ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. ७ - २० षटकांत ५ गडी गमावत भारताने १७७ धावा केल्या. भारत सामना गमावणार असे वाटत असतानाच विजयाच्या अतिशय जवळ जाऊन भारताचा भारताचा पराभव झाला आहे. विराट कोहली आणि धोनी यांचा आपवाद वगळता कोण्त्याही भारतीय फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. १३ चेंडूत २७ धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने धाव घेण्याची घाई केली व त्याला फक्त ७ धावांत धावचीत व्हावे लागले. तब्बल ९ चौकार आणि १ षटकार लगावत विराट कोहलीने ६६ धावा केल्या. धवन ३३ धावांवर बाद झाला असून रैना २५ धावांवर बाद झाल्याने धोनीकडून क्रिकेटशौकिनांच्या फार अपेक्षा होत्या. धोनीची जोरदार फटकेबाजी इंग्लंडच्या चोख क्षेत्ररक्षणासमोर निरुपयोगी ठरली आणि भारताने सामना गमावला.