शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

By admin | Updated: February 2, 2016 03:23 IST

उपकर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या या मालिकेसाठी निवड समितीने अष्टपैलू पवन

नवी दिल्ली : उपकर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या या मालिकेसाठी निवड समितीने अष्टपैलू पवन नेगीचा संघात समावेश केला आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-२० मालिकेत कोहलीने शानदार कामगिरी करताना तीन अर्धशतके झळकावित १९९ च्या सरासरीने १९९ धावा फटकावल्या. कोहलीने आॅक्टोबर ते जानेवारी या कालावधीत १० वन-डे आणि पाच टी-२० याव्यतिरिक्त चार कसोटी सामने खेळले. आॅस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी वन-डे सामन्यात नाबाद शतकी खेळी करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मनीष पांडेला १५ सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. निवड समितीने ऋषी धवन, गुरकिरत मान आणि उमेश यादव यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंची आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी निराशाजनक ठरली होती. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे. भुवनेश्वर कुमार वन-डे मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळता आले नव्हते. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध ९ फेब्रुवारी रोजी पुणे येथे पहिली लढत खेळणार आहे. त्यानंतर अन्य दोन सामने १२ फेब्रुवारी रोजी रांची आणि १४ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे होतील. निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी महिला संघ जाहीर केला. महिला संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. महिला संघाने टी-२० मालिकेत तीनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचा पराभव करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुष संघांच्या मालिकेसोबतच महिला संघांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला संघाचे वन-डे सामने रांची येथे १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होतील, तर तीन सामन्यांची टी-२० मालिका २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत खेळली जाणार आहे. (वृत्तसंस्था) आॅस्ट्रेलियाला क्लीन स्वीप दिलेल्या प्रस्थापित संघामध्ये निवड होणे ही आश्चर्याची बाब आहे. जेव्हा मला निवडीबाबत समजले तेव्हा विश्वास बसला नाही. कारण सध्याचा संघ अव्वल संघ आहे. या निवडीचा मी पूर्ण फायदा घेवून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.- पवन नेगीटी-२० (पुरुष) : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, पवन नेगी.टी-२० (महिला) : मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत कौर, अनुजा पाटील, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, सुषमा वर्मा, पूनम यादव, व्ही. आर. वनिता, स्नेह राणा, थिरूशकामिनी एमडी, एकता बिश्त, निरंजना नागराजन.वन-डे संघ (महिला) : मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत कौर, थिरूशकामिनी एमडी, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, सुषमा वर्मा, पूनम यादव, दीप्ती शर्मा, पूनम राऊत, आर. कल्पना, निरंजना नागराजन, प्रीती बोस.