दुबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांचा १ ते १८ जून या कालावधीत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी असलेल्या समालोचकांच्या यादीमध्ये समावेश आहे. आायसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. आणखी काही माजी कर्णधारांचा या यादीमध्ये समावेश असून त्यात न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ यांचे नाव आहे. हे सर्व आयसीसी टीव्हीमध्ये पदार्पण करतील. (वृत्तसंस्था)
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गांगुली, पॉन्टिंग समालोचन करणार
By admin | Updated: April 19, 2017 01:44 IST