तिसरी वन-डे : इंग्लंडवर सहा गडय़ांनी मात, अश्विन सामनावीर
नॉटिंघम : गोलंदाजांच्या अचूक मा:यानंतर फलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत भारताला तिस:या वन-डे सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध 6 गडी व 42 चेंडू राखून विजय मिळवून दिला. भारताने 2-क् अशी आघाडी मिळविली असून, मालिका गमाविणार नसल्याचे निश्चित केले. तीन बळी घेणारा अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांदरम्यान चौथी लढत 2 सप्टेंबर रोजी बर्मिघम येथे खेळली जाणार आहे.
रायडूने 78 चेंडूंना सामोरे जाताना नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यात 6 चौकारांचा समावेश आहे. रवींद्र जडेजा 12 धावा काढून नाबाद राहिला.
त्याआधी, भारताने नाणोफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीच्या जोडीने इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. पण, अन्य फलंदाजांना त्याचा लाभ घेता आला नाही. इंग्लंडचा डाव अखेरच्या चेंडूवर 227 धावांत संपुष्टात आला. ट्रेन्टब्रिजची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची आशा व्यक्त करण्यात येत होती. पण, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारतातर्फे फिरकीपटू अश्विनने अचूक मारा करताना 1क् षटकांत 39 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, सुरेश रैना, अंबाती रायडू व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. इंग्लंडतर्फे कर्णधार अॅलिस्टर कुकने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. अॅलेक्स हेल्स व जोस बटलर यांनी प्रत्येकी 42 धावा फटकाविल्या. जेम्स ट्रेडवेलने 3क् धावांची खेळी करीत इंग्लंडला 2क्क्चा पल्ला ओलांडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)
4अश्विनच्या (3-39) अचूक मा:याच्या जोरावर इंग्लंडचा डाव 227 धावांत गुंडाळल्यानंतर अंबाती रायडू (नाबाद 64), अजिंक्य रहाणो (45), सुरेश रैना (42) व कोहली (4क्) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजयासाठी आवश्यक धावा 7 षटके राखून पूर्ण केल्या.
इंग्लंड :- अॅलिस्टर कुक यष्टिचीत धोनी गो. रायडू 44, अॅलेक्स हेल्स ङो. धोनी गो. रैना 42, इयान बेल धावबाद 28, जो रुट यष्टिचित धोनी गो. जडेजा क्2, इयॉन मॉर्गन ङो. धोनी गो. अश्विन 1क्, जोस बटलर त्रि.गो. अश्विन 42, बेन स्टोक्स ङो. रैना गो. अश्विन क्2, ािस व्होक्स ङो. शर्मा गो. शमी 15, जेम्स ट्रेडवेल ङो. व गो. भुवनेश्वर 3क्, स्टिव्हन फिन धावबाद क्6, जेम्स अॅन्डरसन नाबाद क्क्. अवांतर (6). एकूण 5क् षटकांत सर्वबाद 227. बाद क्रम : 1-82, 2-93, 3-97, 4-12क्, 5-138, 6-149, 7-182, 8-2क्2, 9-226, 1क्-227. गोलंदाजी : भुवनेश्वर 8-क्-45-1, शर्मा 3-क्-17-क्, शमी 9-क्-4क्-1, अश्विन 1क्-क्-39-3, रैना 8-क्-37-1, रायडू 2-क्-8-1, जडेजा 1क्-क्-38-1.
भारत :- अजिंक्य रहाणो ङो. बटलर गो. फिन 45, शिखर धवन ङो. मोर्गन गो. व्होक्स 16, विराट कोहली ङो. ट्रेडवेल गो. स्टोक्स 4क्, अंबाती रायडू नाबाद 64, सुरेश रैना ङो. व्होक्स गो. ट्रेडवेल 42, रवींद्र जडेजा नाबाद 12. अवांतर (9). एकूण 43 षटकांत 4 बाद 228. बाद क्रम : 1-35, 2-85, 3-12क्, 4-2क्7. गोलंदाजी : अॅन्डरसन 7-क्-29-क्, व्होक्स 8-1-43-1, ट्रेडवेल 1क्-1-46-1, फिन 8-क्-5क्-1, स्टोक्स 6-क्-31-1, रुट 4-क्-27-क्.