शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जॅकसन ते फव्हेला!

By admin | Updated: July 5, 2014 04:49 IST

चार्ली चॅपलीन ब्राझीलियन असता तर त्यात त्यानं भर घालून म्हटलं असतं की, तुम्ही ज्या दिवशी हसत नाही अन् नाचत नाही तो तुमच्या आयुष्यातील सगळ्यात निरर्थक दिवस

संदीप चव्हाण, ब्राझीलचार्ली चॅपलीननं एके ठिकाणी म्हटलं होतं की, तुमच्या आयुष्यातील सर्वांत निरर्थक दिवस म्हणजे, ज्या दिवशी तुम्ही हसत नाही... चार्ली ब्राझीलियन असता तर त्यात त्यानं भर घालून म्हटलं असतं की, तुम्ही ज्या दिवशी हसत नाही अन् नाचत नाही तो तुमच्या आयुष्यातील सगळ्यात निरर्थक दिवस... सॅल्वाडोरमध्ये तुम्हाला भेटणारा प्रत्येकजण हसतच तुमचं स्वागत करतो; पण चार्लीच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर हसणारा प्रत्येक चेहरा सुखी असतोच असं नाही...परवा सॅल्वाडोरमध्ये अमेरिका आणि बेल्जियम दरम्यान मॅच झाली. या मॅच दरम्यान इटलीच्या मारिओनं सुपरमॅनची जर्सी घालून मॅच सुरू असताना मैदानात घुसखोरी केली होती. त्यानं त्याच्या जर्सीवर ‘फव्हेला’ असं लिहिलं होतं... मारिओनं मैदानात घुसखोरी केल्याच्या बातम्या येथीलच काय जगभरातील माध्यमांनी छापल्या; पण त्यापैकी कितीजणांनी या ‘फव्हेला’चा माग घ्यायचा प्रयत्न केला. फव्हेला म्हणजे झोपडपट्टी... आपल्या येथे धारावी जसा फॉरेनरसाठी पिकनिक स्पॉट बनलाय, तसा सॅल्वाडोरमध्ये ‘फव्हेला’... याच फव्हेलाची दर्दभरी दास्तान अवघ्या जगाला सांगण्यासाठी पॉप संगीताचा बेताज बादशहा मायकल जॅकसन सॅल्वाडोरमध्ये धडकला होता...त्याचा ‘दे डोंट केअर अबाऊट अस’ हा अल्बम त्याकाळी म्हणजे १९९६ साली सुपरडुपर हिट झाला होता. रिओ आणि सॅल्वाडोरच्या फव्हेलावर त्यानं स्वत: गीत रचलं होतं आणि नृत्यही केलं होतं... माझं हॉटेल एअरपोर्टच्या जवळ... शहरापासून दूर...त्यामुळेच माझ्या हॉटेलपासून हे फव्हेला अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर. अ‍ॅटलांटिक समुद्राशी लगट करणारं. उंचच उंच इमारतींचे सॅल्वाडोर शहर एकीकडे, तर दुसरीकडे गावकुसाबाहेर वसलेलं हे फव्हेला... मायकेल जॅकसननं जेथे या गाण्याचं शूटिंग केलं तो स्पॉट सध्या पिकनिक स्पॉट झालाय... त्या गाण्यात मायकल जॅकसननं फव्हेलातील वंचितांची व्यथा मांडली होती. ड्रगच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईमुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या होत्या. वाढती बेरोजगारी, त्यातून वाढणारी गुन्हेगारी यामुळे फव्हेलातील जीवन नरकसमान झालं होतं... आजही त्यात काही फारसा फरक पडलेला नाही... पण, १९९६ साली मायकल जॅकसननं हे गाणं येथे सॅल्वाडोरमध्ये चित्रीत केल्यानंतर त्याच्या त्या अल्बमवर ब्राझीलमध्ये बंदी घालण्यात आली होती. कारण त्यावेळेच्या सरकारला २००४ सालच्या आॅलिम्पिक यजमानपदाची चिंता लागली होती. मायकल जॅकसनच्या या अल्बममुळे ब्राझीलची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होण्याची भीती सरकारला होती. शूटिंगच्या वेळीही जॅकसनला स्थानिक प्रशासनाकडून असहकार्य दिले गेले; पण फव्हेलातील गरीब जनता जॅकसनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली... मायकल जॅकसनचा हा अल्बम अवघ्या युरोपमध्ये लोकप्रिय झाला. जर्मनीत तर तब्बल ३० आठवडे तो ‘टॉप टेन’मध्ये होता. जॅकसनच्या दुसऱ्या कुठल्याही अल्बमला जर्मनीत एवढी लोकप्रियता मिळाली नव्हती; पण अमेरिकेत तो फारसा खपला नाही. नियती बघा आज १८ वर्षे उलटली. इटलीच्या मारिओ या घुसखोरामुळे त्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंही नेमक्या अमेरिकेच्याच मॅचमध्ये घुसखोरी केली. आज जॅकसन जिवंत नाही आणि ज्या भीतीपोटी ब्राझीलनं जॅकसनच्या त्या अल्बमवर बंदी घातली होती, ती भीतीही आता राहिली नाही. २०१६ मध्ये ब्राझीलच्या रिओत आॅलिम्पिक होतेय आणि फुटबॉलचा विश्वचषकही सध्या ब्राझीलमध्ये सुरू आहे. पण, हटली नाही ती या ‘फव्हेला’तील गरिबी...