल केले़ १७ वर्षांखालील गटात केम्ब्रिज स्कूलने टेंडर केअर होमवर ३-० ने मात केली़ केेम्ब्रिजकडून रोहित, जतीन आणि प्रज्वल यांनी प्रत्येकी १ गोल नोंदवीत संघाला विजय मिळवून दिला़ (क्रीडा प्रतिनिधी)