लीड्स : मालिका विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ शुक्रवारी खेळल्या जाणा:या पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीत विजय मिळवत इंग्लंडला ‘क्लिन स्वीप’ देण्यास उत्सुक आहे. कसोटी मालिका गमाविणा:या भारतीय संघाने वन-डे सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन करीत इंग्लंडविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजविले.
पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर विश्व चॅम्पियन भारताने सलग तीन सामने जिंकत मालिकेत 3-क् अशी विजयी आघाडी घेतली. भारताने येथे 2क्क्2मध्ये तिरंगी मालिकेत जेतेपद पटकाविले होते, तर 2क्13मध्ये येथे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंंकण्याची कामगिरी केली होती; पण त्या स्पर्धेत अनेक संघांचा सहभाग होता. भारताने इंग्लंडमध्ये 199क्मध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका जिंकली होती. त्या मालिकेत व सध्याच्या मालिकेत एकमेव समानता म्हणजे रवी शास्त्री. 199क्मध्ये शास्त्री संघाचा सदस्य होता, तर या वेळी तो संघाचा संचालक आहे. त्या वेळी मोहम्मद अझरुद्दीन संघाचा कर्णधार होता. विजयाने मालिकेचा शेवट करण्यास शास्त्री व धोनी इच्छुक आहेत. इंग्लंडला वन-डे सामन्यांच्या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सलामीवीर अॅलेक्स हेल्सला स्विंग मा:याला तोंड देता आलेले नाही, तर मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. दुखापतीमुळे इयान बेलला शेवटच्या लढतीत सहभागी होता आले नाही.
कसोटी मालिकेत गॅरी बॅलेन्सने चांगली कामगिरी केली, पण वन-डे क्रिकेटमध्ये त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत वर्चस्व गाजवले. एजबस्टनचा अपवाद वगळता अन्य मैदानावरील खेळपट्टय़ांवर फिरकीपटूंना मदत मिळाली. दक्षिण आफ्रिकेत अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजांची येथे कामगिरी उल्लेखनीय ठरली.
अजिंक्य रहाणो व शिखर धवन
या सलामीवीरांनी येथे छाप सोडली आहे. यानंतरच्या लढतीतही रहाणो-धवन यांच्याकडून डावाची सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचे संकेत कर्णधार धोनीने दिले आहे. त्यामुळे दुखापतीतून सावरल्यानंतर रोहित शर्माला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहे. अंबाती रायडूने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे; पण संघव्यवस्थापन संजू सॅम्सनला संधी देण्यास उत्सुक आहे. मालिकेची औपचारिकता पूर्ण करणा:या या लढतीत भुवनेश्वर व मोहम्मद शमी यांना विश्रंती देत उमेश यादव व कर्ण शर्मा यांनी
संधी मिळण्याची शक्यता
आहे. (वृत्तसंस्था)
च्भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणो, सुरेश रैना, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅम्सन, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार.
च्इंग्लंड : अॅलिस्टर कुक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अॅन्डरसन, गॅरी बॅलेन्स, इयान बेल, जोस बटलर, स्टिव्हन फिन, हॅरी गर्ने, अॅलेक्स हेल्स, ािस जॉर्डन, इयोन मोर्गन, जो रुट, बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल, ािस व्होक्स.