शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

देव जाणो, काय होणार..

By admin | Updated: July 12, 2014 01:00 IST

जेथे विज्ञानाच्या वाटा थांबतात, तेथून ईश्वराची वाट सुरू होते, असं म्हणतात. ब्राझीलमध्ये सध्या मी पदोपदी हे अनुभवतोय. देव जाणो, आमच्या ब्राझीलच्या टीमचं काय होणार? हे सगळ्यांचं ठरलेलं उत्तर.

संदीप चव्हाण
जेथे विज्ञानाच्या वाटा थांबतात, तेथून ईश्वराची वाट सुरू होते, असं म्हणतात. ब्राझीलमध्ये सध्या मी पदोपदी हे अनुभवतोय. देव जाणो, आमच्या ब्राझीलच्या टीमचं काय होणार? हे सगळ्यांचं ठरलेलं उत्तर. 
ब्राङिालियन जनता तशी देवभोळी. रिओत तर मला दर किलोमीटरवर एक चर्च सापडतंय. मी रिओतील ज्या सेंट्रो भागात राहतो, तेथे तर अमूक एका चर्चकडून डावीकडे वळा, मग पुढच्या चर्चकडून पुन्हा उजवीकडे वळा समोर एक चर्च दिसेल, असाच पत्ता सांगितला जातो. हे कमी की काय म्हणून जगातील सात आश्चर्यात येथील ‘ािस्त द रिडीमर’ या पुतळ्याचा समावेश नव्यानं करण्यात आलाय. तिस:या क्रमांकाची मॅच उद्या, शनिवारी ब्राझील विरुद्ध नेदरलँड यांच्यात होत असल्यानं जगभरातून रिओत आलेल्या फुटबॉलप्रेमींसाठी तसा आजचा दिवस हा पर्यटनाचा दिवस होता. म्हटलं आपणही ब्राझीलच्या विजयासाठी ख्रिस्ताला साकडं घालू या. तेथे मला साओ पावलोतून आलेला एक कट्टर ब्राङिालियन रिचर्ड भेटला. साओ पावलो हे पेलेचे शहर. ब्राझील संघाला फायनलसाठी चिअरअप करण्याकरिता रिचर्डनं रिओचं प्लॅनिंग आखलं होतं; पण ब्राझील सेमिफायनल हरल्यामुळे त्याने सगळा प्लॅनच बारगळला. आमची टीम कॉफिनमध्ये ऑलरेडी पोहोचलीय. उद्या कॉफिनवर शेवटचा खिळा मारायचा बाकी आहे, असं सांगताना त्याच्या पानावलेल्या कडा मी पाहिल्या.
विचार करा, नेदरलँडनंही ब्राझीलची पुन्ही तीच अवस्था केली, तर काय हाहाकार उडेल. आपल्या येथे टी-2क् वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी केल्यावर अगदी धोनीच्या घरावर दगडफेक करण्यार्पयत माथेफिरूंची मजल गेली होती. आपण माथेफिरूच्या बाबतीत अश्मयुगात राहतो, म्हणून दगडफेक; पण हे लॅटिन अमेरिकेचे देश याबाबतीत भलतेच पुढारलेलेत. येथे पहिली लाथ (बहुतांशवेळा ती बंदुकीची गोळीच असते) आणि मग जमलीच तर बात. कोलंबियाचा फुटबॉलपटू आंद्रेस एस्कोबार आठवतोय ना! बिचा:याकडून चुकून स्वयंगोल झाल्यामुळे त्याचा गोळ्या घालून निर्घृण खून केला होता. फुटबॉल हे या लोकांच्या रक्तात वाहतेय आणि त्यासाठी ते प्रसंगी रक्तही वाहायला तयार असतात. फुटबॉल मॅचनंतर होणा:या दंग्यात  ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी 3क् जण मृत्युमुखी पडलेत. ही आकडेवारी भयावह असली तरी रिचर्ड मला ती अभिमानानं सांगत होता. मला तो ही कहाणी सांगत असताना ािस्त द रिडीमर पुतळ्याच्या सभोवती अर्जेटिनाच्या फॅन्सचा घोळका जमा झाला होता. अर्जेटिना म्हणजे ब्राझीलची दुखरी नस. सकाळपासून येथे रिओत पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरण ढगाळ होतं आणि म्हणूनच ढगांनी ािस्ताचा अवघा पुतळा झाकून टाकला होता. हाच धागा पकडत रिचर्ड तावातावानं म्हणाला, बघ बघ! अर्जेटिनाच्या चाहत्यांचा जल्लोष पाहावा लागू नये म्हणून आमच्या या ािस्तांनीही आपलं तोंड या ढगात लपवलंय. आम्ही तेवढेही नशीबवान नाही. टीमचे फुटबॉल मैदानावरचे प्रयत्न अपुरे पडताहेत आणि म्हणूनच आता  ईश्वराचा धावा सुरू झालाय. खरंच तो देवच जाणो, या ब्राझीलच्या टीमचं काय होणार..