वेलिंग्टन : सलग आयोजित होणा:या क्रिकेट मालिकांमुळे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंहच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आह़े हा खेळाडू संघात केवळ स्टॉपर (यष्टीमागे चेंडू अडवणारा) बनला आहे, असे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो याने व्यक्त केल़े
क्रो पुढे म्हणाला, धोनीच्या गचाळ विकेट किपिंगवर अनेकांनी टीका केली आह़े त्याबद्दल अनेकांनी आपल्या लिखाणातून समाचार घेतला आह़े भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांत झालेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांची बाजू पलटताना दिसली़ कधी इंग्लंड सामन्यावर वर्चस्व मिळवायचा, तर कधी भारतीय संघ सामन्यात वरचढ व्हायचा़ यात यष्टीरक्षकांना विशेष कामगिरी करणो गरजेचे असत़े यष्टीमागे खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याचा परिणाम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरही होतो़ क्रो म्हणाला, धोनीला सध्या कसोटीतून ब्रेक देण्याची गरज आह़े तो सध्या जास्त क्रिकेट खेळत आह़े याचाच परिणाम कामगिरीवरही दिसत आह़े (वृत्तसंस्था)