शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

धोनीने फिरकीपटूंचा चांगला वापर केला

By admin | Updated: March 11, 2015 00:40 IST

आयर्लंडविरुद्धच्या लढतीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांच्या खेळातच वेगवान गोलंदाजी अधिक उपयुक्त ठरणार नसल्याचे कर्णधार

आयर्लंडविरुद्धच्या लढतीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांच्या खेळातच वेगवान गोलंदाजी अधिक उपयुक्त ठरणार नसल्याचे कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या लक्षात आले. भारतीय संघातर्फे आतापर्यंत वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. चेंडू थांबून येत असेल आणि वळत असेल, तर धोनी सहज निर्णय घेऊ शकत होता. त्याने अधिक वेळ न दवडता आश्विनला पाचारण केले आणि सुरेश रैनाला १० षटके टाकण्याची संधी दिली. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाची निश्चितच ही योजना नव्हती, कारण न्यूझीलंडमधील मैदाने आकाराने लहान असतात. त्यामुळे फिरकीपटूंना येथे विशेष संधी नसते. धोनीने मात्र योग्य क्षेत्ररक्षण सजवताना फिरकीपटूंना वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. त्याने आश्विनला सलग ८ षटके गोलंदाजी देताना उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी रवींद्र जडेजाची षटके राखून ठेवली. महागड्या ठरलेल्या उमेश यादवची धोनीने गरजही भासू दिली नाही. आश्विनला गोलंदाजी करताना बघणे नेहमीच आनंददायी असते. अलीकडेच शेन वॉर्नने समालोचन करताना आश्विनची प्रशंसा केली आहे. आश्विनच्या गोलंदाजीतील टप्पा, वेग आणि एका बोटाचा वापर करून टाकण्यात येणारा आऊटस्विंगर बघितल्यानंतर वॉर्नला निश्चितच आनंद झाला असेल. आश्विनमुळे सामन्यात फिरकी गोलंदाजी बघण्याचा आनंद पुन्हा मिळत आहे. शिखर धवनने आणखी एक शतक झळकावले. जम बसल्यानंतर सामन्यावर पकड कशी मिळवायची, हे त्याने दाखवून दिले. संघाची धावसंख्या ९०च्या आसपास असताना दोन्ही फलंदाज प्रत्येकी ४५ धावांवर खेळत होते. त्यानंतर धवनने धावगती वाढवली आणि लवकरच तो ८० धावांवर पोहोचला आणि शतकही पूर्ण केले. त्यामुळेच त्याला धोकादायक फलंदाज मानले जाते. फलंदाजीमध्ये गिअर बदलण्याची क्षमता मोजक्या फलंदाजांमध्ये असते. या लढतीत सुरुवातीपासून भारताने वर्चस्व गाजविले. आयर्लंडची फलंदाजीची बाजू मजबूत आहे; पण फिरकीपटूंविरुद्ध ताळमेळ साधण्यात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. खेळपट्टी जर अनुकूल नसेल, तर आयर्लंड संघाच्या अडचणींमध्ये आणखी भर पडते. या लढतीसाठी असलेली खेळपट्टी तशीच होती. त्यामुळे आयर्लंडला मदत मिळाली नाही. भारतीय संघाने आतापर्यंत चांगला खेळ केला आहे. जडेजाला गोलंदाजी व फलंदाजीमध्ये सूर गवसला, तर हा एक समतोल साधला गेलेला संघ होईल. (टीसीएम)