ऑनलाइन लोकमत
बर्निंगहॅम, दि. ५ - इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतासमोर २९५ धावांचे आव्हान ठेवले आहे. ५० षटकांत इंग्लंडने ७ गडी गमावत २९४ धावा केल्या आहेत. सुरेश रैना गोलंदाजी करत असताना इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक धोनी कडे झेल गेल्याने ४६ धावांवर बाद झाला. तसेच जोस बटलरही अर्ध शतक पूर्ण होण्यास एक धाव असताना रन आऊट झाला होता. अॅलेक्स हेल, मोईन अली व क्रिस वोक्स यांचा फार काळ मैदानावर टिकाव लागला नाही.
शतकपूर्ण करणारा इंग्लंचा फलंदाज जो रुट व क्रिस वॉक्स या दोघांना मोहम्मद शामीने बाद केले. तर, भुवनेश्वर कुमार, आर.अश्वीन, उमेश यादव आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला असला तरी इंग्लंडने दिलेले २९५ धावांचे आव्हान भारतीय फलंदाज किती समर्थपणे झेलू शकतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे. या आधीचे तिन्ही सामने जिंकत भारताने ३-० अशी आघाडी मिळवली आहे. हा सामना जिंकल्यास ४-० अशी आघाडी भारत घेऊ शकेल.