टी-20 : भारत इंग्लंडला लोळविण्याच्या इराद्याने खेळणार
बर्मिगहॅम : अखेरचा एकदिवसीय सामना गमविल्यानंतरही उद्या (रविवारी) येथे खेळल्या जाणा:या एकमेव टी-2क् सामन्यात यजमान संघाला लोळवीत संमिश्र ठरलेल्या इंग्लिश दौ:याची सांगता करण्याचा भारताचा इरादा राहील.
कसोटी मालिका भारताने 1-3 ने गमावली तर वन-डेत इंग्लंडला 3-1 ने झोपविले. शनिवारी अखेरच्या सामन्यात भारतीय संघ 41 धावांनी पराभूत झाला होता. कसोटी सामन्यात विजयासाठी संघर्ष करणा:या टीम इंडियाला वन-डेत सुरेश रैनासारखे खेळाडू संघात आल्यावर बळ मिळाले. अजिंक्य रहाणो आणि शिखर धवन यांनीदेखील झटपट क्रिकेटमध्ये ब:यापैकी योगदान दिले. पण
स्टार फलंदाज विराट कोहली याचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला कोहली संपूर्ण दौ:यात अपयशी ठरला तरीही तो उद्या लक्षवेधी कामगिरी करण्यास इच्छुक दिसतो. अंतिम वन-डेत रहाणो आणि धवन अपयशी ठरले होते. त्याआधीच्या चौथ्या वन-डेत या जोडीने शानदार कामगिरी बजावली. रहाणोने शतकी खेळी केली होती.
रैनाने मालिकेत एक शतक तसेच अखेरच्या वन-डेत अंबाती रायडूने 53 आणि रवींद्र जडेजाने 87 धावा ठोकल्या. गोलंदाजीत शमी, भुवनेश्वर, उमेश यादव या जलद गोलंदाजांमधून कुणाची वर्णी लागेल हे सांगता येत नाही. फिरकीत मात्र जडेजा हा धोनीची प्रथम पसंती आहे. याशिवाय अश्विनला तर पर्यायच नाही. टीम ब्रेसनन, रवी बोपारा आणि जेम्स टेलर यांचे संघात पुनरागमन झाले.
बांगलादेशात टी-2क् विश्वचषक खेळल्यापासून ब्रेसनन सामना खेळलेला नाही. टेलरदेखील वर्षापूर्वी आर्यलडविरुद्ध खेळला होता. नियमित कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड हा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे बाहेर असल्याने इयॉन मोर्गन नेतृत्व करेल. (वृत्तसंस्था)
4भारत : महेंद्रसिंह धोनी कर्णधार, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणो, सुरेश रैना, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, धवल कुलकर्णी आणि भुवनेश्वर कुमार.
4इंग्लंड : इयॉन मोर्गन कर्णधार, मोईन अली, रवी बोपारा, टीम ब्रेसनन, ज्योस बटलर, स्टीव्हन फिन, हॅरी गुर्ने, अॅलेक्स हेल्स, ािस जॉर्डन, ज्यो रुट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ािस वोक्स.